आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आस्थेच्या शोषणाचे बीभत्स नृत्य समाप्त (भास्कर संपादकीय)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका लहानग्या निरागस मुलीचे शोषण करून स्वयंभू आसाराम नृत्यात मग्न, अहंकारात मस्त होता. आपल्या असंख्य अनुयायांच्या आस्थेचा गुन्हेगारीसाठी वापर करून कायद्याची थट्टा करत होता. मात्र, अ.जा.-अ. जमाती न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत गजाआड टाकण्याच्या दिलेल्या निकालाने नवी आशा जागवली आहे. हा आजन्म कारावास नसता तर कदाचित ही आशा जागवली गेली नसती.

 

हा निकाल अभूतपूर्व, शिवाय स्पष्ट, प्रेरणादायी आणि न्यायोचित आहे. सध्या अवघा देश मुली-महिलांच्या प्रतिष्ठेवर होत असलेल्या पाशवी हल्ल्यांमुळे दु:खी आणि संतापलेला आहे. सगळीकडे असुरक्षेचे, अविश्वासाचे वातावरण असताना हा निकाल आला आहे. आसारामसारखा प्रभावी, शक्तिवान आणि श्रीमंत असा बलात्कारातील आरोपी कायद्याच्या बेडीत अडकेल, यावर विश्वास बसत नव्हता. अंधश्रद्धा अशी असतेे की ती सत्य आणि तर्क मानत नाही. शिवाय, आस्थेवर कायदा पाळण्याची हिंमत दाखवणे कठीण काम आहे. जोधपूर पोलिसांनी मात्र ही हिंमत दाखवली. यात अनेक अडचणी आल्या. तीन-तीन साक्षीदारांच्या हत्या झाल्या. परंतु पोलिस व फिर्यादी पक्षाने मूळ साक्षी मिटू दिल्या नाहीत. कर्तव्यकसूर पोलिस कारनाम्यांचा भारतीय इतिहास पाहता आसाराम प्रकरणात मात्र जाेधपूर पोलिसांची भूमिका गौरवली जाईल. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनीही लढून मोठे धाडस दाखवले. 

 

सर्वात गौरव करावा लागेल न्यायालयाचा. जज मधुसूदन शर्मा यांनी या निकालाच्या माध्यमातून एकूणच बलात्कारविरोधी वातावरणाला भक्कम कायदेशीर न्याय दिला. जनतेच्या अाशा-अपेक्षांचे अंतिम केंद्र न्यायालय आहे. म्हणूनच हे आवश्यक होते. न्यायाचा मार्ग कठीण, दीर्घ आणि संतापजनक असतो. फक्त यावर चालणारा हवा. या प्रकरणात सर्व जण दृढतेने चालले.
न्यायालयाने या प्रकरणात आसारामच्या वयाचा दाखला देत करण्यात आलेली दयेची भीक मागणारी विनंती फेटाळून लावली. हे चांगले झाले. रामरहीमही आपल्या सामाजिक कार्याचे दाखले घेऊन त्याला कवच बनवू पाहत होता. या निकालाने कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना धडकी भरेल, अशी आशा वाटते. 

 

आता देशात न्यायावरील विश्वास नव्याने जागवला गेला आहे. तो टिकवून ठेवणे हेच आव्हान आहे. हा न्याय केवळ आसारामपुरता मर्यादित राहू नये, हीच अपेक्षा आहे. आज बलात्कार करणारे हजारो लोक चारही दिशांना आहेत. दोन-दोन वेळा हे दुष्कृत्य करणारेही मग वाचतात कसे?देशाचे आपल्याकडे लक्ष आहे हे जाणून प्रत्येक पोलिसालाही या क्षणातून प्रेरणा मिळाली पाहिजे. न्यायालयात काय, कसे मान्य होईल हे आपल्यावरच अवलंबून असते हे जाणून फिर्यादी पक्षांचाही उत्साह वाढायला हवा. 
... आणि बलात्काराची नवी व्याख्या नव्या कायद्यात जशी लिहिली गेली तशीच न्यायाची सुस्पष्ट व्याख्या लिहीत राहू. अशा खटल्यांत शिक्षा दिली गेल्यावर प्रत्येक वेळी प्रसिद्धी आणि प्रशंसा होईल, आरोपी आसारामसारखा प्रसिद्ध आणि पैसेवाला असेल असे नाही.

बातम्या आणखी आहेत...