आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; महासत्तेच्या पाऊलखुणा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१७ ला निराेप देत असतानाच दाेन सुखद बातम्यांनी भारतीय अर्थकारणाचा चेहरा खुलला. शेअर बाजारातील निर्देशांकाने (सेन्सेक्स) पहिल्यांदाच अशी काही उसळी घेतली की, ताे ३४ हजारांवर पाेहाेचला. गेल्या पाच वर्षांचा विचार करता २०१७ हे गुंतवणूकदारांसाठी दुसरे सर्वाेत्तम शुभदायक वर्ष ठरले. यापूर्वी २०१४ मध्ये निर्देशांकाने २९.४ टक्के वाढ नाेंदविली हाेती. देशांतर्गत वित्तीय संस्थांनी जेवढे शेअर्स विकले त्यापेक्षा ५४४ काेटींचे शेअर्स खरेदी केले. शिवाय ४४ काेटींची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनीदेखील केली. त्याच वेळी ‘सीईबीअार’चा अहवाल अाला. साहजिकच अत्यानंदाने निर्देशांकही उसळला. काही दशकांपासून अार्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न तमाम भारतीय पाहत अाहेत. अाता ते दिवस अगदी जवळ येऊन ठेपले असल्याचेच संकेत या अहवालाने दिले. नाेेटबंदी, जीएसटीचे निर्बंध यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला दिसत अाहे. तथापि, ब्रिटन अाणि फ्रान्सला पिछाडीवर टाकून भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यात वर्तवण्यात अाला अाहे. येत्या काही वर्षांत वीज अाणि तंत्रज्ञान हे स्वस्त दरात उपलब्ध हाेण्याची चिन्हे अाहेत. परिणामी विशेषत: अाशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवू लागतील. त्यात भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व अधिक असेल. जगातील अग्रणी १० अर्थव्यवस्थांच्या यादीत २०१८ मध्ये अाशियाई देशांचे प्रभुत्व असेल, असेही अहवालात म्हटले अाहे. अर्थातच यामुळे विदेशी गुंतवणूकदारांची पावले भारताकडे वळू लागतील, अशी अाशा अाहे. 


या पार्श्वभूमीवर अार्थिक महासत्ता बनण्यासाठी भारताला काय करावे लागेल हा मुद्दादेखील तितकाच महत्त्वाचा ठरताे. केवळ अार्थिक सुधारणा करून ते शक्य हाेणार नाही. बहुतांश यशस्वी देशांचा विचार करता प्रामुख्याने ज्या बाबी निदर्शनास येतात त्यापैकी काेणत्याही प्रकारच्या हिंसाचारावर नियंत्रण राखण्यात सरकार सक्षम असायला हवे. स्वखुशीने कर भरण्यात जनता तत्पर असावी. कुशल न्यायव्यवस्था अाणि सेवा उपलब्ध असावी. जर या बाबींची पूर्तता हाेत असेल तर ताे देश भांडवलशाही, समाजवादी, लाेकशाहीवादी की हुकूमशाहीचा पुरस्कार करणारा अाहे हे मुद्दे महत्त्वाचे ठरत नाहीत. या मुद्द्यावर काम करण्यास भारताला पुरेसा वाव अाहे. याशिवाय समाज मजबूत अाणि गतिशील असणेदेखील तितकेच महत्वाचे ठरते. म्हणूनच केवळ ‘जीडीपी’चा दर वाढवल्याने सुधारणा दिसणार नाहीत तर ‘बदल घडवण्यासाठी’ सुधारणा व्हायला हव्यात. मूलत: समाज हा बाह्यरूपाने नव्हे तर अातमधून सांस्कृतिकदृष्ट्या बदलत असताे. जेव्हा हा बदल घडू लागताे तेव्हा प्रगतिशील समाजाची विचारप्रणाली अाणि पराेपकार करण्याची प्रवृत्ती अधिक सक्रिय हाेते. नेमका असा बदल घडवण्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी कितपत यशस्वी ठरतात हे तितकेच महत्त्वाचे अाहे. खरे तर १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली; त्या वेळी देश भीषण अार्थिक संकटात हाेता. तरीही जागतिकीकरण, अार्थिक उदारीकरण अाणि खासगीकरणाची वाट चाेखाळत त्यांनी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे भारताला त्या गर्तेतून बाहेर काढले. अाज महासत्ता बनण्याचे स्वप्न जे भारत पाहताे अाहे, ते त्यांच्याच द्रष्टेपणाचे फळ हाेय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. नरसिंह राव यांचे नवे आर्थिक आणि मुक्त व्यापार धोरण लोककल्याणकारी, लोकशाहीसाठी उपयुक्त होतेच; शिवाय अनेक संकटांवर मात करण्याचा तो रामबाण उपायही होता. त्यास जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच त्यांनी थेट परकीय गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्यासाठी ‘परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ’ स्थापन केले. उल्लेखनीय म्हणजे उद्याेग-उद्याेगपती अाणि जनतेच्या हिताला, स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घेतली. आर्थिक उदारीकरण आणि मुक्त व्यापार धोरणाला २६ वर्षे पूर्ण झाली अाहेत. पी.व्ही. नरसिंह राव यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष हाेताना अाता अापण पाहत अाहाेत. अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स काैन्सिल’च्या ‘ग्लाेबल ट्रेंड्स २०३० - अल्टरनेटिव्ह वर्ल्ड््स’ या अहवालातदेखील २०३० पर्यंत भारताला उगवती अार्थिक महासत्ता अशी अाेळख मिळेल, असे भाकीत वर्तवले हाेते. चीनचा सध्या जेवढा दबदबा अाहे ती उंची भारत २०३० पर्यंत गाठेल. चीनचा सध्याचा विकास दर ८ ते १० टक्के असला तरी २०३० पर्यंत त्यात सातत्य राहणार नाही, भलेही चीन अाघाडीवर राहिला तरी भारताची विलक्षण गतीने भरभराट हाेईल अाणि दाेन्ही देशांतील अार्थिक दरी कमी हाेईल. भारताला २०५० पर्यंत काम करणाऱ्या हातांची काळजी असणार नाही. सध्या भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत अाठपट अधिक अाहे, तर २०३० पर्यंत १६ पटींनी माेठी असेल. अर्थातच ही निरीक्षणे असली तरी भारतीय अर्थकारणाची एकंदर वाटचाल लक्षात घेता अार्थिक महासत्तेच्या वाटेवरील या पाऊलखुणा ठरतात हेे निश्चित.


- श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...