आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची खरी कसोटी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगाला १२ जूनची प्रतीक्षा होती. आज ती पूर्ण होत आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची सिंगापूरमध्ये चर्चा होत आहे. ही भेट केवळ या दोन देशांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगातील शांततेशी ती निगडित आहे. एकूणच,  ही भेट ट्रम्प यांच्या राजकारणाची कसोटी पाहणारी ठरेल.

 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर नवे करार करण्यात अधिक रस असलेले नेते, अशीच ट्रम्प यांची प्रतिमा बनली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जगभरातील रियल इस्टेटमध्ये नावाजलेल्या ग्रुपचे ते मालक होते. अर्थात, व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर त्यांना व्यवसायातून दूर राहावे लागले ही वेगळी बाब. आज संपूर्ण जगाच्या नजरा उत्तर कोरियाचे प्रशासक किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेवर खिळल्या आहेत. दोन्ही देशांचे मुख्य सल्लागार, मंत्र्यांदरम्यानच्या चर्चांमधील चढ-उतारानंतर आता कुठे या चर्चेला मुहूर्त लागला आहे.

 

या भेटीमागील अमेरिका आणि उत्तर कोरियाचा नेमका उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात येण्यासाठी देशावर असलेले निर्बंध हटवले जावेत, अशी किम यांची इच्छा आहे. पण आधी उत्तर कोरियाने अणुचाचण्या बंद कराव्यात, आपली आण्विक शस्त्रास्त्रे-क्षेपणास्त्रे समर्पित करावीत, अशी अमेरिकेची इच्छा आहे. उत्तर कोरियाला अमेरिकेकडून सुरक्षेची हमीदेखील पाहिजे. कारण आजवर आपण केवळ अण्वस्त्रांच्या बळावरच सुरक्षित आहोत, अशी उत्तर कोरियाची धारणा आहे. व्हाइट हाऊसने प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, उत्तर कोरियाचे प्रशासक किम जोंग उन हे चर्चेसाठी तयार आहेत, परंतु अमेरिकेकडून होणारी चर्चा ही अनौपचारिक पद्धतीची असेल. १९६० च्या दशकातील घटना अनेक नेत्यांना आठवत असतील. तेव्हा अमेरिका व सोव्हिएत संघातील नेत्यांनी अण्वस्त्रांचा धोका वाढू नये यासाठी करार केला होता. दोन्ही पक्ष त्यावर कायम राहिले होते. त्यामुळे सध्या ट्रम्प आणि किम यांच्यादरम्यानची चर्चादेखील शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरू शकते. ही चर्चा यशस्वी झाल्यास त्याचे श्रेय ट्रम्प यांनाच जाईल. त्यामुळे ट्रम्प यांची तडजोड किंवा डील करण्याची क्षमता येथे पाहिली जाईल. ट्रम्प यांना ‘डील मॅन’ म्हटलेले आवडते. ते पूर्वीच्या अध्यक्षांप्रमाणे सल्लागार, राजदूत तसेच परराष्ट्रमंत्र्यांना फार महत्त्व देत नाहीत. असे मुद्दे त्यांना स्वत: हाताळायचे असतात. माध्यमांसमोर येण्याऐवजी ते ट्विट करतात व त्यांचे मत जगासमोर येते. पण या स्वभावामुळे ते अनेक दशकांपासून चालत आलेली राजनयिक प्रक्रियाच संपुष्टात आणू शकतात, अशीही शक्यता आहे. त्यामुळे उत्तर कोरियासोबत काय करार होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उत्तर कोरियातील अणू कार्यक्रम संपुष्टात आणण्यावर याचा प्रभाव पडेल. ट्रम्प यांच्या पूर्वीच्या तीन अध्यक्षांना मिळाली नाही अशी संधी त्यांच्या वाट्याला आली आहे.


 
डोनाल्ड ट्रम्प यांचे सध्याचे आणि माजी सल्लागार सांगतात की, उत्तर कोरियावरून ते नेहमी अस्वस्थ असतात. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्याच्या दोन दिवसांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली होती. तेव्हापासून ही अस्वस्थता आहे. मे २०१६ मध्ये निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी उत्साहाच्या भरात म्हटलेही होते की, उत्तर कोरयाचे प्रशासक किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्याची त्यांची इच्छा आहे.  
उत्तर कोरियाशी होणाऱ्या या चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी इतर परराष्ट्र धोरणांप्रमाणेच कुणाशीही सल्लामसलत केलेली नाही. त्यांचे सल्लागार म्हणतात, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उनदेखील आपल्याप्रमाणेच आहेत, असे ट्रम्प यांना वाटते. आपण विशेष अधिकार घेऊन जन्माला आलो असून स्वत:च्या बळावर प्रचार करून मोठा खेळाडू बनण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्याकडे आहे, अशी त्यांची धारणा आहे.  व्हाइट हाऊसमधील निराशाजनक वातावरणामुळे राजीनामा दिलेले परराष्ट्र मंत्रालयातील कोरियन प्रकरणांचे वरिष्ठ प्रतिनिधी जोसेफ वाय युन म्हणतात, ट्रम्प निवडणुकीपूर्वीही असाच विचार करत होते. व्हाइट हाऊसमध्ये कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी उत्तर कोरियावर पूर्वीपेक्षा जास्त दबाव टाकण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे या चर्चेपूर्वीच त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट अाहे, असे म्हणता येईल. युन म्हणतात, किम हे त्यांचे वडील व आजोबांप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने चर्चा करतील. अणू कार्यक्रम त्यागण्याच्या दिशेने त्यांनी एक पाऊल जरी पुढे टाकले तरी ते त्या बदल्यात अमेरिकेकडून सुरक्षेचे आश्वासन घेतील. ट्रम्प यांना ‘कॉम्प्लेक्स डायनॅमिक्स ऑफ सिक्युरिटी’विषयी फार माहिती नाही ही मोठी अडचण आहे. कोरिया खंडात २८,५०० अमेरिकेचे सैन्य तैनात आहे.  
याप्रसंगी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी दोन वेळा उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. पूर्वी सीआयएचे संचालक राहिलेले पोम्पियो यांच्या मते, ट्रम्प पूर्णपणे तयार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी कुणाला फार माहिती नाही. त्यामुळे सिंगापूरमध्ये ते एखादा आश्चर्याचा धक्काही देऊ शकतात.
© The New York Times

बातम्या आणखी आहेत...