आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडात कोणत्याही पद्धतीने पैसे गुंतवले तरी कमिशन लागणारच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंडात मिळणारा परतावा पाहून लोकांचा यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. परंतु यात गुंतवणूक करण्यापूर्वी कशात किंवा कोणत्या माध्यमातून गुंतवणूक केली तर किती कमिशन द्यावे लागणार आहे, याची माहिती करून घेणे आवश्यक असते. केवळ एक पर्याय सोडला तर कमिशन द्यावे लागत नाही. बँकेतून गुंतवणूक केली तर तेही कमिशन घेतात. जर कमिशन वाचवले तर फायदा वाढेल. हा डायरेक्ट प्लॅन अाहे, परंतु तो समजून घ्यावा लागेल.
गुंतवणूकदारास म्युच्युअल फंड सध्या उत्तम आणि सर्वात फायदेशीर साधन वाटते आहे. याच्या मदतीने गुंतवणूकदार खूप मजबूत पोर्टफोलिओ उभा करू शकतात. जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर हा चांगला पर्याय आहे. कारण तो पूर्णत: सेबीकडून नियंत्रित आहे. त्यामुळे याला मॅनेज करणे कठीण नाही. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कधीही बदलू शकता आणि जोखीमही कमी करू शकता. माझ्या स्वत:च्या अनुभवानुसार छोट्या गुंतवणूकदारांचे आपल्या गुंतवणुकीवर नियंत्रण असते. यासाठी या दृष्टीने ते खूप जागरूक असतात. नवे तंत्रज्ञान आल्याने आणि २००८ मध्ये म्युच्युअल फंड एंट्री लोडवर प्रतिबंध असल्याने अनेक एजंटांनी म्युच्युअल फंड विकणेच बंद केले होते. परंतु त्याच काळात हे फंड खरेदी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समोर आल्या.

म्युच्युअल फंड वेगवेगळ्या पद्धतीने कसे खरेदी कराल?
एजंटच्या माध्यमातून : कोणत्याही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा हा सर्वाधिक प्रचलित मार्ग आहे. यात एजंट होण्याआधी त्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. परीक्षा पास झाल्यानंतर त्याला म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटरचे लायसन्स मिळू शकते. त्यानंतरच तो म्युच्युअल फंड विकू शकतो. अशा प्रकारचे एजंट सहज आपल्या आजूबाजूला असलेले दिसून येतात. गरज पडल्यास तुम्हाला एएमएफआय(असो. ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया) च्या वेबसाइटवरही याची माहिती मिळवता येते. सेबीद्वारा २००८ मध्ये एंट्री लोड चार्ज करण्यास प्रतिबंध आल्यानंतर एजंटांना गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या सेवेसाठी चार्ज लावण्याची परवानगी दिली गेली. बहुतांश एजंट वेगळी फी घेत नाहीत. एएमसीला मिळत असलेल्या कमिशनमध्येच त्यांचा फायदा असतो. एजंटांनी स्वत:ची आर्थिक स्थिती पाहावी, त्याचबरोबर आपण किती जोखीम घेऊ शकतो, हेही पाहिले पाहिजे. त्यानंतरच एजंट तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड देऊ शकतो. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सर्व गोष्टींची योग्य माहिती मिळायला हवी. एजंट तुम्हाला कोणकोणत्या सेवा देणार आहे, हेही विचारून घ्यावे.

एएमसीचे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस सेंटर : सप्टेंबर २०१२ मध्ये सेबीने एक परिपत्रक काढले असून म्युच्युअल फंड कंपन्यांना सांगितले होते की, गुंतवणूकदारांसाठी एक वेगळा डायरेक्ट प्लॅन आणावा. एजंटशिवाय ज्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावयाची आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी तो प्लॅन असावा. यात फायदा असा की, खर्च कमी लागतो. कारण कमिशन वाचते.

म्युच्युअल फंड कंपन्या एजंटांना जे कमिशन देतात, तसाच हा प्रकार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना याचा फायदा होतो. जर तुम्हाला म्युच्युअल फंडाबाबत चांगली माहिती असेल तर कोणत्या प्रकारची चांगली स्कीम निवडावी, रेग्युलर प्लॅनमध्ये कधी गुंतवणूक करणे थांबवावे आणि केव्हा डायरेक्ट प्लॅनमध्ये शिफ्ट व्हावे, तर आपला फायदा होईल हे पाहिले पाहिजे. तुम्ही अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन अर्ज देऊ शकता किंवा वेबसाइटवरून प्लॅन खरेदी करू शकता. तुमची गुंतवणूक रेग्युलर प्लॅनमध्ये आणण्याआधी कॅपिटल गेन टॅक्स आणि एक्झिट लोडबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

सीएएमएस : सीएएमएस बहुतांश म्युच्युअल फंड कंपन्यांची ट्रॅन्झेक्शन प्रोसेसिंग आणि रेकॉर्ड कीपिंग एजन्सी आहे. तुम्ही सीएएमएस ऑफिसला जाऊन तेथे म्युच्युअल फंड विकत घेण्यासंदर्भात बोलू शकता. यासाठी अर्ज द्यावा लागतो. जर तुम्ही ऑनलाइन काम करत असाल तर सीएएमएसजवळ मायसीएएमएस ऑनलाइन युटिलिटी आहे. तथापि, अशा प्रकारची सुविधा केवळ भारतीय गुंतवणूकदारांना मिळते. यात होल्डिंग किंवा तुमची किंवा कोणा एकाची अथवा दोन लोकांचीही असू शकते. यात एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याला फायदा मिळतो. एसआयपी/एसडब्ल्यूपी/एसटीपीच्या ट्रॅन्झेक्शनची सुविधा अद्याप देण्यात आलेली नाही.
डिमॅटद्वारे : जर तुमचे डिमॅट खाते असेल तर कोणतीही स्कीम डिमॅटच्या स्वरूपात घेऊ शकतात. पण डिमॅटद्वारे केवळ रेग्युलर प्लॅन घेता येतात. डायरेक्ट प्लॅन नाही. कारण डिपॉझिटरी पार्टिसिपेटसुद्धा म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करतात. यामुळे त्यांना कमिशन तर द्यावे लागते. यात प्रत्येक ट्रॅन्झेक्शनवर फी घेता येते. यासाठी तो सुरू करण्याआधी लक्षात घेणे गरजेचे आहे.

बँकांतून : तुम्ही बँकांतून म्युच्युअल फंड घेऊ शकता. येथे बँक एजंटसारखे काम करते. बँका निवडक म्युच्युअल फंडच विकतात हे लक्षात घ्या. त्यामुळे उत्तम स्कीमची निवड करू शकत नाही.

आॅनलाइन पोर्टल्सद्वारे : सध्या लोकांकडे तंत्रज्ञानाची नवी साधने आहेत. आपल्याच स्तरावर गुंतवणुकीस प्राधान्य देतात आणि याची त्यांना कल्पनाही असते. तुम्ही एएमसीच्या वेबसाइटवर जाऊन गुंतवणूक करावी.

काही लोकांना ही बाब कठीण वाटते. तेव्हा त्यांनी ऑनलाइन ट्रॅन्झेक्शन प्लॅटफॉर्मवर जाऊन गुंतवणूक करावी. यात फंड्स इंडिया एजंटसारखे काम करते. परंतु ती तुम्हाला ऑनलाइन खरेदी-विक्री करण्याचा ऑप्शन देते. कोणत्याही योजनेत स्विच करत असाल तर पैसे परत घेण्यास ती तुमची मदत करेल. पेपरवर्क केल्यानंतर खाते उघडले जाते. त्यानंतर तुम्ही सहज उलाढाल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फंड व्हॅल्यू, फायदा-तोट्याचा अहवाल लगेच मिळू शकतो. पण हे पोर्टल तुम्हाला डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करू देणार नाहीत. कारण त्याला कमिशन लागते. मग डायरेक्ट प्लॅन असल्याचा फायदा कोणता? म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर कमी गुंतवणूक करून चालणार नाही. ते फक्त डायरेक्ट प्लॅनमध्येच शक्य आहे. याचा फोलिओ तयार करताना एकदा प्रयत्न करावा लागतो. त्यानंतर तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक करू शकता. मात्र, या पद्धतीचा काळजीपूर्वक अभ्यास असावा लागतो. तरच या योजनेत फायदा निश्चित मिळेल. त्यामुळे सावधपणे गुंतवणूक केलेली बरी.

(पर्सनल फायनान्स, तज्ज्ञ, एफपीजीआयचे माजी सदस्य)
बातम्या आणखी आहेत...