आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निखळ ज्ञानासाठी अखंडित वाचीत जावे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक, मोबाइल जरी हातात आला तरी पुस्तकांमधून जे ज्ञान मिळते, ते इतर कशातूनच मिळू शकत नाही. त्यामुळे आजच्या तरुणांना पुस्तके वाचण्याची अत्यंत गरज आहे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे आपण सर्वांनी ज्ञान मिळवण्यासाठी दिवसातले काही तास पुस्तके वाचण्यात घातली तर आपल्याकडे शब्दरूपी भांडार कायमस्वरूपी राहील.हे भांडार आपण कधीही, कोठेही आणि कशासाठीही (सकारात्मकपणे) वापरू शकतो. यासाठी वाचनाची गोडी असणे आवश्यक आहे. आणि हि गोडी पालकांनी बालवयातच आपल्या पाल्यांना लावणे आजच्या काळाची  गरज आहे.

 

वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलीकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात.


एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर ती आपण टाकून ठोकून लावू शकतो. सकाळी एक तास व्यायामाची सवय व्यायाम करायला लावून लागू शकते. पण व्यायामाची गोडी त्याने निर्माण होणार नाही. वाचनाच्याही गोडीचं तसंच आहे. मुलांना ‘’आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!’’ असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणे ही मूलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्त्वाची भूमिका बजावता येईल. 


पालकांचाच विचार करायचा झाला तर किती घरात मुलांना वाचनासाठी उद्युक्त केलं जातं? ‘’अभ्यास कर!’’ हा मंत्र सतत मुलांच्या कानावर बिंबवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांना घेऊन देणं हे सामान्यतः: घडत नाही. याला काही सुजाण पालकांचे अपवाद असतीलही, पण सामान्यतः अभ्यासाचं पुस्तक घेऊन मुलं 
बसली आहे.

 

आई वडील ते कौतुकाने बघताहेत अशावेळी त्यांच्या तोंडावर समाधान फुललेलं दिसेल. तेच मुल इतर कुठलं पुस्तक हातात घेऊन बसलेलं दिसलं की कपाळावर सूक्ष्म आठ्या चढल्याचे! ‘’काय रे काय वाचतो आहेस?’’ परीक्षा जवळ आली आहे ना?अभ्यास झाला का? हा प्रश्न येतोच.  परीक्षा जवळ आली की मुलांनी फक्त अभ्यासाची पुस्तकं वाचायची? अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी थोडावेळ इतर वाचनात घालवणं गरजेच असणे हे पालकांना का समजू नये?. सतत एक तंत्री काम असलं की मोठी माणसं विरंगुळा म्हणून दुसरं काही तरी शोधतातच. मुलांनाही असा विरंगुळा मिळाला तर ती जास्त ताजीतवानी होऊन तल्लख मेंदूने अभ्यास करतील. किती पालक स्वत: पुस्तकं वाचतात? घरात मोठी माणसं पुस्तक वाचन करीत असतील तर लहानपणापासून मुलाला वाचन या क्रियेचं कुतूहल निर्माण होतं. आई-वडील किंवा घरातलं मोठं माणूस पुस्तक वाचत असेल तर एखादं दोन-तीन वर्षाच मुल त्यावेळी अगदी गप्प राहून मिळेल तो कागदाचा कपटा पुढे ठेवून वाचण्याचे नाटक करतं. एका परीने ते मोठयांच अनुकरण करतं. पण त्याचबरोबर वाचन या गोष्टीत काही तरी वेगळं आहे, काहीतरी आनंददायी आहे, त्यात रंगून जाणं याला खात्रीचा काहीतरी अर्थ आहे हे त्या बालमनात नकळत रुजणं, वाचनाची गोडी निर्माण होण्याची पहिली पायरी इथे सुरू होते.

 

खरं तर घरातली मोठी माणसं आणि मुलं एकाचवेळी शांतपणे वाचत बसली आहेत हे दृश्य टिपून ठेवण्यासारखं आहे. पण हे किती घरात घडतं? ‘मुलांच्या आणि आमच्या वाचनाच्या वेळा जमत नाही’’. हे कारण नेहमीचच. मुलं टिव्ही बघतात, त्यांच्यावर नको त्या कार्यक्रमांचे परिणाम होत असतात. असे म्हणणाऱ्या-या पालकांनी टिव्हीला सुंदर पुस्तकांचा पर्याय मुलांना दिला आणि वाचनासाठी शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करून दिलं तर टिव्हीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मोठ्या घरांमध्ये स्वतंत्र खोली देणंही शक्य असत मात्र ती खोली त्यांच्या आवडत्या पुस्तकांनी भरलेली असायला हवी. असा प्रयोग केलेला आणि सफल झालेला आहे. ज्यांनी केला नाही त्यांनी करून पाहण्यासारखा आहे. 


-किशोर कांबळे, 
दिग्रस जि. यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...