आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Umang Bedi, Former Managing Director, Facebook India Article In Divyamarathi

प्रादेशिक भाषा : इंटरनेटची हुकमी चावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात २००१ च्या जनगणनेनुसार १,६३५ बोलीभाषा अस्तित्वात आहेत. त्यामुळे एखादी वित्तविषयक सेवा, टेलिकॉम किंवा एफएमसीजी क्षेत्रात ग्राहकांना जी भाषा समजते त्याच भाषेत बोलणे अपेक्षित किंबहुना अत्यावश्यक आहे. ग्राहकाच्या हाती मोबाइल कंटेंट आल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भाषेत सामग्री वाचण्याची- पाहण्याची मानसिकता असते. त्यामुळे ज्या ब्रँडला भारतातील एक अब्ज लोकांपर्यंत पोहोचायचे आहे त्याला प्रादेशिक भाषांमध्ये सामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. ग्राहकांच्या पसंतीला आकार देणाऱ्या तसेच देशभरात प्रादेशिक भाषांमध्ये अमर्याद सामग्री तयार करणाऱ्या मुख्य चार प्रवाहांची चर्चा करू.  

 

पूर्वीपेक्षा आजच्या घडीला भारतीय नागरिक मोबाइल फोनवर मोठ्या प्रमाणावर भारतीय सामग्रीचा आस्वाद घेत आहेत. भारतीय बाजारात सध्या इंटरनेटचा प्रवेश आणि स्मार्ट फोनच्या प्रसारात असामान्य तेजी दिसून येत आहे. जून २०१८ पर्यंत मोबाइल फोनवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ४७.८ कोटी होईल. हा ‘मोबाइल इंटरनेट इन इंडिया २०१७’ च्या अहवालाचा अंदाज आहे. हा अहवाल आयएएमएआय (इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया) आणि केएएनटीएआर-आयएमआरबीने संयुक्त रूपाने प्रकाशित केला आहे. स्वस्त स्मार्टफोन, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि परवडणारी इंटरनेट सेवा यामुळे मोबाइलची उपयुक्तता वाढली आहे.  
या अहवालानुसार, डिसेंबर २०१७ पर्यंत भारतात मोबाइल इंटरनेटचा वापर करणारे शहरी २९.१० कोटी, तर १८.७० कोटी ग्रामीण युजर्स आहेत. ५९ टक्के शहरी भागात मोबाइल इंटरनेट पोहोचल्यामुळे आता इंटरनेटची गती मंदावेल, तर ग्रामीण परिसरातील १८ टक्के भागात इंटरनेट पोहोचल्याने या भागात मोबाइल वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.  

 

पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमातून यास प्रोत्साहन मिळेल. यात द्वितीय तसेच तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी निश्चित करण्याची विस्तृत योजनाही आहे. अशा शहरांसाठी तयार होणारी बहुतांश सामग्री प्रादेशिक भाषांमध्येच असेल, असा माझा अंदाज आहे. ७५ टक्के भारतीयांना स्थानिक भाषांमध्ये  आलेली सामग्री आवडते. केपीएमजी आणि गुगल इन इंडियाद्वारे २०१७ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतीय भाषांमधील इंटरनेट युजर बेस २०११ आणि २०१६ दरम्यान सरासरी ४१ टक्के या वार्षिक दराने वाढत आहे. भारतीय भाषांमधील इंटरनेेट युजर्सची संख्या १०११ मध्ये ४.२० कोटी होती. ती २०१६ च्या अखेरीस २३.४० कोटींपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या इंग्रजी इंटरनेट युजर्सपेक्षा (१७.५० कोटी) जास्त आहे. भारतीय भाषांचे युजर्स दुपटीपेक्षा जास्त वाढून ५३,६० कोटी होतील, तर इंग्रजी युजर्सची संख्या १९.९० कोटींपर्यंत पोहोचेल.

 

आयएएमएआयच्या अहवाल, ‘इंटरनेट इन इंडिक २०१७’ नुसार, भारतातील एक मोठा वर्ग प्रादेशिक भाषांमधील सामग्री घेत आहे. यात शहरी भारताचा वाटाच ६६ टक्के आहे. इंटरनेट प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यास इंटरनेटचा वापर न करणारे २०.५० कोटी लोक डिजिटल होतील. भारताच्या दृष्टीने या बदलाची कल्पना केल्यास येथे सध्या १,६३५ बोली, ३० भाषा आणि २२ अधिकृत भाषा आहेत. जियोफिकेशन या लोकप्रिय झालेल्या घटनेमुळे ग्रामीण भागातील प्रादेशिक भाषांमधील अशा कंटेंट उपभोक्त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.  तसेच उत्पादन खर्च कमी असलेल्या स्मार्टफोनचे निर्माते पोहोच व उपयुक्तता असलेले मोबाइल तयार करत आहेत. विशेषत: विविध भाषांच्या युजर्सच्या दृष्टीने मोबाइलची उपयुक्तता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ, भारतीय बाजारातील लोकप्रिय हँडसेट निर्मात्यांनी अनुवाद व लिपी बदलण्याच्या सुविधा पुरवणे. तसेच टेक्स्ट आपल्या भाषेत बदलण्याचे इन-बिल्ट फीचर लाँच करणे हे या दिशेने उचललेले पाऊल आहे.  

 

देशांतर्गत भाषांना सपोर्ट करणारे मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये वाढ ही महाकाय लोकसंख्या, वाढता मध्यमवर्ग आणि स्मार्टफोनचा वेगवान प्रवेश यामुळे भारत हा तंत्रज्ञानावर चालणाऱ्या जागतिक उद्योगांसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. जगभरातील  तंत्रज्ञानातील अनेक दिग्गज स्थानिक भाषांना पूरक असे मोबाइल अॅप्लिकेशन किंवा प्लॅटफॉर्म विकसित करत आहेत. यासोबतच भारतातील उद्योजकदेखील स्थानिक भाषांमध्ये अॅप्लिकेशन डिझाइन करून स्मार्टफोन युजर्सना आकर्षित करत आहेत.  
त्यामुळे संवाद, मनोरंजन, सोशल मीडिया वेबसाइट, अॅप यांसोबतच बातम्या व ब्लॉग यासारखी डिजिटल सामग्रीदेखील विविध श्रेणींमधील भारतीय भाषांमध्ये विखुरलेली आहे.या सर्वांमध्ये सर्वात लोकप्रिय सामग्री म्हणजे व्हिडिओ कंटेंट. प्रादेशिक भाषांचा प्रभाव व्हिडिओ कंटेंटवरही पाहायला मिळतो. प्रादेशिक भाषांमधील सामग्रीकडे भारतीयांचा वाढता ओढा वाहता व्हिडिओ सामग्रीदेखील जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयएएमएआयच्या अहवालानुसार, प्रादेशिक भाषांमधील इंटरनेटचा ७० टक्के वापर संगीत, व्हिडिओ किंवा बातम्यांच्या स्वरूपापर्यंत मर्यादित आहे. युजरला आकर्षित करणारी बातमीची सामग्री, लेख, छायाचित्र, माहितीपर ग्राफिक्स आणि व्हिडिओ हे विविध स्वरूपांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहे. आयएएमएआयच्या अहवालानुसार, ग्रामीण भागात ५८ टक्के इंटरनेट युजर्स केवळ व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट आणि स्मार्टफोन जगात व्हिडिओ हा एकमेव सर्वाधिक लोकप्रिय घटक आहे यावर कुणीही आक्षेप घेणार नाही. या क्षेत्रात खळबळ माजवणारा तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेत व्हिडिओ हा अष्टपैलू खेळाडू आहे, असे म्हणता येईल.  

 

केपीएमजी अहवालानुसार, प्रादेशिक भाषांमधील व्हिडिओचे प्रेक्षक अनेक पटींनी वाढण्याचा अंदाज आहे. आजचे ग्राहक ५० ते ६० टक्के वेळ हिंदी व्हिडिओ पाहण्यासाठी देतात. ३५ ते ४३ टक्के वेळ इतर प्रादेशिक भाषांमधील व्हिडिओ पाहण्यावर खर्च करतात, तर इंग्रजी भाषेतील व्हिडिओ पाहण्यासाठी केवळ ५ ते ७ टक्के वेळ दिला जातो. हा घटनाक्रम पाहता जागतिक प्रवाह सांगतो की, उपभोक्त्यांना दिवसेंदिवस स्थानिक भाषांमध्ये सामग्री हवी आहे. तसे पाहिले तर इंटरनेटवर सर्वाधिक वापरली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील भाषा चिनी आहे. नेल्सन मंडेला यांनी एकदा म्हटले होते. ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तिला समजेल अशा भाषेत बोलला तर ते बोलणे संबंधित व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचते. पण त्या व्यक्तीला तिच्याच भाषेत संवाद साधल्यास हे बोलणे व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचते.’ भावी इंटरनेट जगात हेच समीकरण लागू होईल असे दिसते.


> केपीएमजी अहवालानुसार आजचे ग्राहक ५० ते ६० टक्के वेळ हिंदी व्हिडिओ पाहण्यासाठी देतात. ३५ ते ४३ टक्के वेळ इतर प्रादेशिक भाषांमधील व्हिडिओ पाहण्यावर खर्च करतात, तर इंग्रजी व्हिडिओसाठी केवळ ५ ते ७ टक्के वेळ दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...