आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवापुढील आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका अंदाजानुसार, पंचवीस वर्षांनंतर आपल्याकडील संगणकाकडे इतकी बुद्धिमत्ता असेल की त्यामुळे संगणक माणसापेक्षा अधिक स्मार्ट बनत जाईल. तो वेग इतका वाढेल की जणू स्फोटच होईल. मानवाला बायोकेमिकल प्रोसेसमुळे माहिती साठवण्यात मर्यादा आहे. पण संगणकाचा वेग वाढतच जाणार.
 
अमेरिका हे जगातील सर्वात प्रगत राष्ट्र मानले जाते. अनेक विचित्र गोष्टींची तिथे कायम चर्चा होत असते. त्याच्याबाबत सतत पुस्तके लिहिली जातात किंवा यूट्यूबवरच्या चर्चांमध्ये त्यावर चर्चा केली जाते. पण त्यावर कुठलीही कृती आजवर तरी केली जात नाही. पण आता मात्र करावी लागेल. ते विषय कोणते? यातला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धिमत्तेचा. झालेय असे की कृत्रिम बुद्धिमत्ता आता माणसाला मागे टाकू लागली आहे. आता भारत म्हणजे तसा जुनाच देश, त्याच्यावर या गोष्टीचा फार फरक पडत नाही. याचे कारण आपल्या दृष्टीने संगणक म्हणजे काय तर आपला जाच्यावर ताबा असतो अशी गोष्ट म्हणजे सारे हे आपण साधने म्हणून वापरतो. ते आपले नोकर- चाकर आहेत. ते काही आपले मालक नव्हेत, पण अमेरिकेत अशी स्थिती आहे की तंत्रज्ञान क्षेत्रात जी बुद्धिमान माणसे काम करतात त्यांना असे वाटतेय की एक वेळ अशी येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता श्रीमंत माणसावर मात करेल. म्हणजे संगणक प्रोग्राम किंवा हे मात करतील. हे असे का होतेय यामागे दोन कारणे आहेत. पहिले असे की बुद्धिमत्ता म्हणजे काय याच्यात काही जादू नाही माणूस ज्या प्रकारे काम करतो ते काही जादुई नव्हे. कुठलाही विचार करणे हे वैज्ञानिक किंवा जैविक तत्त्वांच्या आधारे समजावून देता येईल. बुद्धिमत्ता म्हणजे माहिती आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता. गेल्या तीन वर्षांमध्ये संगणक हे अधिक प्रगत आणि बुद्धिमान झालेले आहेत. मला एक साधे उदाहरण द्यायचे आहे. अमेरिकेत आज अशा मोटारगाड्या तयार झालेल्या आहेत की त्या आपोआप चालतात. त्यांना ड्रायव्हरची गरज लागत नाही. याचाच अर्थ या मोटारगाड्या माणसाच्या मदतीशिवाय चालू शकतात. त्यात माणूस वर्तमानपत्र वाचू शकतो किंवा आराम करू शकतो किंवा झोपी जाऊ शकतो. केवळ दोन वर्षांच्या अंतरावर ही प्रगती होत आलेली आहे. आता ही गाडी आपण करतो ती सगळीच कामे करू शकते. म्हणजे गाडी सुरू करणे, गिअर बदलणे, ब्रेक दाबणे, वेग वाढवणे. एवढेच नाही, ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्याही गोष्टी या गाड्या करू लागल्या आहेत. रस्त्यावर समोरचा धोका या गाड्यांना अगोदरच कळू शकतो किंवा मागे कोणी आल्यास ते तिला समजू शकते, जे माणसाला शक्य नाही. शिवाय इंधन कमी वापरावे म्हणून ती ड्रायव्हिंगचा वेग त्यानुसार कमी- जास्त करते. या मोटारी नेटवर्कला जोडता येत असल्याने आपल्याला हजारो किलोमीटरच्या रस्त्याची माहिती समजू शकते. आणि मी हे सांगतो ते हे सर्व मूलभूत आहे. संगणक ही सर्व कामे करू शकतो त्यातली ही साधी आणि मूलभूत कारणे आहेत.  

कृत्रिम बुद्धिमत्ता किती वेगाने वाढेल आणि वाढत का जाणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माणसाला तंत्रज्ञानाची गरज लागेल. विविध रोगांचे, आजारांचे उपचार शोधण्यापासून ते व्यवसाय कसा करायचा इथपर्यंत माणसाला तंत्रज्ञानाची मदत लागते. संगणकाच्या बुद्धिमत्तेचा उपयोग न करता आपण जगू शकत नाही. हेही आता बदलणार आहे. 

दुसरी गोष्ट आता लोक मान्य करू लागलेत ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो वेग आहे त्या वेगाने आपण प्रगती करू शकत नाही का? याचे कारण असे की आपल्या मेंदूचा आकार ठरलेला आहे. आणि जाच्याद्वारे आपण आठवू शकतो त्यालाही एक विशिष्ट मर्यादा आहे. अशी मर्यादा संगणकीय बुद्धिमत्तेला नाही. तिची क्षमता अमर्याद आहे. म्हणजे उदा : इमारतीच्या आकाराचा संगणक एखादा माणूस तयार करू शकतो. आता प्रश्न पडेल कोणी इतका मोठा संगणक का तयार करेल? अर्थात असा संगणक तयार करण्यात धोका आहे हे माहीत असूनही. याचे कारण असे, तांत्रिक प्रगती ज्याला म्हणतात ती जगातील संगणकांना आवश्यक आहे. आणि जगातील सर्व कंपन्या आणि सैन्य अधिकाधिक तंत्रज्ञान आपल्याकडे असावे आणि इतरांना मदत करावी याने पछाडलेले आहे. ही जी शर्यंत सुरू आहे ती काही वर्षांपूर्वी सुरू झाली. ती आता न थांबता सुरूच राहणार आहे. विशेषतः लष्करे आणि बलाढ्य कंपन्या अधिक अधिक बुद्धिमान अधिक अधिक विचार करू शकणारे संगणक आणि संगणकीय प्रणाली तयार करणार आहेत. अशा बुद्धिमत्तेला जर पूर्ण स्वातंत्र्य दिले तर माणूस तिच्या वाटेला जाऊ शकणार नाही. वीस वर्षांपूर्वी एक संगणकाने एका बुद्धिबळपटूला हरवले. या वीस वर्षांत तर संगणकांनी त्याच्या किती तरी पट बुद्धिमत्ता प्राप्त केली आणि वेग प्राप्त केले आहेत. 

एका अंदाजानुसार, पंचवीस वर्षांनंतर संगणकाकडे इतकी बुद्धिमत्ता असेल की त्यामुळे संगणक माणसापेक्षा अधिक स्मार्ट बनत जाईल. तो वेग इतका वाढेल की जणू स्फोटच होईल. मानवाला बायोकेमिकल प्रोसेसमुळे माहिती साठवण्यात मर्यादा आहे. पण संगणकाची  माहितीची प्रणाली वेगाने वाढत जाणार असल्याने त्याच्यावर मर्यादा राहणार नाही. आता आपल्याला कल्पनाच नाही किंवा शून्य कल्पना आहे की ही वाढलेली बुद्धिमत्ता जेव्हा संगणकाकडे असेल तेव्हा काय घडेल? एक अंदाज असा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही साधी असणार नाही. ती फार व्यामिश्र असणार नाही म्हणजे ती किती आपल्याला इजा करेल असे नाही, कदाचित ती आपल्याला किटकासारखे वागवेल. कदाचित ती आपले काहीच ऐकणार नाही. आणि स्वतःचे मत राबवेल किंवा स्वतःला हवे तसे वागेल. यामुळेच अमेरिकेतील लोक विचार करू लागले आहेत. आपल्यालाही हा विषय फार काळ टाळता येणार नाही.  
बातम्या आणखी आहेत...