आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे वॉकआऊट म्हणजे तोंड लपवण्याचा प्रकार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांपैकी ३०-३५ वर्षे देशातील आर्थिक धोरणात्मक निर्णयांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारे कदाचित हे एकटेच असतील. या काळात कित्येक घोटाळे झाले, मात्र यांच्यावर एकही कलंक लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला तर डॉक्टरसाहेबांकडून शिकली पाहिजे.’ ही तर मनमोहनसिंगांची स्तुती होती; पण या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी भवनातून वॉकआऊट केले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला अर्थसंकल्पावर टीका करता आली नाही. कारण सामान्य जनतेच्या प्रतिक्रियांवरून अर्थसंकल्प उत्तम होता, हे स्पष्टच होते. लोकसभेतही पंतप्रधानांनी अर्थसंकल्पातील प्रभावी तथ्य मांडले.  त्यामुळेच काँग्रेसला नोटबंदी आणि अर्थसंकल्पावरून सरकारला घेरता आले नाही. यामुळेच त्यांनी राज्यसभेत नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर वॉकआऊट केले.  
 
तसं पाहिलं तर मनमोहनसिंगांचा अपमान काँग्रेसनेच अनेकदा केला आहे. राहुल गांधींनी कलंकित नेत्यांविरोधातील केंद्राच्या अध्यादेशाची प्रत पत्रकार परिषदेत फाडून विरोध दर्शवला होता. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग अमेरिका दौऱ्यावर होते. मग त्या वेळी मनमोहनसिंगांचा अपमान नाही का झाला? एक प्रामाणिक व्यक्ती अशी मनमोहनसिंगांची प्रतिमा आहे. त्यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू यांनी आपल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकात लिहिले आहे की, काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेसने त्यांच्या कामात हस्तक्षेप केला, तेव्हा त्यांच्याकडून चुका होऊ लागल्या. पंतप्रधान कार्यालयातील प्रत्येक फाइल काँग्रेस नेत्यांकडे जात होती. एकूणच सध्याच्या निवडणुकांच्या काळात काँग्रेसला मनमोहनसिंगांच्या अपमानापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या उत्तराची भीती अधिक सतावत होती.

कॉर्पोरेट लॉयर, नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट, दिल्ली. 
 
बातम्या आणखी आहेत...