आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरोधी विचार पुन्हा अपयशी ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदींनी मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारविरहित कामकाजाचे आश्वासन दिले. येथील कर्मचारी- अधिकारी वर्गाला वेळेवर काम करण्याची सवय लावली. रस्ते बांधणीचे काम दिवसाला ६ किलोमीटर एवढे होत होते. ही क्षमता सुमारे ३० किलोमीटर एवढी झाली आहे. पण आता २०१९ मध्ये केवळ भाजपविरोधी मानसिकतेतून निवडणूक लढवली गेल्यास ती कदापि यशस्वी ठरू शकणार नाही.

 

भारताला एक महासत्ता तसेच एक समृद्ध राष्ट्र बनवणे हाच जनसंघाच्या परंपरेतील सर्वात मोठा संदेश आणि त्याचा उद्देशही होता. प्रत्येक क्षेत्रात प्रगती करणे हे आपल्या परमवैभवाच्या कल्पनेनुरूपच आहे.  


‘दैहिक, दैविक, भौतिक तापा, रामराज काहू नहीं व्यापा’ या उक्तीतील स्थिती देशात निर्माण होणे हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या राष्ट्रीयतेचाच तो एक भाग आहे.  
अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये मी घेतलेल्या एका मुलाखतीत वरील वक्तव्य केले होते. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचा नवा अध्याय रचला जात असताना, या काळातही ते वक्तव्य तंतोतंत लागू होताना दिसते.  


सध्याच्या वातावरणात अटलजींची वक्तव्ये वारंवार आठवत असतात. विरोधी राजकारणाविषयी त्यांचे आणखी एक वक्तव्य पाहूयात- ते ९ मे १९९९ मधील आहे.  
“ राजकारण पूर्णपणे नकारात्मक आणि निषेधात्मक झाले आहे. भाजपच्या विरुद्ध धर्मनिरपेक्षतावादी आघाडी उभी करण्याची घोषणा गाजावाजात करण्यात आली होती. पण तोदेखील खरा मुद्दा बनवण्यात आला नाही. लोकसभेत धर्मनिरपेक्षतावादावर तर्कसंगत चर्चा झाली असती तर एक वेळ समजून घेतले असते. केवळ दोषारोपांसाठी देशातील विविध भागांमध्ये झालेल्या लहान-सहान घटनांचा उल्लेख केला गेला. सत्ताधारी पक्षाने जेव्हा तथ्य समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधी पक्षाने ते समजून घेण्याची तयारीही दाखवली नाही. त्यांच्यासाठी जणू तो एखादा औपचारिक विधी होता, तो पूर्ण करण्याची केवळ एक अपरिहार्यता होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे राजकारण अशाच प्रकारे चालत राहणार का? ” 
विरोधी एकजूट आणि पारंपरिक शत्रुत्व असतानाही केवळ भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र होण्याच्या मानसिकतेला नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये हरवले नव्हते? त्या वेळी विरोधी पक्षांकडे साधनांची कमतरता होती? सर्वच विरोधकांचा सामना करत भाजप कशी जिंकते? अटलजी हे समजावून सांगतात... २२ मार्च १९९८ -  


“निश्चितच आमच्या विचारधारेने या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरिता महत्त्वाचे योगदान दिले आहे. आमच्या विचारधारेला व्यापक स्वीकृती मिळण्याचे हे संकेत आहेत. आमची कोंडी करण्याचा किंवा एकटे पाडण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.  आमचे विरोधक पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत कथित धर्मनिरपेक्षतावादाचा मुद्दा मोठा करून जनतेचा पाठिंबा काढून घेण्याचा तसेच आमच्याविरोधी मोट बांधण्याच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.    एवढेच नाही, तर अल्पसंख्याक वर्गातही कथित धर्मनिरपेक्षतावादाच्या नावावर आपले राजकीय शोषण केले गेल्याची भावना निर्माण झाली. त्यांच्या मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न केले गेले. आता मात्र केंद्रात आम्ही जे म्हणू ते करून दाखवण्याची संधी मिळाली आहे. भारतीय राजकारणात हे मोठे वळण अससल्याचे संकेत आहेत. आता या संधीचा आम्हाला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.  उरल्यासुरल्या शंका-कुशंकांचे निराकरण करून देशाच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करायचा आहे. ”  (अटलबिहारी वाजपेयी यांनी ही सर्व वक्तव्ये लेखक ‘पांचजन्य’चे संपादक होते, त्या वेळी दिलेल्या मुलाखतीत केलेली आहेत.)  


खरं तर २०१९ हे वर्ष २०१८ मध्ये सुरू झाले आहे. प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक निर्णय, प्रत्येक सभा आता फक्त २०१९ चे उद्दिष्ट ठेवूनच नियोजित केले जात आहे.  खासदार, मंत्री हे प्रत्येक संधीचा फायदा  घेऊन आपल्या आपल्या मतदारसंघाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. 
कुणाला आपले तिकीट राहील की नाही, याची चिंता आहे, तर कुणी आपापल्या मतदारसंघातील  जातीपातीचे राजकारण, विरोधी एकजूट याचे गणित मांडण्यात गुंतले आहेत. पण २०१९ चे महाभारत न भूतो न भविष्यति असेच होईल, हे निश्चित. अशा प्रकारचा रोमांचकारी अनुभव, दर श्वासागणिक होणारे चढ उतार कदाचित १९७७ मधील निवडणुकीतही पाहायला मिळाले नसतील.

 

या वेळच्या निवडणुकीलाच एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे?  
एका वैशिष्ट्यपूर्ण विचारधारेत जन्मलेल्या स्वप्नदर्शी व्यक्तीची धोरणे, योजना, आजवरचे यश हे सर्वच या वेळी पणाला लागणार आहे. मागील दीड दशकापासून भारतीय माध्यमे आणि राजकारणातील धर्मनिरपेक्ष वर्ग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.  गुजरातला उद्योग, पायाभूत सुविधा, ऊर्जा, दरडोई उत्पन्न, भ्रष्टाचारविरहित शासन दिले तर त्यातही उणिवा शोधल्या.  
ज्या लोकांनी देशातील प्रत्येक दिवसाचा सूर्योदय घोटाळ्यांनी वेढलेल्या काळ्या ढगांमध्ये पाहिला, ज्यांच्या कार्यकाळात ना लष्कराचा सराव झाला ना गावो-गावी वीज पोहोचली, ना इतर देशांमध्ये मान ताठ करून चालण्याची स्थिती होती, ते सर्व जण एकत्र होऊन आज एका सिंहासमोर उभे आहेत. आपणच राजा होणार, अशी त्यांची इच्छा आहे.  विश्वास हा जगातील सर्वात मोठा आधार असतो. विश्वास असेल तर सर्वकाही असते. विश्वासघात झाला तर एखादी व्यक्ती प्राणाचाही त्याग करते. निराशेच्या गर्तेमुळे एवढी भीषणता निर्माण होऊ शकते. चार वर्षांपूर्वीच आपण पाहिले. देशाचे नेतृत्व, नेत्याचा प्रामाणिकपणा आणि  त्याच्या कार्यक्षमतेवरील जनतेचा विश्वास ढासळत होता. सर्व आर्थिक गुंतवणुकीचे प्रवाह देशाबाहेर जात होते. जगातील सर्वाधिक तरुण असलेला आपला देश असूनही येथील तरुण निराशावादी आणि बंडखोरीच्या वाटेवर होते.  


मोदींनी या नवभारताच्या नवयुवकांना संबोधित केले. पहिल्यांदाच मत देणाऱ्यांना त्यांनी तुमचे स्वप्न साकार करू, असा विश्वास दिला. सामान्य जनतेला मी पैसा खाणार नाही आणि इतरांना खाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तर देशाच्या सीमांनाही सुरक्षा तसेच हल्लेखोरांवर आक्रमक कारवाई केली जाईल, असे वचन दिले.  मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारविरहित कामकाजाचे आश्वासन दिले. येथील कर्मचारी- अधिकारी वर्गाला वेळेवर काम करण्याची सवय लावली. रस्ते बांधणीचे काम दिवसाला ६ किलोमीटर एवढे होत होते. ही क्षमता सुमारे ३० किलोमीटर एवढी झाली आहे. महिला सबलीकरणाचा मुद्दा घेतला तर लोकसभा अध्यक्षापासून ते देशातील महत्त्वाचे मंत्रालय महिला नेत्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे. तिकडे गावातील महिलांचीही चुलीतून निघणाऱ्या धुरापासून उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सुटका केली. 

 
स्टार्टअप, स्टँडअप, मेक इन इंडियासाठी मुद्रा योजना, जनधन आणि शेतकरी मजूर विमा योजनेला सुरुवात केली. अरुणाचल प्रदेशपासून काश्मीरपर्यंत रेल्वे तसेच विमानांचे अद्भुत अविश्वसनीय जाळे निर्माण केले.  डोकलाममध्ये तर चीनच्या डोळ्यात धूळ फेकून त्याला रोखले, तर भूतानमध्ये चीनसोबत नम्रतापूर्वक मैत्री निभावण्याचे वचनही दिले.  मला वाटते की, हे सर्व जनतेच्या समोर उघड आहे. सुरुवातीला अटलजींनी केलेल्या वक्तव्यांचा मी दाखला दिला होता. त्याचप्रमाणे केवळ भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्रित झालेली मानसिकता निवडणुकीत पराभूत झाली. आता २०१९ मध्येदेखील याच कारणास्तव तो प्रत्यय पुन्हा येऊ शकतो. 

 

तरुण विजय

भाजपाचे माजी खासदार 

बातम्या आणखी आहेत...