आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांच्या लोकप्रियतेचा पाक लष्कराला धसका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी आगामी सार्वत्रिक निवडणूक पाकिस्तानचेच लष्कर 'फिक्स' करत असल्याचा आरोप झाल्याने पाकिस्तानातील बडे लष्करी अधिकारी नाराज झाले होते. ही नाराजी सर्वत्र वाढताना दिसत आहे. असे चित्र पहिल्यांदा दिसत नाही. १९९०मध्ये आयएसआय या गुप्तहेर संघटनेने पाकिस्तान पीपल्स पार्टीचा पराभव करण्याच्या हेतूने विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटले होते. आगामी निवडणुकांत पैशाचे वाटप होत नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी केला असला तरी त्यांच्या दाव्यात कमी तथ्य आहे. 


नवाझ शरीफ हे पाकिस्तानी लष्करासाठी अडचणीचे बनले आहेत. १९९०मध्ये लष्कराच्या मदतीचा फायदा शरीफ यांना होऊन ते सत्तेवर आले होते. पण १९९३मध्ये त्यांना लष्कराच्या दबावाखाली पंतप्रधानपद सोडावे लागले होते. नंतर ते पुन्हा पंतप्रधान झाले, पण १९९९मध्ये लष्करी बंड होऊन त्यांना पदच्युत व्हावे लागले. २०१३मध्ये ते आणखी एकदा पंतप्रधान झाले. आपल्या कार्यकाळात शरीफ यांनी परराष्ट्र व संरक्षण धोरणापासून लष्कराला दूर ठेवले होते. तेथून त्यांचा लष्कराविरोधात संघर्ष सुरू झाला. 


आगामी निवडणुकीत पाकिस्तानची जनता लष्कराच्या विरोधात जाऊ शकते, अशा अटकळीवर शरीफ ही निवडणूक पाहत आहेत. तर पाकिस्तान तहरीक एक इन्साफचे (पीटीआय)प्रमुख इम्रान खान पाकिस्तानच्या निवडणुकांत लष्कर हस्तक्षेप करू शकते ही शक्यता नाकारत नाहीत. पण आमचा पक्ष निवडून आला तर तो स्थिर सरकार देईल, असेही ते पुढे म्हणतात. त्यात शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाच्या अनेक भ्रष्ट नेत्यांनी बंडखोरीची धमकी दिली आहे. या घडामोडींबाबत माजी प्रशासकीय अधिकारी हुसेन हक्कानी म्हणतात, २०१३च्या निवडणुकांत शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला १४८ जागांपैकी ११६ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा इम्रान खान यांच्या पीटीआयला पंजाब प्रांतात चांगले यश मिळल्यास ते आघाडी पक्षांचे सरकार स्थापन करू शकतात. पाकिस्तानच्या लष्कराला आघाडी पक्षांचे सरकार हवे आहे. त्या हेतूने लष्कराकडून पाकिस्तानातील प्रसार माध्यमांना धमक्या दिल्या जात आहेत. टीव्ही न्यूज चॅनेल, वर्तमानपत्रविश्वात दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. पाकिस्तानच्या लष्कराला कोणत्याही परिस्थितीत नवाझ शरीफ यांच्याप्रती पाकिस्तानी जनतेत असलेली सहानुभूती नष्ट करायची आहे. 
© 2018 The Economist Newspaper Limited. All rights reserved. From The Economist, translated by DB Corp, published under licence. The original article, in English, can be found on www.economist.com 

बातम्या आणखी आहेत...