आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडव्यांचे अाेझे! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बँकिंग क्षेत्रात धक्कादायक घटनांचा काळ सुरू अाहे. देशातील सर्वात माेठ्या मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेकडून वाईट बातमी एेकायला मिळणार हे अगदीच अनपेक्षित नव्हते. परंतु जेव्हा तिमाहीचा तपशिल मांडला गेला, तेव्हा अाजवरच्या इतिहासातील हा सर्वात माेठा ताेटा ठरेल असेही कदापि वाटले नव्हते. अन्य सरकारी बँकांप्रमाणेच भारतीय स्टेट बँक  देखील ‘एनपीए’च्या काेळीष्टकात अडकल्याचे वास्तव समाेर अाले.

 

तात्पर्य, ज्या ग्राहकांना भलीमाेठी कर्जे खिरापतीसारखी वाटली, त्यांनी या बँकेला ठेंगा दाखवला अाहे. अनुत्पादक कर्जासाठी केलेल्या भरभक्कम तरतुदीमुळे ताेटा वाढला, असे सांगितले जात असले तरी एप्रिल-मे-जून या तिमाहीमध्ये देखील बुडीत कर्जे वाढणार हे यामुळे स्पष्ट झालेच अाहे. व्यवस्थेने केलेल्या चुका सातत्याने झाकून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे बंॅकींग क्षेत्र अडचणीत अाणि ताेट्यात येत चालले अाहे. अर्थातच बुडीत कर्जांमुळे वाढलेला ताेटा अवघ्या एखाद्या तिमाही पुरता मर्यादित नाही, तर अनेक वर्षांपासून ताे साचत अालेला असून त्यात अाणखी भर पडत अाहे. मजबूत अार्थिक स्थिती असलेल्या बंॅका अाता बाेटावर माेजण्याइतक्या अाहेत, बऱ्याच बंॅका दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या अाहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे भाग भांडवल राहिलेले नाही. एखाद्या डबघाईस जात असलेल्या बंॅकेचे विलीनीकरण म्हणजे एसबीअायच्या भांडवलापैकी बराचसा वाटा त्याकडे साहजिकच वळता हाेताे.

 

जर व्यवस्थापन काैशल्य पणाला लावून भाग भांडवलाचा पुरेसा वापर केला असता तर देशाला निश्चितच फायदा झालेला अाणि डबघाईतील बंॅकांना उर्जितावस्था मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे दिसले असते. ताेट्यातील सरकारी बंॅकांचे नफा कमावणाऱ्या बंॅकांमध्ये विलीनीकरण केल्यानंतरही अपेक्षित लाभ मिळत नाहीत. कदाचित याचा अंदाज ‘पीएनबी’ला असावा त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यावर देखील अन्य बंॅकांच्या विलीनीकरणाला विराेध केला गेला. यापूर्वी एअर इंडिया-इंडियन एअरलाईन्सच्या विलीनीकरणाचा प्रयाेग करण्यात अाला, मात्र सातत्याने ताेटा हाेत राहिल्याने अखेर खासगीकरण अपरिहार्य ठरले. अाता भारतीय बंॅकिंग क्षेत्राची वाटचाल देखील एअर इंडियाने मळलेल्या वाटेवरूनच सुरू अाहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.


मालमत्ता अाणि भांडवली हिश्श्याच्या निकषावर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय स्टेट बंॅकेने बुडीत कर्जापाेटी २४,०८० काेटींची केलेली तरतूद लक्षात घेता या अाेझ्याने एसबीअायचे कंबरडे माेडले असेच म्हणावे लागेल. याशिवाय बंॅकेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षेपेक्षाही कमी मिळालेला परतावा, वेतनासाठीच्या भरीव तरतुदीने या ताेट्यात अाणखी भर घातली. खासगी बंॅकांच्याही थकित कर्जात गेल्या ५ वर्षात ४५० टक्क्यांनी वाढ झाली. मार्च २०१८ अखेरीस १,०९,०७६ काेटी रूपयांवर ते पाेहाेचले, त्यापैकी सर्वाधिक अायसीअायसीअाय बंॅकेचे अाहे. बंॅकिंग व्यवस्थेतील अशा केविलवाण्या वातावरणात एक दिलासादायक बाब म्हणजे ‘अायबीसी’ (इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बँक्रप्टसी) चा रेटा पाठी लागण्यापूर्वीच २१०० पेक्षाही अधिक कंपन्यांनी थकवलेले ८३ हजार काेटी चुकवले. ‘अायबीसी’वर विशेषत: काॅर्पाेरेट क्षेत्राने टीकेची झाेड उठवली. परंतु देणी बुडवणाऱ्या थकबाकीदारांवर येणारा दबाव हेच त्याचे यश अाहे, यामुळे कर्ज घेण्याच्या अाणि फेडण्याच्या संस्कृतीत हाेत 

 


असलेला बदल येथे उल्लेखनिय ठरावा. ४० बड्या काॅर्पाेरेटसह एकूण ८० थकबाकीदारांची प्रकरणे ‘एनसीएलटी’ (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल)कडे दाखल अाहेत, गेल्या वर्षभरात भूषण स्टील वगळता अन्य काेणाही बाबत निर्णय झालेला नाही. भूषण स्टीलच्या व्यवहारातही बंॅकांना १९,५०० काेटींचा फटका बसणार अाहे. अायबीसीच्या निकालामुळे बुडीत कर्जाच्या ६० टक्के ताेटा बंॅकांना सहन करावा लागू शकताे. याचा अर्थ १० लाख काेटी रूपयांच्या बुडीत कर्जापैकी ६ लाख काेटींचा फटका बसेल. जेमतेम बेताची अार्थिक स्थिती असलेल्या बंॅका एवढा माेठा धक्का सहन करू शकतील का? म्हणूनच ‘अायबीसी’च्या व्यवस्थात्मक त्रुटींवर फेरविचार हाेणे गरजेचे ठरते. सार्वजनिक किंवा खासगी बंॅकांचे व्यवस्थापन धडाडीचे निर्णय घेऊ शकत नाही असे नाही.

 

मात्र राजकीय हस्तक्षेपाच्या विराेधात बाेलण्याचे धैर्य काेणी दाखवत नाही. म्हणूनच तर बुडव्यांचे अाेझे वाढत चालले अाहे. बहुतेक बंॅकांचे मार्च २०१८ चे जमा-खर्च पाहता याेग्य कारवाई झाली, तर मार्च २०१९ मधील निष्कर्ष चांगले दिसू शकतील. अन्यथा बंॅकिंग क्षेत्राचा कणा माेडल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे.

 

 

बातम्या आणखी आहेत...