अमेरिकेत बराक ओबामा यांनी २००८ मध्ये
आपल्या प्रचारादरम्यान इंटरनेट व विशेषकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्याबरेाबर जोडले होते. इंटरनेटच्या वेबसाइटवर फॅन पेज तयार करण्यात आले. त्या पेजशी लोक जुळले की ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाला जनाधार किती वाढला याची माहिती िमळत असे. जास्तीत जास्त लोकांना जोडण्यासाठी रिपब्लिकन पार्टीनेही हा मार्ग निवडला होता. मात्र, त्यांना यश आले नाही. या वेळी रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी जास्तीत जास्त लोकांशी जुळता यावे, यासाठी त्यांची पोस्ट लाइक करणे सुरू केले आहे. ते इंटरनेटवर नवीन फॅन बनवून त्यांना आपल्या कार्याशी जोडत आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. सर्वाधिक दहा उमेदवार रिपब्लिकन पार्टीकडून निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रॅम्प, जेब बुश आणि स्कॉट वॉकर आदी आहेत. हे सर्व नेते प्रचार सभांबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. ते अमेरिकन युजर्सच्याच पोस्टला लाइक देतात. आवश्यकता वाटल्यास प्रतिक्रियाही व्यक्त करतात. त्यांना युजर्स लाइक देतात. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये जास्तीत व्हिडिओ किंवा फोटो असतात. हे उमेदवार कोणत्या विषयावर चर्चा होत आहे हे लक्षात ठेवतात. त्यावर प्रतिक्रिया देऊन ते चर्चेत सहभागी होतात.