आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचा अकारण योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगाभ्यास ठेवणे फार गरजेचे आहे, असे मला वाटते. आधुनिक योगाभ्यास पद्धती ही काही प्राचीन नाही (शारीरिक हालचाली किंवा शारीरिक पोझ) आणि असे म्हणणारे एकही उदाहरण नाही, असे अमेरिकी विदुषी वेंडी डोनेगर यांनी लिहिले आहे. १८ व्या व १९ व्या शतकात आधुनिक योगाभ्यास युरोपियांसोबत भारतात आला, पण पतंजली योगसूत्रांमध्ये योगातील शारीरिक हालचालींचे कोणत्याही प्रकारे वर्णन केलेले नाही. रुसोच्या ‘एमिली’सारख्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन युरोपीय लोक शारीरिक हालचालींचे फायदे काय आहेत, याचा सतत शोध घेत होते. मात्र, अनेकांना हे मान्य नाही आणि ते योग हे प्राचीन असल्याचेच मानतात. वस्तुस्थिती काहीही असो, सत्य हेच आहे की, योगाभ्यास लाखो भारतीयांना परिचित आहे. यामुळे अॅथलेटिक्स किंवा जिम्नॅस्टिक्सपेक्षा शाळेत विद्यार्थ्यांना योगाभ्यास शिकवणारे शिक्षक शोधणे सहजसोपे आहे.
काही वर्षांपूर्वी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कोर्स करताना मला योगाचे फायदे समजले व शिकता आले. योगामुळे मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकता आली ती म्हणजे, मन शांत ठेवण्यासाठी आपण शरीराचा वापर करू शकतो. हे योगातील भराभर श्वास घेण्याच्या क्रियेनंतर घडते. योगामध्ये ‘सुदर्शन क्रिया’ आहे. या क्रियेच्या दरम्यान वर्गखोलीमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे जनक श्री श्री रविशंकर यांचा फोटो समोर ठेवण्यात येतो. ज्यांना त्यांना नमस्कार करावासा वाटतो, ते नमस्कार करत; पण ते ऐच्छिक होतं. माझ्या मनाला ते पटत नसल्यामुळे मी तसबिरीसमोर कधी नमलो नाही.
एकाने उत्सुकतेने तिथल्या एका योग शिकवणाऱ्या शिक्षकाला विचारले, ‘रविशंकर हे खरं नाव. पण मग श्री श्री रविशंकर म्हणजे नावाला दोनदा श्री का लावतात?’ त्या शिक्षकाने उत्तर दिलं, ‘तीनदा श्री लावणे हे जरा जास्त होतं आणि एकच श्री ठेवणे हे फारच कमी वाटते म्हणून ते दोनदा श्री लावतात.’ असो, मी ही गोष्ट सांगण्याचं कारण एकच की योगाभ्यास शिकण्याचे फायदे तुम्हाला समजावेत आणि कोणत्याही धार्मिक किंवा भक्तीच्या पाशात न अडकता योगाभ्यास करता येतो. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सरकारने ठरवले आहे. त्यासाठी देशातील सर्व शाळांमधून सूर्यनमस्कारासह विविध आसने करण्याचे योजिले होते; परंतु भारतीय जनता पक्ष मुस्लिम विद्यार्थ्यांना हिंदू धर्मात आकर्षित करण्यासाठी हे उद्योग करत आहे, असा अखिल भारतीय मुस्लिम संघटनांनी आरोप केल्यावर सरकारने सूर्यनमस्कार त्यातून वगळायचे असे ठरवले.
मला वाटतं, हे दुर्दैवी आहे. सूर्यनमस्कार हा असा एक योगप्रकार आहे, ज्यामुळे साधकाला परिपूर्ण व्यायामाचा लाभ होतो. अगदी कुणालाही त्याचा लाभ घेता येतो. कुठल्याही धार्मिक बाबीशी त्याचा संबंध नाही. यामध्ये उभे राहणे, वाकणे, पाय मागे घेणे, जोरबैठका, वेगाने शरीर वळवणे आदी क्रियांचा समावेश आहे. त्यामुळे हलका कॅलॅथेनिक्स आणि शरीराच्या वजनाचा वापर करण्याचा यात वापर होतो. सूर्यनमस्कार करणारे लाखो अमेरिकन आणि युरोपियन लोक याकडे सूर्याची भक्ती करण्याचा प्रकार म्हणून पाहत असतील, असे मला वाटत नाही. ते सूर्यनमस्कार घालतात, ते त्यातून मिळणाऱ्या व्यायामासाठी. मला वाटतं, भारतातील मुस्लिमांनी याबाबतीत जरा लवचिक भूमिका घ्यायला हवी. त्यांनी संघर्षाच्या पवित्र्यातून सतत आपला मुद्दा मांडता कामा नये. हे म्हटल्यावरही मला एक प्रश्न पडतो ते जरुरीपेक्षा जास्त तीव्रतेने रिअॅक्ट होत आहेत का? सत्ताधारी पक्षाचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की ते हा विषय भलतीकडे नेऊ शकतात. जबाबदार पदांवरील व्यक्तींनी छोटेमोठे टोमणे मारत नेहमीच अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे आणि वर्तनांमुळे अल्पसंख्याकांना त्रास भोगावा लागला आहे, हे कुणीही मान्य करेल. म्हणूनच अल्पसंख्याकांना योग आणि सूर्यनमस्कारामुळे आपला जाच होतोय, असं वाटल्यास नवल नाही.
अर्थात, हे सारं करण्यामध्ये सरकारचा काही गैर हेतू होता, असे मला काही वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी योगामध्ये खूप मनस्वीपणे रस घेतात. मी जेव्हा गुजरातमध्ये वृत्तपत्र समूहाचा संपादक होतो, तेव्हा मोदींच्या दैनंदिन व्यायामाबद्दलचा लेख छापला होता. मोदी नियमित करत असलेल्या आसनांचे फोटो त्यांच्या कार्यालयाने आम्हाला पाठवले होते. युनायटेड नेशनच्या जनरल असेम्ब्लीने २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचे मान्य करणे आणि त्याला १७५ देशांची मान्यता मिळणे, हा माझ्या दृष्टीने मोदी यांचा व्यक्तिगत विजय आहे. यामुळे उत्साहित होऊन सरकारने रेल्वेसारख्या त्यांच्या अखत्यारीतील अनेक खात्यांना त्या दिवशी योगासने करावीत, असे सांगितले आहे. २१ जूनला रविवार असल्याने कदाचित हे त्या खात्याच्या बाबतीत तरी कठीण आहे. सरकारने या विषयातील वादग्रस्तपणा टाळला असता तर बरे झाले असते. कारण मी आधीच सांगितले आहे की, मुलांच्या दृष्टीने आणि सर्वांनाच हे लाभदायक आहे. (सूर्यनमस्कार त्यांना टाळावा लागणे) ही एक नामुष्कीची बाब आहे आणि त्याला सरकारच जबाबदार आहे. त्यांनी सर्व धार्मिक समुदायांपर्यंत पोहोचून आपली बाजू नीट मांडायला हवी होती. आपलं मागचं ट्रॅक-रेकॉर्ड लक्षात घेऊन हा विषय वादग्रस्त ठरणार हे आधीच त्यांच्या लक्षात यायला हवं होतं.
बातम्या आणखी आहेत...