आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनात्मक: आधी अवैध काॅम्प्युटर विक्री; आता एलियन संशोधनासाठी निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगसोबत युरी मिलनर. - Divya Marathi
प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगसोबत युरी मिलनर.
२०१० मध्ये फॉर्च्युनने निवडलेल्या जगातील ५० बिझनेसमनमध्ये युरी एकमेव रशियन होते.
त्यांचे वडील रशियात इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये मुख्य उपसंचालक होते. आई व्हायरोलॉजिकल लॅबमध्ये काम करत होती. मोठी बहीण आर्किटेक्ट आहे. डॉक्टरेट करताना ते रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये नोकरी करू लागले आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आंद्र सखारोव यांच्याशी त्यांची मैत्री झाली. यानंतर त्यांनी सोव्हिएत संघात बेकायदा संगणक विक्री सुरू केली. त्यामुळे वडील नाराज झाले. मात्र घरच्यांच्या सहमतीने ते व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए करण्यासाठी गेले. यानंतर त्यांना जागतिक बँकेत नोकरी लागली. मात्र, यामुळे खूप वेळ वाया गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. १९९५ मध्ये मिलनर अलायन्स मेनटेप बँकेमध्ये सीईओ झाले. १९९७ - २००० मध्ये न्यू ट्रिनिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये संचालक होते तेव्हा त्यांनी मॉर्गन स्टॅनलेच्या अॅनालिस्ट मेरी मीकरचा ऑनलाइन बिझनेसवर एक रिव्ह्यू वाचला आणि त्यांनी इंटरनेट कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रेगरी फिंगर या मित्राच्या आर्थिक मदतीतून कंपनी सुरू केली. २००५ मध्ये युरीने डिजिटल स्काय टेक्नॉलॉजी नावाने नवीन गुंतवणूक कंपनी सुरू केली. २०१२ मध्ये त्यांनी ब्रेकथ्रू प्राइझ सुरू केला. हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार फंडामेंटल फिजिक्स, लाइफ सायन्सेस आणि मॅथ्ससाठी दिला जातो. ३० लाख डॉलर पुरस्काराची रक्कम आहे.

-जन्म : ११ नोव्हेंबर १९६१
-वडील : बेंटिसन जखरोविच मिलनर
-शिक्षण : माॅस्को स्टेट विद्यापीठातून पदवी, व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए
-कुटुंब : पत्नी जुलिया, २ मुली
-चर्चेत - त्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगसोबत एलियन संशोधनात पैसा गुंतवण्याची घोषणा केली आहे.