Home | Editorial | Agralekh | Kalpesh Yagnik writes about kashmir issue

काश्मीर पर्व: राजकारणाचे सहा गुण, अनेक अवगुण व वादळात नाविकाची परीक्षा

कल्पेश याज्ञिक | Update - Jun 24, 2018, 09:16 AM IST

जसे किनारा समुद्राला रोखतो- अगदी तसेच सत्तेचा लोभ नेत्यांना राजकारणात रोखून ठेवतो. काश्मीरमध्ये असेच झाले. असेच होत आले

 • Kalpesh Yagnik writes about kashmir issue

  जसे किनारा समुद्राला रोखतो- अगदी तसेच सत्तेचा लोभ नेत्यांना राजकारणात रोखून ठेवतो. काश्मीरमध्ये असेच झाले. असेच होत आले आहे. प्रचंड विरोधानंतरही, मतभेद विसरून विरोधी पक्ष तत्काळ मित्र झाले आणि एकत्र येऊन सत्ता मिळवली.
  जसे इंधन उष्णतेत आपोआप जळते-तसेच स्वार्थासाठी झालेले शत्रू, अखेर मैत्री स्वत:च संपवतात. मेहबूबा मुफ्तींच्या पक्षात पाकिस्तान समर्थकांचा पूर्ण भरणा आहे. लष्कराचा त्यांना राग आहे. दहशतवाद्यांबद्दल सौम्य भूमिका घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजप या सर्व मुद्द्यांवर पूर्णपणे विरोधी आहे. कठोर आहे.


  पानगळ आली की जशी पाने आपोआप गळून पडतात- अगदी तसेच मोदी-मुफ्तींचे आघाडी सरकार निवडणुकीच्या चाहुलीने पडले. पडणारच होते.
  महाभारतात राजकारणाच्या सहा गुणांचा उल्लेख आहे. संधी. विच्छेद. शत्रूकडेच लक्ष. संधीची प्रतीक्षा. शत्रूशी मैत्रीचा दिखावा. सहकार्य घेऊन आपल्यापेक्षा शक्तिशाली व्यक्तीवर विजय. कर्नाटकात काँग्रेसने जद (एस) ला सोबत घेऊन असेच केले. काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीला धक्का देऊन असेच केले. बिहारमध्ये नितीशकुमार शत्रूशी मित्रत्वाचा दिखावा करत आहेत. दक्षिणेकडील पक्ष आणि देशभरातील प्रादेशिक नेते २०१९ मधील आपापल्या संधीची प्रतीक्षा करत आहेत.


  जसे काळ्या कांबळ्यावर कितीही रंग दिला, तरी तो बसणारच नाही-तसेच काश्मिरी फुटीरवाद्यांशी कितीही चर्चा करा- ते बदलणार नाहीत. फुटीर धोरणच सुरू ठेवतील.
  चंदनाच्या झाडाला चिकटलेला सापही विषारीच राहतो, अगदी तसेच दहशतवाद्यांचे क्रौर्य आहे. त्यांना ठेचावेच लागेल. त्यात थोडेसुद्धा राजकारण देशाला स्वीकारार्ह नाही. स्थानिक काश्मिरी पक्ष आणि काँग्रेस कठोर लष्करी कारवाईत अडथळे बनून राहतील.
  जशी वादळातच नाविकाची क्षमता कळते-तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची काश्मीरमधील क्षमता आता कळेल.
  पाणी जसे कितीही गरम केले तरी अखेर थंड होतेच-अगदी तसेच काश्मिरी नागरिकांना कोणी कितीही फूस लावली, कपट केले-तरी त्यांना अखेरीस भारताचाच अविभाज्य भाग बनून राहण्याची इच्छा आहे/राहतील. कारण उसाला कितीही पिळले तरी तो गोडवा सोडणार नाही.

Trending