आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीशक्तीत भारताला २७% श्रीमंत करण्याचे सामर्थ्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थव्यवस्था... रोजगार उपलब्ध झाल्यास घरात राहणाऱ्या एकतृतीयांश महिला काम करू इच्छितात. सरकारच्या रोजगार योजना पुरुषांऐवजी महिलांनाच जास्त आकर्षित करतात. 

 

यांत्रिकीकरणामुळे शेतीसारख्या क्षेत्रातील रोजगार घटले आहेत. येथेच बहुतांश महिला काम करतात. तसेच जुनाट आणि किचकट अशा कामगार कायद्यांमुळे उत्पादन आणि निम्नस्तरीय सेवा क्षेत्र विस्तारू शकले नाही. भारताच्या तुलनेत इतर गरीब देशांमध्ये महिलांना उत्तम रोजगार मिळतो. बांगलादेशातील परंपराही भारतासारख्याच आहेत. पण वस्त्रोद्योग क्रांतीने तेथे २००५ च्या तुलनेत ५० टक्के नोकरदार महिला वाढल्या आहेत. 


भारतात घरातील स्त्री म्हणजेच लक्ष्मी ही धन आणि सौभाग्याची देवता मानली जाते. पण वास्तवात या लक्ष्मीची दशा दयनीय आहे. सौदी अरब वगळता जी-२० मधील देशांमध्ये फक्त भारतात महिलांनी नोकरी करण्याचे प्रमाण कमी आहे. महिलांचे आर्थिक योगदान १६ टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे. हे जागतिक प्रमाणाच्या निम्मे आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, महिला कामगारांच्या प्रमाणानुसार भारत १३१ देशांमध्ये १२१ व्या स्थानावर आहे. महिलांच्या क्षमतेचा योग्य वापर न केल्यामुळेच भारत एवढा गरीब आहे. चीनशी तुलना करताना भारताला आपल्या देशाची भरभराट झाली नसल्याचे जाणवते. पण चीनमध्ये भारतापेक्षा ५० टक्के जास्त कामगारशक्ती आहेत. कारण तेथे महिलाही या कामात पुढे आहेत. भारतात १५ ते २४ वर्षे वयोगटातील ४९ टक्के महिला शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षणात नाहीत. पुरुषांचे हे प्रमाण फक्त ८ टक्के आहे. तरीही रोजगार क्षेत्रात महिलांचा सहभाग झपाट्याने कमी होत आहे. संघटित आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रांत महिला रोजगाराचा दर २००५ मध्ये ३५ टक्के होता. आता तो केवळ २६ टक्के आहे. 


या काळात अर्थव्यवस्थेचा आकार विस्तारला आहे आणि नोकरी करण्याच्या वयातील महिलांची संख्या २४ वरून ४७ कोटींवर गेली आहे. महिला रोजगाराचा दर पुरुषांएवढा झाल्यास भारताला २३.५० कोटी जास्त कामगार मिळतील. हे प्रमाण युरोपियन संघातील स्त्री-पुरुष कामगारांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. तसेच आशियातील सर्व कारखान्यांमध्ये उपलब्ध कामगारांपेक्षाही जास्त आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार, भारतात कामगारांचे असे संतुलन झाल्यास देश २७ टक्के जास्त श्रीमंत होईल. तसेच भारतातील लोक सहजपणे मध्यमवर्गाचा दर्जा प्राप्त करतील. मानवी स्तरावरील फायद्यांची तर गणतीच होऊ शकत नाही. नोकरदार महिलांना आपल्या मुलांच्या पालन-पोषणात जास्त गुंतवणूक करावी लागते. तसेच त्या आपला जीवनस्तर कशा ठेवतात, यावर ती अवलंबून असते. देशात नोकरदार महिलांपेक्षा घरात काम करणाऱ्या महिला जास्त प्रमाणावर घरगुती हिंसेच्या बळी ठरतात. या बाबतीतही सुधारणा दिसून येईल. महिला रोजगारांमधील ही नाट्यमय घसरण उलटवून टाकण्यासाठी आधी ती समजून घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी प्रगतीची चिन्हे आहेत. मुली शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्या कामगारशक्तीच्या बाहेर आहेत. पण आणखी कारणे शोधल्यास बहुतांश कुटुंबे सधन होत आहेत. त्यामुळे ते महिलांना बाहेर कामासाठी न पाठवण्यास प्राधान्य देत आहेत.

 

विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये हे साहजिक आहे. कारण महिलांनी घरात राहिल्याने संबंधितांचा सामाजिक दर्जा वाढतो. पण भारताप्रमाणे उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत येथे रोजगारात महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. 


सामजिक मानके प्रचंड रूढीवादी आहेत. २०१२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात ८४ टक्के भारतीयांचे एकमत असे होते की, रोजगार कमी झाल्यास महिलांऐवजी पुरुषांनाच रोजगारासाठी प्राधान्य दिले पाहिजे. भारतात २००५ पासून ३.६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यापैकी ९० टक्के पुरुषांनाच मिळाल्या. महिलांनाच घरात राहायला आवडते, असे म्हणणाऱ्यांविरोधात अनेक पुरावेही मिळतील. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, रोजगार मिळाल्यास घरात राहणाऱ्या एक तृतीयांश महिलांना काम करायला आवडेल. सरकारी रोजगार योजनाही पुरुषांपेक्षा महिलांनाच जास्त आकर्षित करणाऱ्या आहेत.

© 2018 The Economist Newspaper Limited. All rights reserved. 


घरकामात मदत हवी 
भारतीय महिला घरातील ९० टक्के कामे करतात. एखाद्या मोठ्या देशाच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे. जागतिक बँकेच्या एका अभ्यासानुसार, पुरुषांनी भांडी घासणे तसेच मुलांना झोपवणे या दोन कामांसाठी आठवड्यातील फक्त दोन तास दिले तर महिलांचा रोजगारातील सहभाग १० टक्के वाढेल. यामुळे जीडीपीत ५५० अब्ज डॉलरची वाढ शक्य आहे. 


श्रमकायद्यात बदल हवा 
भारतातील जेवढ्या महिला शाळेत शिकतात, त्या प्रमाणात त्यांची नोकरीची शक्यता कमी आहे. विशेषत: विद्यापीठातील पदवीपेक्षा कमी शिक्षण घेणाऱ्या नोकरीत कमी दिसतात.

 
शिक्षणाचा हेतू बदलावा 
इतर देश महिलांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करत आहेत. स्थिती बदलली नाही, तर भारत याबाबतीत सौदी अरबच्याही मागे जाईल. भविष्यात मुलीला योग्य वर मिळावा म्हणून तिला शिकवले जाते. त्याऐवजी योग्य नोकरी मिळावी,यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...