आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीस गेलेले १०० कोटींचे पेंटिंग केले परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाब्लो पिकासोचे एक आॅइल पेंटिंग फ्रान्सला परत केले आहे. हे पेंटिंग १४ वर्षांपूर्वी पॅरिसच्या संग्रहालयातून चोरीला गेले होते. ला काॅयफियूस (द हेअर ड्रेसर) नावाचे हे पेंटिंग पिकासोने १९११ मध्ये बनवले होते. सुमारे दीड कोटी डाॅलर म्हणजे ९८ कोटी रुपयांचे हे पेंटिंग अमेरिकेतील न्यूजर्सीतून हस्तगत केले होते. त्या वेळी ते बेल्जियमहून न्यूयाॅर्क येथे नेले जात होते. त्यावर लावलेल्या लेबलवर केवळ हस्तशिल्प असल्याचे दाखवले होते आणि किंमत केवळ ३७ डाॅलर दाखवली होती. अमेरिकन इमिग्रेशन आणि कस्टम विभागाच्या (आयसीई) अधिकाऱ्यांनी हे पेंटिंग वाॅशिंग्टन येथे फ्रान्स दूतावासाला सोपवले. वृत्तसंस्था रायटरने आयसीईच्या संचालिका सारा सलदाना यांच्या हवाल्याने आम्ही खूप आनंदी असल्याचे सांगितले. हे पेंटिंग पुन्हा एकदा लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. या पेंटिंगला जर्मनीतील म्युनिच येथे १९८८ मध्ये शेवटचे पाहण्यात आले होते.