आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहमखास यश मिळवायचे तर दृष्टिकाेन बदला, सकारात्मक विचार करा, असे बहुतेक जण हल्ली बाेलतात. परंतु खरा प्रश्न अाहे ताे अामच्या विचारांमध्ये सकारात्मता अाणायची कशी? ती येते तरी काेठून? जर नेमके हे कळू शकले तर विचारांची वृत्ती-प्रकृती बदलणे अशक्य मुळीच नाही. अर्थातच ही बाब अधिक साेप्या पद्धतीने सांगायची तर अापला मेंदू हा संगणक अाणि शरीर हे हार्डवेअर, मेंदू हा साॅफ्टवेअर अाहे असे क्षणभर गृहीत धरले तर लक्षात येईल की, मेंदू अापल्या शरीरास नियंत्रित करीत असल्याचे बहुतेक वेळा अापण विसरताे. सहजप्रवृत्ती (बाय डिफाॅल्ट) प्रमाणे त्याची निगेटिव्ह प्राेग्रामिंग सुरू असते, ज्याद्वारे नकारात्मक परिणाम अनुभवायला येत असतात. कारण प्रत्येक कार्य हे दाेन वेळा घडत असते.
एक म्हणजे विचारांच्या रूपात मेंदूत अाणि दुसरे म्हणजे त्याच्या परिणामस्वरूप प्रत्यक्षात. अर्थातच या कार्यान्वयन प्रणालीच्या अाधारावर विचार उत्पन्न हाेतात अाणि शरीर त्याचे क्रियान्वयन करीत असते. वस्तुत: मेंदू म्हणजे विचारांचा जणू कारखानाच अाहे. गतकाळातील दृष्टिकाेन हा कच्च्या मालाच्या रूपात येथे साहाय्यभूत ठरत असताे, जाे अापल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करीत असताे. म्हणूनच दृष्टिकाेन बदलण्याचा अाग्रह भास्कर समूह सातत्याने वाचकांना करताे अाहे.
केवळ दृष्टिकाेन बदलला तर त्यापाठाेपाठ परिणामही बदलत असल्याचे मानसशास्त्रीय संशाेधनातून सिद्ध झाले अाहे. वाचकांच्या जीवनावर बातम्या किती सकारात्मक परिणाम करतात याचा उत्तम वस्तुपाठ भास्कर समूहाच्या ‘नाे निगेटिव्ह न्यूज’ने घालून दिला. ‘मार्केट सेपियन्स’, ‘इप्साॅस’ या जगद््विख्यात संशाेधन संस्थांनीदेखील भास्कर समूहाचे नाे निगेटिव्ह वर्तमानपत्र वाचल्यानंतर काही तासांनंतरही सकारात्मक परिणाम जाणवत राहत असल्याचे संशाेधनाअंती प्रमाणित केले. ‘नाे निगेटिव्ह न्यूज’च्या तृतीय वर्धापनदिनी अाज विशेष जॅकेटसह सकारात्मक बातम्या असलेले वृत्तपत्र वाचकांच्या हाती देताना अाम्हाला अत्यानंद हाेत अाहे.
सकारात्मक बातम्या वाचल्याने केवळ अानंद मिळताे असेच नव्हे, तर विचारांवर अापल्या दृष्टिकाेनावरदेखील परिणाम हाेताे. अापणास हवे ते मिळवू शकताे अाणि ती क्षमता अापल्यात असल्याचे जाणवते असे संशाेधनातून निदर्शनास अाले अाहे. सकारात्मक विचारांचा प्रभाव जसा वाढत जाताे तसे अापल्या जीवनात अानंद, समाधानदेखील वाढत राहताे. इतकेच नव्हे तर सकारात्मक बातम्या, विचार वाचकांना प्रेरितदेखील करतात. काम करताना ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने सकारात्मक झालाे अाहाेत, असे संबंधित व्यक्तीस वाटू लागते. त्याचबराेबर चांगला समाज घडवण्यासाठीदेखील ताे सकारात्मक याेगदान देऊ शकताे हे भास्कर समूहाने हेरले अाणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्यास सुरुवात केली.
समाजात अवतीभोवती अनेक भल्याबुऱ्या घटना घडत असतात. त्याचा समाजमनावर विलक्षण परिणाम हाेताे. काही घटना तर अक्षरश: पिढ्यान्््पिढ्या मनावर काेरल्या जातात. त्यातून समाजाला अनेक दुर्दैवी, दु:खद घटनांना अाजही सामाेरे जावे लागते ही वस्तुस्थिती अाहे. मात्र राजकारणासह अनेकविध क्षेत्रांत जे काही चांगले-सुखद घडत अाहे ते समाजासमाेर अाग्रहाने मांडण्याचा अाणि या माध्यमातून सकारात्मक समाजमन घडवण्याचा प्रयत्न भास्कर समूह करीत अाहे.
सकारात्मता अंगी बाणवून घेणे हे तितकेसे साेपे काम नाही हे खरे असले तरी हा सकारात्मक दृष्टिकाेन अात्मसात करणेदेखील फारसे कठीणही नाही. अाजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बहुतेक वेळा ‘लाेक काय म्हणतील’ हा दृष्टिकाेनच काही वेळा सकारात्मकतेलादेखील नकारात्मकतेकडे खेचताे हे खरेच; परंतु अाचरणातील बदल अाणि सकारात्मक विचारांच्या बळावर त्यापासून बचाव करणे शक्य अाहे. सतत नकारात्मक विचार केल्याने अनेक अाजारांना अायते घर मिळते. म्हणूनच प्रत्येक वेळी स्वत:ला किंवा इतरांना दाेष देण्याएेवजी दृष्टिकाेन बदलणे केव्हाही सुखद ठरते. त्यासाठी अगाेदर स्वत:च्याच दृष्टिकाेनाचे अाकलन अर्थात अात्मपरीक्षण करणे, सहज उत्पन्न हाेणाऱ्या नकारात्मक विचारांना अावर घालणे अाणि अाशावादी जीवन व्यतीत करणे, परिस्थितीशी याेग्य संतुलन साधणे या पद्धतींचा अवलंब केल्यास सकारात्मकता सहज अंगवळणी पडेल हे नि:संशय.
अापल्या दिनचर्येची, कामाची सुरुवात किमान ध्यान, संगीत अशा माध्यमातून केली, तर मेंदूत डाेपामाइन द्रव्य तयार हाेते अाणि ते काही वेळासाठी व्यक्तीचा मूड चांगला बनवते, उत्साहित करते अाणि लक्ष केंद्रित करण्यातही याेगदान देते. वैद्यकीयदृष्ट्या डाेपामाइनच्या दीर्घ प्रभावाच्या अवधीवर अजून शिक्कामाेर्तब व्हायचे अाहे. तथापि, एक छाेटासा प्रयत्न अापले जीवन अामूलाग्र बदलवू शकताे हेही नसे थाेडके!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.