आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडासंघाची कार्यशैली बदलली तरच आशा ठेवू..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅडमिंटन, क्रिकेट आणि काही प्रमाणात हॉकीत या वर्षी मिळालेल्या यशाबाबत या वर्षी समाधान व्यक्त करता येईल. मात्र, सरत्या वर्षाने भविष्यासाठी कोणतीही मोठी आशा निर्माण केलेली नाही. अर्थात यासाठीचे खापर फक्त २०१७ या वर्षावर फोडणेही योग्य नाही. ही परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरूच आहे.  


पन्नासपेक्षा जास्त नोंदणीकृत आणि सरकारी मदत मिळणाऱ्या क्रीडा प्रकारांपैकी दोन-तीन खेळांना काही प्रमाणात यश मिळाले. यातून संघटित क्रीडा शक्ती निर्माण होण्याची आशा पल्लवित होते. पण ती पूर्ण ताकदीनिशी पूर्णत्वास येऊ शकत नाही. जागतिक क्रीडा पटलावर भारताची कायम ओळख निर्माण करणारा भक्कम पायाच आणखी बनलेला नाही. 


या वर्षी काही तात्कालिक यश मिळाले. मात्र, प्रशासकीय आणि सरकारी स्तरावर हे कायम राखण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. क्रीडा क्षेत्रातील भारताचे यश हे वैयक्तिक प्रयत्न किंवा आर्थिक प्रोत्साहनाच्या बळावरच मिळत आले आहे.  


सरत्या वर्षी सायना नेहवालने बॅडमिंटनमधील चिनी वर्चस्व उद्ध्वस्त करत तो मैलाचा दगड रोवला होता. तीच परंपरा या वर्षी पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतने राखली. सिंधू या वर्षी दोन सुपर सिरीज टुर्नामेंट जिंकली, मात्र मोठ्या स्पर्धांच्या फायनलमध्ये डगमगण्याची मालिका तिनेही सुरूच ठेवली. करिअरच्या सुरुवातीला कमकुवत दिसणारा श्रीकांत या वर्षी पूर्ण ताकदीने पुढे आला आणि चार सुपर सिरीजमध्ये विजय मिळवला. फिटनेसच्या अडचणीमुळे तो विक्रमी कामगिरी करू शकत नाही.  


माध्यमे, प्रसारक आणि प्रायोजकांच्या बळावर फुललेल्या क्रिकेटमधील किरकोळ विजय हे फार मोठे यश मानता येणार नाही. मागील वर्षीच्या तगड्या टीमच्या तुलनेत यंदाची स्थिती थोडी चांगली होती. अर्थात हा कसही देशांतर्गत मैदानांवरच लागलेला आहे. या वर्षीदेखील तो फायदा मिळालाच. अर्थात येथेही वरचे स्थान कायम राखण्यासाठी खेळाडूंना मेहनत घ्यावीच लागली. काही सामने आव्हानात्मक झाले. उदा. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध धर्मशाळा येथे एकदिवसीय सामन्यात आपले क्रिकेटमधील नैपुण्य दिसून आले. क्रमांक एक किंवा दोनवर असण्याचे ढोल आत्ताच बडवण्यात काय अर्थ आहे? नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट टीमचा खरा कस लागेल. क्रिकेटवर बीसीसीआयकडून ज्या प्रमाणात पैशांचा वर्षाव होत आहे, ते पाहता या टीमला आता जगात सर्वश्रेष्ठ सिद्ध होणे आवश्यक आहे. 


हॉकी टीमने २०१४-१५ नंतर पुन्हा एकदा या वर्षी वर्ल्ड लीगच्या अंतिम फेरीक कांस्य पदक जिंकले. रियो ऑलिंपिकचा रौप्य पदक विजेता बेल्जियम आणि कधीकाळी हॉकीत अव्वल राहिलेल्या जर्मनीला आपण हरवले, पण या पदकानंतर सुवर्णपदकाची आशा करता येण्यासारखे काही संकेत मिळाले नाही. याची कारणे अनेक आहेत. सामूहिक एकरूपतेचा अभाव. एका सामन्यात प्रचंड शक्तिशाली संघ दाखवणे आणि दुसऱ्याच सामन्यात पार कोसळण्याची परंपराच आहे. कधी कधी एखाद्या प्रशिक्षकाला डोक्यावर बसवले जाते तर काही दिवसांनी त्यातील उणिवा शोधून घरी पाठवले जाते.  


३४ व्या वर्षी पाचव्यांदा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे मेरी कोमसाठी निश्चितच मोठे यश ठरले. मात्र, तिच्याप्रमाणेच खेळात पुनर्पदार्पण करू इच्छिणाऱ्या सुशील कुमारला हे जमले नाही. वॉक ओव्हरमुळे राष्ट्रीय विजेता ठरलेल्या सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असले तरी पुढील वर्षीच्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांपर्यंतच त्याची मजल जाऊ शकते. या स्पर्धेत पहिलवानांनी २९ सुवर्ण, २४ रौप्य आणि सहा कांस्यपदके मिळवली. पण हेच पहिलवान काही आठवड्यांनी ग्रीको रोमन कुस्तीच्या जागतिक स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतले. काहींनी पहिला सामनाही जिंकला नाही. फुटबॉलवर चर्चा करणेच निष्फळ आहे. अंडर-१७ जागतिक स्पर्धेचे आयोजकत्व मिळाले. पण भारताला शून्य यश मिळाले. क्रीडा क्षेत्रातील हे निराशेचे चित्र उत्साहाच्या कमतरतेमुळे नाही. तिरुअनंतपुरममध्ये सुरू असलेल्या रायफल व पिस्तूल स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर ५२०० नेमबाज उतरले, हा याचा मोठा दाखला.  बहुतांश खेळाडू अगदी प्राथमिक स्तराला स्पर्श करू शकले. या गर्दीतून उत्तम प्रतिभा निवडण्याचा प्रयत्न संघाकडून होईल, ही आशा बाळगता येणार नाही.  सरकारची भूमिका तर टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमअंतर्गत पावणेदोनशे खेळाडूंना काही लाख रुपये वाटण्यापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे २०१८ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत आणखी काय अपेक्षा करणार?


- श्रीशचंद्र मिश्र, माजी संपादक व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

बातम्या आणखी आहेत...