आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • A Highly Educated Expert Can Create Effective And Innovative Changes In Society

उच्चशिक्षित तज्ज्ञ समाजात अामूलाग्र आणि पाेषक बदल घडवू शकताे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून महत्प्रयासाने गरिबीतून उच्च दर्जाचे शिक्षण मिळवले. शिक्षण घेत असताना जाती विषमतेचे चटके अनुभवले. काेणीही सामान्य माणसाला इतके टोकाचे असह्य परिस्थितीतून शिक्षण घेणे जमणार नाही. ही बाब डाॅ. बाबासाहेबांनाही जाणवली हाेती. म्हणून बाबासाहेबांनी त्याचवेळी प्रतिज्ञा केली हाेती की, ज्या यातना सहन करून शिक्षण घेतले, अशा यातना माझ्या अस्पृश्य बांधवांना हाेता कामा नये. हे ध्येय घेऊन बाबासाहेबांनी पुढील जीवनात राजकारण समाजकारण केले. सर्वांना शिक्षण जीवन सुकर केले. त्याचाच परिपाक अाज अापण पाहताे अाहाेत. शिक्षक, प्राध्यापक, डाॅक्टर, इंजिनिअर, अायएएस, अायपीएस अधिकारी इतर नाेकरी करणारे स्वत:चा व्यवसाय करणारे अस्पृश्य वर्गातील बहुतांश लाेक अाज मानसन्मानाने जीवन जगत अाहेत. डाॅ. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिले, ‘मी माझ्या समाजाला सुटाबुटात पाहिन’ अाज समाजात त्यानुसार घडताना दिसत अाहे. ही बाबासाहेबांची दूरदृष्टी त्यांनी घेतलेले अताेनात परिश्रमाचे फळ अाहे. अाजही बाबासाहेबांचीच पुण्याई कामी येत अाहे. पण बाबासाहेबांनी हे ही स्वप्न पाहिले हाेते की, समाजातील जाे घटक सुटाबुटात अाला अाहे, त्यांनी इतर मागे राहिलेल्या समाज बांधवांसाठी नव्याने तळमळीने काम करणे, सहाय्य करणे अपेक्षित अाहे. तसे हाेताना दिसत नाही. उलटपक्षी सुटाबुटातला समाज गरीब समाजापासून दूर झालेला अाहे. 
 
सुख वस्तू झाल्याने समाजातील मागास घटकांकडे बघेनासा झाला अाहे. त्यांचा माझा काय संबंध? अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या चळवळीची धार बाेथट हाेत अाहे. सुटाबुटातल्या शिक्षित साहेबांनी साेईस्कररीत्या चळवळीतून अंग काढून घेतले अाहे. बाबासाहेबांनी म्हटले हाेते की, ‘चळवळीचा रथ मी इथवर अाणला अाहे. त्याला पुढे नेता येत नसेल तर नका नेऊ पण मागे जाऊ देऊ नका’. उच्चशिक्षण घेऊन तज्ज्ञ झालेलाच समाजात अामूलाग्र अाणि पाेषक बदल घडवू शकताे. अशा लाेकांनी समाजाच्या उन्नतीसाठी समाजामध्ये समतेने ममतेने वावरल्यास समाज अशांकडून प्रेरणा घेताे तसा बनण्याचा प्रयत्न करताे. 
(लेखक भुसावळच्या सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता आहे.) 
 
बातम्या आणखी आहेत...