Home | Editorial | Columns | editorial article about election 2019

विरोधकांची मोट जनताच बांधणार

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 20, 2018, 07:39 AM IST

७० वर्षांपूर्वी आपण जे तंत्रज्ञान विकासाचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी जे प्रयत्न केले होते, त्याचीच परिणती म्हणजे सध्य

 • editorial article about election 2019

  ७० वर्षांपूर्वी आपण जे तंत्रज्ञान विकासाचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी जे प्रयत्न केले होते, त्याचीच परिणती म्हणजे सध्याच्या सुखसोयी- अत्याधुनिकता आहे. याच अनुषंगाने राजकारण आणि या मुद्द्यांचा परस्पर संबंध असतो. एखाद्या सरकारनेे विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठीच्या निधीत कपात केल्यास जनतेने आपल्या पातळीवर अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. अन्यथा ७० वर्षांनंतर आपल्या पुढील पिढ्या काय भोगतील, हे सांगता येणार नाही.


  भविष्यात निर्माण होणारा भारत वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असेल, असा विचार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. त्यांच्या परिघात त्या वेळी सर सीव्ही रमण यांच्यापासून होमी जहाँगीर भाभा, एसएस भटनागर, सत्येन बोस इत्यादी वैज्ञानिक होते. हे त्यांच्या मित्रासारखेच होते, तर दुसरीकडे निराला, रघुपती सहाय, फिराक गोरखपुरी, दिनकर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक होते. नेहरूंचा मित्रपरिवारच असा होता. एनडीएच्या पहिल्या कार्यकाळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजूबाजूला वैज्ञानिक नसले तरी किमान साहित्यिक होते. पण सध्या देशावर ज्यांचे नेतृत्व आहे, त्या नरेंद्र मोदींपासून त्यांचे अनेक सहकारी कुणाच्या संगतीत आहेत, हे पाहणे आवश्यक आहे. हे सर्व जण बुवा-बाबांच्या संगतीत असतात. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतात.


  हा खूप मोठा बदल होता. २०१४ नंतर साहित्य आणि विज्ञान व तंत्रज्ञानावर मोठे आघात होऊ लागले आहेत. यात सर्वात अग्रस्थानी पंतप्रधान होते. भारतीय वैज्ञानिक परिषदेत कुणी म्हणाले की, आमच्या देशानेच सर्वप्रथम विमाने तयार केलेली आहेत, गणपतीच्या आख्यायिकेवरून असे कळते की, त्या काळी आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीदेखील होती. एवढेच नाही, तर स्टेम सेलमुळेच कर्णाचा जन्म झाला, अशीही वक्तव्ये करण्यात आली. पंतप्रधानांनीच या वक्तव्यांना दुजोरा दिला तर त्याचे तीन परिणाम होतात. एक म्हणजे या सरकारचे मंत्री, खासदार आणि पक्षातील इतर सदस्यदेखील वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दुरावतात. उत्तर प्रदेशातील सीतेच्या जन्माचे वक्तव्य नुकतेच अनेकांनी ऐकले असेल.


  दुसरा परिणाम म्हणजे, आता देशाच्या निर्मितीत वैज्ञानिक दृष्टिकोन हा आधार नसेल, असा संदेश नोकरशाहीला जातो. याउलट जुने किस्से, पुराण कथांतून अनेक संदर्भ पडताळून पाहण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.


  तिसरा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीच्या निधीत कपात झाली आहे. कौन्सिल ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च अर्थात सीएसआयआरच्या महासंचालकांनी सर्व संचालकांना पत्र लिहून कळवले की, सध्या आर्थिक आणीबाणी असून तुम्ही बाहेरून निधी मिळवण्याची व्यवस्था करा. आता हे वैज्ञानिक भिक्षापात्र घेऊन कुठे जाणार? ते जातील खासगी उद्योग क्षेत्राकडे. तेथेच जास्त पैसा आहे. आयआयटीमध्ये एक सेंटर स्थापन केले जाणार आहे. तेथे पंचगव्यावर संशोधन होईल. आतापर्यंत आपण कटिंग एज तंत्रज्ञानावर बोलत होतो. एवढेच नाही, तर आपण जगासोबत उभे राहू शकू, अशी कामगिरी करून दाखवणार आहोत, असे बोलले जात होते. आयआयटी खडगपूरमध्ये आता वास्तुशास्त्रावर संशोधन होणार आहे. एकीकडे आपण सरस्वती शोधण्यावर पैसा लावत आहोत, तर दुसरीकडे रामसेतू बांधण्यासाठीही पैसा खर्च करणार आहोत. हीच सध्याची सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे.


  सीएसआयआरकडून वर्षभरातून अनेक संशोधनांवर प्रबंध दिले जात होते. त्यांचे प्रमाण मागील चार वर्षांत वर्षाला ५०० या प्रमाणात कमी झाले आहे. कदाचित सीएसआयआरकडून राष्ट्रीय पातळीवर काही चूक झाली असावी. कारण २००० पासून २०१३ पर्यंत आपण खूप वेगाने प्रगती करत होतो. वैज्ञानिक प्रबंधांच्या प्रकाशनात आपण चीनसह इतर अनेक देशांना मात दिली होती. चीनसुद्धा २००२ मध्ये आपल्यासोबत होता. आता तो आपल्यापेक्षा कित्येक पटींनी पुढे आहे. आपण स्पेनला मागे सोडले होते आणि इटलीच्याही पुढे बाजी मारली होती. आता २०१४ ते २०१७ चा डेटा पाहिल्यास संशोधन पत्रिका प्रकाशनाचे प्रमाण झपाट्याने घटले आहे. आता आपण २००० या वर्षाच्या स्थितीत आहोत. विज्ञान आणि संशोधनाबाबतीत हा उलटा प्रवाह देशासाठी खूप घातक ठरू शकतो.


  ७० वर्षांपूर्वी आपण जे तंत्रज्ञान विकासाचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठी जे प्रयत्न केले होते, त्याचीच परिणती म्हणजे सध्याच्या सुखसोयी- अत्याधुनिकता आहे. याच अनुषंगाने राजकारण आणि या मुद्द्यांचा परस्पर संबंध असतो. एखाद्या सरकारनेे विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठीच्या निधीत कपात केल्यास जनतेने आपल्या पातळीवर अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. अन्यथा ७० वर्षांनंतर आपल्या पुढील पिढ्या काय भोगतील, हे सांगता येणार नाही. विज्ञानासोबतच संस्कृतीवरही जो हल्ला होत आहे, त्यामुळे देश आणखीच पिछाडीवर जात आहे.


  राजकीय विश्लेषक म्हणून या मुद्द्यांकडे पाहता, असे दिसते की, अनेक समस्या जनतेने उचलून धरल्या आहेत. या काळात अनेक विचित्र निर्णय घेतले गेले. नोटबंदीपासून जीएसटीपर्यंत. त्यामुळे जनता त्रस्त अाहे, तसेच विभाजनाच्या राजकारणाने ती संभ्रमितही झाली आहे. जीएसटीच्या निर्णयानंतर आपण पुन्हा उभे राहू शकतो. मात्र, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला झालेले नुकसान, समाजाच्या दृष्टिकोनात झालेला बदल इत्यादींचे परिणाम एवढे भयंकर होतील की पुढील अनेक पिढ्यांवर याचे दुष्परिणाम दिसतील.


  आता विरोधकांनी दोन मुद्द्यांवर पुढे आले पाहिजे. एक म्हणजे आम्ही आता भारताची संस्कृती आणि विज्ञान-तंत्रज्ञानावर होणारे हल्ले अजिबात सहन करणार नाहीत. दुसरा म्हणजे ईव्हीएम प्रणालीविरुद्ध मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल. अन्यथा २०१९ ची निवडणूक विरोधी पक्ष जिंकू शकणार नाहीत. मानवाने तयार केलेल्या कोणत्याही यंत्रात छेडछाड करता येते, हे एक वैज्ञानिक म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. माझ्या मते, स्वातंत्र्यासोबत आपल्याला एकच समान हक्क मिळाला आहे. तो म्हणजे मतदानाचा. बाकी सर्व केवळ स्वप्ने आहेत. जी दिवास्वप्नेच राहिली आहेत. पण मतदानाचा हक्कही कुणी अशा प्रकारे हिसकावून घेतला, प्रभावित केला तर ते योग्य नाही. मग ते कुणीही असो. भाजप, काँग्रेस वा इतर पक्ष.


  मागील निवडणुकीत महिला आणि तरुणांनी भाजपच्या पारड्यात भरपूर मते टाकली. पण आता त्यांचा मुखभंग झाल्याचे दिसून येत आहेत. बेरोजगारीचा दर वेगाने वाढला आहे. बेरोजगारीचा दर झपाट्याने वाढत आहे. दोन कोटी नोकऱ्या निर्माण होतील, असे आश्वासन दिले होते, पण नोटबंदी लागू करून ३० लाख नोकऱ्या एका झटक्यात गिळंकृत केल्या. त्यानंतर कोणत्याही क्षेत्रात रोजगार निर्माण झाले नाहीत. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात तर कमीत कमी सेवा क्षेत्राचा तरी विस्तार झाला होता. आता महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे.


  २०१९ चे दृश्य मला आताच दिसते आहे. जनतेचा एक भला मोठा वर्ग विरोधकांना एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावेल. कर्नाटक निवडणूक हे त्याचेच उदाहरण आहे. या पक्षांना एकत्र यायचे नव्हते, पण दोन पक्षांना एकत्र मोट बांधावीच लागली. किंबहुना २०१९ पूर्वीच जनता विरोधकांना एकत्र करून भाजपला टक्कर देण्यासाठी भाग पडेल. कोंबड्या, बकऱ्यांना जसे काठीने हाकलत एकत्र केले जाते, त्याचप्रमाणे जनतेने पोटनिवडणुकांमध्ये या पक्षांना एकत्र येण्यास भाग पाडले आहे.


  एकूणच, राजकारणातील हे एक असे वळण आहे, जेथे राजकीय जाणिवांच्या बाबतीत जनता पक्षांच्याही पुढे निघून गेली आहे. याआधी राजकीय पक्ष नेतृत्व देत असत आणि त्यानुसार जनतेचे मत तयार होत असे. पण आता या ऐतिहासिक वळणावर जनतेच्या जाणिवाच राजकीय पक्षांना पुढे घालत आहेत.

Trending