अमेरिकेचा रशियाला इशारा / अमेरिकेचा रशियाला इशारा (अग्रलेख)

गेली काही वर्षे सिरियातील असाद सरकारला नेस्तनाबूत करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न नाटो गटाकडून होत आहेत. पण त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. सिरियाच्या विरोधात थेट युद्ध पुकारणे हे नाटोला परवडणारे नाही व त्यातून तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती असल्याने अमेरिका छोट्या स्वरूपाच्या लष्करी कारवायांवर भर देत आले आहे. अमेरिकेने आजपर्यंत ज्या देशांवर हवाई हल्ले वा लष्करी कारवाया केल्या आहेत त्याआधी अमेरिका हल्ले करण्यामागचे सबळ कारण शोधत असते. या कारणाच्या आडून अमेरिका स्वत:च्या प्रभावाखालच्या मित्रदेशांची एक मोट बांधते व कारवाया केल्या जातात. इराकमध्ये सद्दाम हुसेनची राजवट संपवण्यासाठी अमेरिकेने सद्दाम हुसेन आपल्याच विरोधकांवर रासायनिक अस्त्रे डागत असल्याचा आरोप करत इराकला उद्ध्वस्त केले होते. प्रत्यक्षात सद्दाम हुसेन राजवटीकडून कोणतीही रासायनिक अस्त्रे वापरली नव्हती, असे नंतर अनेक चौकशा, अहवालातून सिद्ध झाले होते व तशी कबुलीही अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिली होती. आता सिरियाला पर्यायाने त्याचे घनिष्ठ मित्र इराण व रशियाला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने शनिवारी सिरियातील डौमा या गावावर शंभरहून अधिक क्षेपणास्त्रे डागली व तेथील रासायनिक अस्त्रे नष्ट केली, असा दावा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमची कामगिरी फत्ते झाली, असे ट्विट करून शत्रुराष्ट्रांना जरब बसली असा दावा केला आहे. त्यांचा दावा विरोधकांनी फेटाळला आहे. डौमामध्ये किती रासायनिक अस्त्रे होती याची कोणतीही माहिती अमेरिका वा नाटो राष्ट्रांनी जगापुढे ठेवलेली नाही. उलट डौमामध्ये रासायनिक अस्त्रे आहेत असा नाटो राष्ट्रांचा दावा झाल्यानंतर ‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ ही संस्था घटनास्थळी दाखल होत असताना हे हल्ले झाले आहेत. म्हणजे या संस्थेकडून तसा कोणताही अहवाल व प्रतिक्रियाही आलेली नाही. तरीही अमेरिकेने रासायनिक अस्त्रे असल्याचा दावा करत सिरियावर हल्ले केले. इराककडे रासायनिक अस्त्रे आहेत असा दावा करतानाही अमेरिका-नाटो राष्ट्रांनी जगापुढे प्रत्यक्ष पुरावे ठेवले नव्हते, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. गेल्या वर्षीही अमेरिकेने सिरियावर क्षेपणास्त्र हल्ले केले होते, पण त्या वेळी रासायनिक अस्त्रांचे कारण पुढे केले नव्हते. आताच रासायनिक अस्त्रांचा दावा का केला जातोय हा कळीचा मुद्दा आहे.

दिव्य मराठी

Apr 16,2018 02:00:00 AM IST

या विषयाच्या संदर्भात सिरियातील सद्य परिस्थिती पाहिल्यास असे दिसते की, असाद सरकारने बंडखोर व इसिसच्या नाकात बराच दम आणला असून जवळपास त्यांनी संपूर्ण सिरिया ताब्यात घेतला आहे. जो भाग बंडखोर, कुर्दीश टोळ्या वा इसिसच्या ताब्यात होता तेथे यांचे प्राबल्य कमालीचे कमी झाले आहे. इराण व रशिया सातत्याने सिरियाच्या पाठी उभा राहिल्याने अमेरिका व नाटोपुढे पश्चिम आशियाच्या राजकारणात एक तगडी प्रतिस्पर्धी शक्ती-गट जन्मास आला आहे.

म्हणून सिरियावरचा हल्ला हा रशियाला दिलेला एक अप्रत्यक्ष गर्भित इशारा आहे. या इशाऱ्यात रशियाने सिरिया यादवीतील आपले हितसंबंध मागे घेण्याचा दबाव आहे, शिवाय रशिया व इराणची जी मैत्री वाढली आहे त्यावरही नाटो राष्ट्रांचा आक्षेप आहे. हा आक्षेप अर्थातच इस्रायल-सौदीच्या दबावामुळे आहे. या दोन देशांचे इराणशी कसे सख्य आहे हे जगाला माहिती आहेच.

डौमावर हल्ले करताना अमेरिकेने एक खबरदारी घेतली की त्यांनी सिरियातील रशियाच्या तळांवर हल्ले केले नाहीत. तसे केले असते तर रशियाने निश्चितच प्रत्युत्तर दिले असते व परिस्थिती अधिकच चिघळली असती. आता रशिया या हल्ल्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागत आहे व खरे सत्य जगापुढे आणण्याचा आग्रह धरत आहे. जे सत्य काही असेल ते पुढे येईल, पण ट्रम्प यांच्या आक्रस्ताळ्या व निर्बुद्ध निर्णयाने पश्चिम आशियातील वातावरण अधिकच पेटत जाईल अशी चिन्हे आहेत. सध्या ट्रम्प त्यांच्या काही वादग्रस्त धोरणामुळे अमेरिकेत अगोदरच बदनाम झालेले आहेत. त्यांच्या प्रशासनात सगळा सावळागोंधळ आहे. याचा परिणाम आपल्या प्रतिमेवर होऊ नये म्हणून त्यांनी सिरियावर हल्ले केले असे म्हणण्यास वाव आहे. हे हल्ले झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरेस यांनी, जगावर सूड व मतभेदांमुळे पुन्हा शीतयुद्धाचे ढग गोळा झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ती विचार करण्यासारखी आहे. कारण हे युद्ध पेटल्यास जगाचे राजकारण बदलेलच; पण त्याने भारतासारख्या अन्य शेकडो विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थाही होरपळतील.

X
COMMENT