आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88th Marathi Sahitya Sammelan Logo Publish By Uddhav Thackeray

साहित्य महामंडळाचा आपमतलबीपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपमतलबी आणि संधिसाधू धोरण कसे राबवायचे हे फक्त राजकारण्यांनाच जमते हा समज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यंदादेखील खोडून काढला आहे. साहित्य महामंडळाने व अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सरड्याप्रमाणे सहजपणे रंग बदलला आहे. मराठीचा जाज्वल्य अभिमान बाळगणार्‍या (?) शिवसेनेच्याच दिवंगत हिंदुहृदयसम्राटांनी एकेकाळी दादरला वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात साहित्यिकांना ‘बैल’ म्हटले होते. आज त्यांचाच वारसा चालवणारे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर घुमान येथे होणार्‍या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. चिपळूण येथे मागील वर्षी झालेल्या संमेलनात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देण्यास ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे व प्रज्ञा पवार यांनी कडाडून विरोध केला असता त्या वेळचे उद्घाटक शरद पवार यांनी मात्र ठाकरे यांचेच नाव देण्यात यावे, असे सांगत हा निर्णय तडीस नेला होता. मात्र, सत्ताबदलाचे वारे व उद्धव यांच्या बाजूने निर्माण झालेले राजकीय संकेत लक्षात घेऊन शरद पवारांना बाजूला सारून आता उद्धव यांना साहित्य महामंडळाच्या गाठीस धरले आहे. उद्धव यांनीही आयत्याच चालून आलेल्या या संधीला आपल्या पारड्यात टाकत लगेचच संत नामदेवांचे घुमानला राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा करत साहित्याविषयीची ‘बांधिलकी’ दाखवली. नारायण राणेंचा राजीनामा, देशात झालेली आघाडी सरकारची दोलायमान अशी सद्य:स्थिती पाहता हा सोहळा ‘मातोश्री’वर का झाला, याचे उत्तर सहज लक्षात येते. साहित्यात राजकारण आणू नये म्हणतात; पण ते ओघाने येते आणि त्याला आपमतलबी स्वरूप येते. शिवाय शिवसैनिक अपमान विसरत नाहीत; पण साहित्यानुयायी मात्र ‘बैल’ म्हटल्याचा अपमान सोयिस्करपणे विसरल्याची जाणीव ‘बोधचिन्हा’च्या प्रकाशन सोहळ्यावरून होते. वाचकांना साहित्य संमेलनाचे धोरण राजकीय बदलानुसार ठरते की काय, असे न वाटल्यास नवल!