आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरोपचा धगधगता इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्स-रे - जर्मनीने आपल्या जीन्सद्वारे युरोपला एकत्रित केले आहे.
एकूणच युरोपियन युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न पुरातन काळापासून चालत आलेला आहे. ग्रीकांना त्यांच्या पश्चिम आणि उत्तरेकडील शेजारी आवडत नसत. ते त्यांना बार्बारियन्स म्हणजे रानटी लोक म्हणत.

युरोपियन युनियन स्थापन करण्याची योजना ही इतिहासातीलएक सर्वात जुनी योजना होती आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटनने पडणे हा अगदी अलीकडील भाग झाला. परंतु एकूणच युरोपियन युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न पुरातन काळापासून चालत आलेला आहे. ग्रीकांना त्यांच्या पश्चिम आणि उत्तरेकडील शेजारी आवडत नसत. ते त्यांना बार्बारियन्स म्हणजे रानटी लोक म्हणत. याचे कारण त्यांच्या भाषेतून ‘बार बार’ हा शब्द अधिक ध्वनित होत असे. मॅसेडोनियाचा महान योद्धा अलेक्झांडर यालाही युरोपमध्ये फारसा रस नव्हता. दक्षिणेतून तो ग्रीसमध्ये हल्ला करण्यासाठी आला, तेव्हा युरोपकडे त्याने लक्षही दिलं नाही. त्यानंतर तो पूर्वेकडे गेला आणि मग आशिया खंडामध्ये त्याने प्रवेश केला. इजिप्तमध्ये काही काळ वास्तव्य असताना त्याने पर्शिया जिंकला. त्या आधी त्याने रशियाला ताब्यात घेतलं. मग बराच काळ मध्य आशियाचा एकेक भाग पादाक्रांत केला आणि अखेरीस अफगाणिस्तान. त्यानंतर त्याला पंजाबच्या तुंबळ युद्धाला सामोरे जावे लागले.

ज्युलियस सीझर त्याच्यानंतर तीन शतकांनी उदयाला आला. युरोपला अमलाखाली आणण्याची मोठी कामगिरी करणारा तो पहिला योद्धा होता. ख्रिस्त जन्मानंतर काही दशकांतच सीझरने इटालियन सैन्याला सोबत घेत फ्रान्स जर्मनीत प्रवेश केला. त्याने तिथल्या जंगली टोळ्यांना चांगलाच हादरा दिला. त्यानेच पुढे इटालियनांना इंग्लंडमध्ये आणलं. तेव्हा इंग्लंड हे कॉस्मॉपॉलिटन होते. या काळात युरोपवर प्रामुख्याने रोमची सत्ता होती. सीझरच्या नंतरचा वारस होता ऑगस्टस. नवव्या शतकात जर्मनीमधील ट्युटूबोर्ग जंगलामध्ये त्याला स्थानिक टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. या युद्धातील पराभवाने ऑगस्टसची उत्तरेकडची मोहीम बंद पडली. युरोपमधील शहरी आणि संस्कृतीधारक प्रजा ही त्या काळात प्रामुख्याने दक्षिण भागात जमा झालेली होती. उत्तर युरोपची प्रजा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या प्रबळ, पुढारलेली असूनही ती तेव्हा जंगलात राहत होती. रोमच्या सैन्याने त्यानंतर पूर्वेकडे कूच केलं. जेरुसलेम आणि सिरियामध्ये त्यांनी प्रवेश केला. रोमन सैन्याने आपला सगळ्या साम्राज्याचे केंद्र इस्तंबूल शहर ठरवलं आणि या शहराचा विकास झाला.

पाचव्या शतकात या जर्मनीतल्या टोळ्या रोममध्ये एकवटल्या होत्या. या नंतरचा काळ हा ‘डार्क एजेस’ म्हणजे ‘अंधार युग’ म्हणून समजला जातो. या काळात युरोपात लेखन किंवा वाचन अगदी मंदावत गेलं. हे घडण्याचं प्रमुख कारण म्हणजे मुस्लिमांनी इजिप्तवर मिळवलेला विजय होय. मुस्लिमांच्या आक्रमणामुळे कागदाची निर्यात बंद झाली. साहजिकच कागदच नाही तर पुस्तक कुठून लिहिणार? त्यामुळे पुस्तकाचं लेखन बंद झालं.

पुढे सातव्या शतकात ख्रिश्चन धर्माच्या प्रसारातून युरोपला एकसंघ करण्याचा प्रयत्न सुरू झाला. इसवी सन ७११ मध्ये अरबांनी स्पेनवर विजय मिळवल्याने युरोपमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (जसे आज सिरियातील लोक जगभर जात असल्यामुळे जे भीतीचं वातावरण निर्माण झालं तसं) याच वेळी रोममध्ये पोपने जर्मन टोळीप्रमुख चार्ल्स याला पहिला पवित्र रोमन सम्राट म्हणून घोषित केलं. त्याच नाव होतं चार्ल्स ग्रेट. याच्या काळात युरोपमध्ये सरंजामदारी फोफावली. इंग्लंड फ्रान्समधील प्रबळ राजे एकत्र झाले आणि युरोपची भूमी विभागली गेली. चार्ल्स ग्रेटचा नातू चार्ल्स फॅट (चार्ल्स तिसरा) हा एकसंघ युरोपवर राज्य करणारा शेवटचा राजा होता. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात चर्चचा प्रभाव रोममध्ये वाढू लागला. त्यांनी जेरुसलेम परत मिळवण्यासाठी राजसत्तेचं मन वळवलं. त्यातूनच क्रुसेड नावाच्या महायुद्धाला सुरुवात झाली.

नवव्या शतकात जर्मनीत प्रोटेस्टंट पंथ फोफावत होता नंतर तो इंग्लंडमध्येही गेला. त्याने युरोपमधील धार्मिक बंध तोडून टाकले. मुस्लिम सत्ता प्रबळ होत गेल्याने पूर्व युरोपमधील चर्चची ताकदही कमी होत गेली. त्यानंतर युरोपमध्ये प्रबोधनाचे युग येऊन औद्योगिक क्रांती घडली. रोम साम्राज्याच्या काळात जसा युरोप होता तसा तो पुन्हा निर्माण होऊ लागला. आधुनिक विज्ञानामुळे लष्करी तंत्रज्ञान जन्मास आले त्या बळावर नेपोलियन नावाचा सम्राट फ्रान्समध्ये उदयास आला. नेपोलियनने पराक्रमाच्या बळावर काही काळ युरोपला एकत्रित केलं. हजार वर्षांनंतर पुन्हा एकदा युरोप एकसंघ होत होता. नंतर १९४० च्या दशकात हिटलरने लष्करी बळावर पुन्हा युरोपला एकत्रित केलं. नाटोचे मुख्यालय युरोपमध्ये ब्रुसेल्स येथे झाले आणि त्या इमारतीला चार्ल्स ग्रेटचे (Charlemagne) नाव दिलं आहे. पुढे जर्मनीचे एकीकरण झाले त्यानंतर २५ वर्षांनंतर युरोपियन युनियनची ताकद बर्लिनमध्ये एकवटलेली आहे.

युरोप एकसंघ करण्याची Charlemagne ची योजना कधी यशस्वी, तर कधी अयशस्वी होत गेली आहे. त्यामागे लष्करी विस्तार, धर्म, व्यापार ही मूलभूत कारणे होती. या संघर्षात युरोपमधील देशांच्या सीमा कित्येक वेळा बदलल्या. त्यात ब्रिटनचे युरोपातून बाहेर पडणं ही इतिहासातील आणखी एक घटना आहे. एक गमतीशीर गोष्ट इथे नमूद केली पाहिजे, फ्रान्स हा शब्दच फ्रँक्स (Franks) या जर्मन टोळीच्या नावावरून आला आहे. या टोळीने जो भूभाग जिंकला होता तो आजचा फ्रान्स आहे. या टोळ्यांनीच जर्मनीतील एका शहराला फ्रँकफर्ट हे नाव दिले आहे. इंग्लंडचा अर्थ आहे Land of Angles. या भूभागावर कधीकाळी उत्तर जर्मनीतील टोळ्यांनी कब्जा मिळवला होता, तर इटलीच्या उत्तरेकडील लोंबार्डी शहराला नाव एका जर्मन टोळीमुळेच मिळाले आहे. एकंदरीत युरोपचा इतिहास पाहिला तर जर्मनीने युरोपला जीन्सद्वारे एकत्रित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...