Home | Editorial | Columns | Kalpesh Yagnik article on GST

इतिहास पर्व: जीएसटीची वर्षपूर्ती, वर्तमान भूतकाळाने झाकणे, भविष्य घडवण्याचा प्रयत्न

कल्पेश याज्ञिक | Update - Jul 01, 2018, 09:22 AM IST

जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू झाला त्याची आज वर्षपूर्ती. म्हटली तर तशी सामान्य बाब.

 • Kalpesh Yagnik article on GST

  जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू झाला त्याची आज वर्षपूर्ती. म्हटली तर तशी सामान्य बाब. परंतु ‘ऐतिहासिक’ म्हटली जाऊ शकते. इतिहासाला विद्वान आपल्या सोयीनुसार वाचतात. योग्यतेनुसार मांडत असतात. त्यात भर घालत असतात.


  एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री जीएसटी लागू करण्याची घोषणा करण्यासाठी समारंभ आयोजित केला होता. ही गोष्ट संपूर्ण देशाला आजही आठवते. मध्यरात्री अशी बैठक केवळ स्वातंत्र्य (१९४७), स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष (१९७२) व सुवर्णमहोत्सवी वर्ष (१९९७) साजरे करण्यासाठी बोलावली गेली होती. देशासाठी तो संघर्ष सर्वात महान आहे. जीएसटी काय किंवा काेणतीही गोष्ट त्याच्या समतुल्य ठरू शकत नाही. म्हणूनच मोदींनी त्याची तुलना छोट्या-छोट्या संस्थानांच्या विलीनीकरणाशी जोडली. छोट्या-छोट्या करांना एका राष्ट्रीय करामध्ये विलयाचा हा दिन. हे अधिक संयुक्तिक म्हणावे लागेल. नोटबंदीच्या वर्षात ९९ टक्के रोख पुन्हा बँकांत जमा झाली आणि बंद होण्याच्या पूर्वी रोकड बाजारात दाखल झाली. अर्थात अपयश. जीएसटीबाबत असे घडले नाही. ‘भास्कर’ च्या अभ्यासानुसार स्वातंत्र्यानंतर एखाद्या सरकारने सर्वात जास्त कमाई करणारा जीएसटी हा पहिलाच उपक्रम ठरला.


  परंतु प्रत्येक इतिहासाला आपल्या कौशल्याशी जोडून पाहणे संकट आेढवणारे ठरते. देशाच्या राजकारणात नेमके हेच घडून येताना दिसते.
  सध्या संत कबीरांच्या इतिहासावर राजकारण केले जात आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रत्येक हालचालीला २०१९ च्या तयारीशी जोडून पाहिले जात आहे. हेही ठीक आहे. कारण उत्तर प्रदेशात विजय म्हणजे देशभरात विजयाची वाटचाल होय. परंतु मगहरमध्ये मोदींनी कबीर, गुरू नानक व गोरखनाथ यांच्या बाबत विधान केले होते. ते वादग्रस्त ठरले. खरे तर ते सर्व समकालीन नव्हते. काहीच कळायला मार्ग नाही. कोणाकडेच प्रामाणिकपणा नाही.
  आणीबाणीचेच उदाहरण घ्या. ४३ वर्षांपूर्वी २५ जूनची ही घटना. काँग्रेसवर टीका करण्याची ही संधी मानली जाते हे चकित करणारे आहे. त्यावरून इतिहासाचा दुरुपयोग करणे सर्वात सोपे असते, हेच यावरून स्पष्ट होते. इंदिरा गांधींना ‘हिटलर’ संबोधले जाते.
  इतिहासाने वर्तमानाला झाकल्याने कोणाचे भविष्य घडवता येत नाही. परंतु तेच होताना दिसते. घडू लागले आहे.


  इतिहास किंवा ऐतिहासिक क्षणही दोन प्रकारचे असतात. एक घडून गेलेला अर्थात इतिहासजमा. दुसरा क्षण नवीन रचला जाणारा. अभूतपूर्व असलेला हा क्षण पुढे नवा इतिहास ठरतो.
  काँग्रेसने तर प्रत्युत्तरात मोदींना आैरंगजेब असे घोषित केले. पण देश एका क्षणासाठी तरी ही गोष्ट स्वीकार करेल का ? एकविसाव्या शतकातील भारतात विकास किंवा विकासाच्या नावाने मते मागितली पाहिजेत ? नेत्यांनी आता परस्परांना इतिहासातील भयानक खलपात्रांच्या नावांनी संबोधणे टाळले पाहिजे. काही प्रश्न पडतात. टोपी-टिळा यांना सातत्याने चर्चेत का आणले जाते ? कोणत्याही राजकीय पक्षांना जनतेचे भय का वाटत नाही ? खरे तर ते सत्ता-लोभात मदांध झाले आहेत. मग त्यांना भय तरी कशामुळे असेल ? महाभारतात शुक्राचार्य म्हणतात, मधाच्या लोभात असलेला माणूस मधाची पोळी पाहून ती मिळवताना आपण उंचावरून पडू याचाही विचार करत नाही. निडर असलेले, मधाचे लालची पुरुष तेथे जातातच. हा मध काहींना मिळतोही, ही गोष्ट वेगळी.

Trending