आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुही चावला आणि भारतीय साहित्यिकांची मांदियाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारत - पाकिस्तान फाळणीला 20 वर्षे झाल्यानंतर 1967 मध्ये जुही चावलाचा जन्म झाला. 1984 मध्ये ती ‘मिस इंडिया’ झाली, अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आणि कोट्यवधी मनांवर अधिराज्य गाजवते आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी अनेक लोक आजही पाकिस्तानात राहतात. पाकिस्तानी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सतीश आनंद त्यांच्यापैकीच एक आहेत. काही काळापूर्वी सतीशजींचे अपहरण करण्यात आले आणि प्रचंड मोेठी खंडणी भरल्यावरच दहशतवाद्यांनी त्यांची सुटका केली. दरम्यानच्या काळात ते कोठे राहिले, कोणत्या परिस्थितीत होते, यासंदर्भात आजही त्यांच्या तोंडाला कुलूप आहे. सतीशजींच्या घरच्या एका विवाहसोहळ्यासाठी जुही चावला तिचे पतिदेव जय मेहता यांच्यासह कराचीत आली, तेव्हा ती घाबरलेली दिसत होती. सतीशजींनी तिच्या व मेहतांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमले होते. ते सावलीप्रमाणे या दोघांच्या सोबत होते.

जुही चावला आणि जय मेहता दोघे सुखरूप मुंबईला परतले, तेव्हा सतीशजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जुही कराची शहरात फिरत होती, तेव्हा तिला मुंबईत फिरत असल्याचा भास होत होता. साहजिक आहे, कारण ही दोन्ही शहरे इंग्रज, हिंदू आणि पारशी समाजाने मोठ्या ममतेने आणि मेहनतीने स्थापन केली आहेत. जुहीने काळ्या काचांच्या गाडीतून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कराची शहरातून फेरफटका मारला आणि बुरखा घालून शहरातील प्रसिद्ध शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्समध्येही फिरून आली. तिच्या या दौºयाच्या ओघाने मला जाणवले की, फाळणीने हिंदू कुटुंबांचेही सीमेच्या दोन्ही बाजूला विभाजन केले. यामध्ये सिंध प्रांतातील कराची, शिकारपूर आणि हैदराबादच्या लोकांना सर्वाधिक झळ बसली. हैदराबाद हे सिंधी कुटुंबांनी वसवलेले एक सर्वात सुंदर शहर होते.

हिंदुस्थानी चित्रपट जगतातील एक विनोदवीर गोप हैदराबाद येथेच जन्मले. येथून ते प्रथम कराचीला नंतर तेथून मुंबर्ईत गेले. तेथे त्यांनी दिलीपकुमार, मधुबाला, नर्गिस यांच्यासह अनेक चित्रपटांतून काम केले. बॉलीवूडमधील सध्याच्या आघाडीच्या नायिका करिना आणि करिश्मा कपूर या दोघींची आई बबिता मुंबईत जन्मली, तर तिची चुलत बहीण साधना कराचीत जन्मली, पण दोघींनीही हैदराबाद येथे बराच काळ घालवला. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा जन्म कराचीत झाला, पण हैदराबादशी त्यांचे विशेष नाते आहे. सिंधी हिंदूंचा फक्त चित्रपटसृष्टीशीच नव्हे, तर साहित्यजगताशी गाढ संबंध आहे. सिंध प्रांतातील प्रसिद्ध साहित्यिक पोपटी हिरानंदानी, सिंधी शायरा सुंदरी, पत्रकार हरी मोटवानी आणि रेडिओ क्लबच्या सदस्या शीला धर्मदास अ‍ॅडव्होकेट यांचेही हैदराबादशी अतूट नाते आहे. सिंध प्रांतातून जाणाºया साहित्यिकांचे आगमन आणि साहित्य संमेलनात सहभागी होण्यास आता हळूहळू सुरुवात होत आहे.

सिंध प्रांतातील प्रसिद्ध शहर भट्टशाह येथील प्रसिद्ध सिंधी शायर लतीफ शाह यांचा 269 वा उरूस काही दिवसांपूर्र्वी साजरा झाला. मी त्या उरुसामध्ये सहभागी झाले. मजारसमोर नतमस्तक झाले आणि शाह यांच्याविषयी आयोजित परिसंंवादात म्हटले की, आज आपण ज्या जागेवर उभे आहोत, तेथे गेल्या 269 वर्षांपासून तो माणूस चिरनिद्रा
घेत आहे, ज्याने गोसावी आणि भटक्यांसोबत फिरून आपल्या प्रदेशाचा कानाकोपरा पाहिला. त्याच्या जटा आणि पाय सिंधच्या मातीशी एकरूप झाले. हुकूमशहाच्या पायाची धूळ होण्याखेरीज दुसरा पर्याय नसलेल्या, हल्लेखोर घोडेस्वारांनी ज्यांना तुडवले अशा लोकांचा तो आवाज बनला. हा तोच माणूस आहे, ज्याच्या शब्दांचा नाद आसमंत व्यापून राहतो आणि ज्ञात-अज्ञात लोकांच्या मनामनात वास करतो. ज्याच्या शायरीने सिंध प्रांताची धरती शृंगार करते आणि ज्याच्या कहाण्यांमधून जिवंत असलेल्या ससी, मारवी, मोमल, सोहनी, लैला, नूरी आणि हीरचा सुगंध आजही सर्वत्र दरवळतो आहे.

सिंध प्रांताच्या मंत्री सिसियो पालिजो त्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अहमदाबादचे डॉ. हीरू ठाकूर आणि जेठू ललवाणी यांनीही या परिसंवादात सहभागी होत आपले मौलिक विचार व्यक्त केले. भारतात नावारूपाला येत असलेल्या सिंधी साहित्यिकांमध्ये डॉ. ठाकूर आणि ललवाणी यांचे नाव आदराने घेतले जाते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असावेत असे वाटणाºया सर्वांनाच लेखक आणि कलाकारांच्या या मांदियाळीनिमित्त अनेक शुभेच्छा!