आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीच्या गोंगाटात खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहुबली-२ या चित्रपटाची देशभरातील आबालवृद्धांनी प्रचंड प्रतीक्षा केली. कटप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी पहिल्या आठवड्यातच चित्रपटाचे उत्पन्न दोनशे कोटींच्या घरात पोहोचले.  

एखाद्या विषयाप्रति नागरिकांमधील प्रचंड उत्साह हे सुखद वातावरणाचे प्रतीक आहे; पण सुकमा आणि कुपवाडासारख्या हत्याकांडाचे संदेश केवळ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर करण्यापर्यंत मर्यादित असणे हे गंभीर आहे. दुसरीकडे नक्षलवादी आणि दगडफेक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकून दिशाभूल झालेल्या तरुणांना योग्य दिशा दर्शवण्यात आपले सैनिक जी जिवाची बाजी लावत आहेत, ती बाहुबलीपेक्षा कमी नाही.  

सीमेवरील रक्तपाताची किंमत सैनिकांच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहे. शहीद होणाऱ्या जवानांच्या घरी कुठे वृद्ध आई-वडील आहेत, तर कुठे काही महिने, वर्षांपूर्वीच या जगात आलेली अपत्ये आहेत. काही अपत्ये तर गर्भातच आपल्या वडिलांची वाट पाहत आहेत. गंभीर वास्तव म्हणजे एकीकडे ही परिस्थिती असताना देशातील प्रचंड मोठा लोकसंख्येचा समूह कटप्पा आणि बाहुबलीच्या पात्रांमध्ये अडकून बसला आहे. चित्रपटाचा उदो उदो करणाऱ्या तरुणांमध्ये एखादाच अभिनेता अक्षय कुमार  किंवा क्रिकेटपटू गौतम गंभीरप्रमाणे तन-मन-धनाने जवानांबाबतीत विचार करतो. राजकीय पक्षांमधील तरुण सदस्य खरोखरच देशाचा विचार करत असतील तर आज सीमेवर धारातीर्थी पडणाऱ्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदानाची शिबिरे घेतली असती.  
मनोरंजनाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहण्यात काही गैर नाही; पण एखादी काल्पनिक गोष्ट जेव्हा देशातील ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित होण्यास कारणीभूत ठरते तेव्हा तो निश्चितच चिंतेचा विषय ठरतो. हे चित्र पाहून असे वाटते की, जणू असे तमाशे आपल्याला अंगवळणी पडत आहेत किंवा निवडणुकीसहित इतर राष्ट्रीय घटनांकडेही आपण एक तमाशाच्याच नजरेतून बघत आहोत.
 
रिसर्च स्कॉलर, आयआयएम, रोहतक
बातम्या आणखी आहेत...