आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचे सहकारमहर्षी: बाळासाहेब पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या विकासासाठी लाेकनेते स्व. बाळासाहेब पवार यांनी केलेल्या कार्याची ताेंडअाेळखदेखील थक्क करून साेडते. तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती विचारात घेता एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी केलेला संघर्ष अाणि उभा केलेला कार्याचा धांडाेळा ‘नीतिधुरंधर बाळासाहेब पवार’ या चरित्रग्रंथात महावीर जाेंधळे यांनी चितारला अाहे. अाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चरित्रग्रंथाचे प्रकाशन हाेत अाहे, त्यानिमित्त या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश येथे देत अाहाेत...

 

मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेला हक्काची राेजीराेटी मानाने मिळवून देण्याची ईर्ष्या बाळगलेल्या बाळासाहेबांनी स्वच्छ, पारदर्शी सहकाराचा मार्ग अनुसरला. मराठवाड्यातील गावागावांत सहकाराचे बीज राेवण्यासाठी त्यांनी अताेनात परिश्रम घेतले. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, खत कारखाने अशा निरनिराळ्या सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांची त्यांनी उभारणी केली. या सहकारी चळवळीमुळे मराठवाड्यातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास मदत झाली, म्हणूनच त्यांच्याबाबतीत मराठवाड्याचे सहकार महर्षी असा उल्लेख करणे अधिक श्रेयस्कर ठरते.


कारखानदारीमुळे केवळ माेठ्या शहरातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा सुधारताे. मात्र, खेड्यापाड्यातील जनता दुर्लक्षित राहते. खेड्यापाड्यांतून लघुउद्याेग व कारखानदारी वाढावी म्हणून बाळासाहेबांनी निरनिराळे प्रयाेग केले. शेतकरी, कृषी उत्पादक बाजार समिती सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमी देऊन त्यांनी याेग्य ताे भाव द्यावा म्हणून बाळासाहेबांनी अापल्या परीने प्रयत्न केले. याबाबत बाळासाहेबांनी अभ्यासपूर्ण भूमिकेने शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक करण्यासाठी अाधुनिक साेयी उपलब्ध करून देणे, दूध उत्पादक संस्थांनी उभारणी करणे, कुक्कुटपालनासारख्या लघुउद्याेगांना सहकारी साेसायट्यांमार्फत कर्ज देणे अादी कामे केली. त्यांनी ज्या-ज्या संस्थांवर कामे केली तेथे अापल्या कार्याच्या पाऊलखुणा ठेवल्या. मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भगारथ खतनिर्मिती प्रकल्प, सहयाेग तेलनिर्मिती प्रकल्प (जालना), वैभव पशुखाद्य निर्मिती उद्याेग (अहमदनगर व धुळे), तांदूळ प्रकल्प (ठाणे) तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात गाेदामांची उभारणी केली. कापूस एकाधिकार याेजना त्यांनी नफ्यात अाणली. एकंदरीत या सर्वांमधून त्यांची उद्यमशीलता दिसून येते.

 

मराठवाड्यातील सहकार चळवळ वाढवण्यामागे बाळासाहेबांच्या नावाला अनन्यसाधारण महत्त्व अाहे. जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून बाळासाहेबांनी अनेक पुराेगामी बदल घडवले. सहकारी तत्त्वावर बँकेने शेतकरी, पददलितांसाठी कर्जाचे धाेरण राबवावे, असे बाळासाहेबांना नेहमी वाटत असे. त्यांनी जिल्हा सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी कर्जवाटपाचे नवे धाेरण अंगीकारले. या धाेरणांतर्गत जिराईत शेतकरी व बागाईतदार शेतकरी यांनी घेतलेल्या कर्जासाठी व्याजाचा दर वेगवेगळा ठेवला गेला. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची अाणेवारी सलग ३-४ वर्षे चार अाणि पाच राहील त्यांना सरकारने कर्जात सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कारखान्याचे समभाग विकत घेता यावेत म्हणून त्यासाठी अल्प व्याजात कर्ज देऊन त्यास सहकारात सहभागी करून घ्यावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली हाेती. गंगापूर साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी कन्नड, सिल्लाेड, वैजापूर, पैठण, जालन्यात सहकारी कारखानदारी उभी केली. राजकीय नफा-ताेटा याची बेरीज-वजाबाकी त्यांनी कधी केली नाही. अाजच्या मतलबी राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने अप्पांचे काही निर्णय राजकीय अभ्यासकांना अहिताचे वाटत असले तरी सहकाराच्या उदात्त हेतूला बळकटी देणारे हाेते. यातच त्यांचे माेठेपण सामावले अाहे.

बातम्या आणखी आहेत...