आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यावर येणारी संकटे ओळखण्यास शिका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोरावस्थेत शरीराचा विकास, हार्मोन्सच्या कारणामुळे होणारे बदल, भावना आणि समज येण्यामुळे माणसात खूप बदल घडतात. भावी आयुष्यात जीवनसाथी किंवा नोकरी अथवा संपत्ती गमावण्याने अंधकार पसरतो. ही अापली ओळख पटण्याचे एक संकट आहे.
भेटणाऱ्या लोकांमध्ये समान धागा शोधा
१. कोणाची भेट झाल्यास त्याच्यात आणि आपल्यात समान धागा शोधा. कदाचित दोघांनाही एखादे पुस्तक आवडत असेल. तेव्हा तुम्हाला वाटेल की हा तर माझ्यासारखाच आहे. जाणीव पूर्वक निवडलेला हा विचार तुमची धारणाच बदलून टाकेल. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होईल.

२. अातून आपल्यात मोठा बदल व्हावा वाटतो. तेव्हा त्यानुसार बदलले पाहिजे.

३. नोकरी, संपत्ती, कार, प्रिय व्यक्तीच्या अनुषंगाने स्वत:ची ओळख तयार कराल तर त्या गमावून बसण्याचे संकट निर्माण होइल. मूल्ये, हुन्नर, यशावर स्वत:ची ओळख बनवा.

तुमच्या आवडीनिवडीवर लक्ष द्या, त्या जाणून घ्या
१. तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा व्यतीत करता, तुमच्या आवडीनिवडीवर किती वेळ खर्च करता आणि ऊर्जा लावता, यावर विचार करा. याची निवड तुम्ही तुमच्या स्वभावानुसारच केली असेल. यावरून तुम्ही कोण आहात हे समजून येईल.

२. निकटच्या काळात काय बनू इच्छिता याचे चित्रण डोळ्यासमोर आणा. कल्पना करा. त्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.

३. आपली प्रिय व्यक्ती गमावणे किंवा नोकरी जाणे खूप क्लेशदायक असते. या संकटाचे संधीत रूपांतर करा.

आपली मूल्ये सखोलपणे जतन करा
१. आपली मूल्ये आचरणात आणा. कारण ती तुमची ओळख बनतात. जर करुणाभाव बाळगण्याने भले होत असेल तर तो अमलात आणा. सामुदायिक भावनांवर विश्वास असेल तर शेजाऱ्यांशी मिळूनमिसळून राहा.

२. नवीन काही गोष्टी करण्याचे राहून गेल्याचा पश्चात्ताप दहा-पंधरा वर्षांनी करण्याऐवजी आताच त्यावर विचार करा. नवीन काही करण्यात आलेले अपयशसुद्धा परिपक्व बनवेल.

३. कुटुंब किंवा मित्रांची तुम्हाला खूप काळजी वाटते, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यानेही आनंद होतो, याची जाणीव त्यांना करून द्या.