आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या अर्थसंकल्पात सुविधांचा वर्षाव?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी अर्थसंकल्पात नोकरदार आणि व्यापारीवर्गाला करांमध्ये मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकार कर कपात करू शकते. नोटाबंदीनंतर जास्तीत जास्त लोकांना करकक्षेत आणण्यावर व महसूल वाढवण्यावर भर दिला जात आहे.
  
यावर्षीचा अर्थसंकल्प विविध दृष्टिकोनांतून तसेच सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. नोटाबंदीनंतर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात नागरिकांना झालेल्या त्रासावर मलमपट्टी केली जाईल, असे कयास बांधले जात आहेत. सध्याची करसवलतीची मर्यादा पुरुष व महिलांसाठी अडीच लाख एवढी आहे. त्यात वाढ झाल्यास याचा सामान्यांना थेट फायदा होईल. त्यामुळे व्यापारीवर्गाचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करता येईल.  

राजकीय दृष्टिकोनातूनदेखील हा अर्थसंकल्प सर्वच स्तरांवर महत्त्वाचा आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या असलेल्या  उत्तर प्रदेश या राज्यातील निवडणुका आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुका समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार या अर्थसंकल्पात विविध योजनांचा पेटारा जनतेसमोर उघडू शकते. नूतन योजना, सुविधांद्वारे  सकारात्मक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे यंदा रेल्वे अर्थसंकल्प हा सामान्य अर्थसंकल्पात अंर्तभूत करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील सुविधा देण्यावर भर देणारे रेल्वे मंत्रालय सामान्यांवर अधिक प्रवास शुल्काचा भार न देता सुविधांचा वर्षाव करू शकते. मधल्या काळात निर्माण झालेल्या अडचणी दूर सारून सरकार भविष्यकालीन फायदा मिळवण्यासाठी तयार आहे. विमुद्रीकरणानंतर जीएसटी, कॅशलेस इंडिया, स्किल इंडिया आणि मेक इन इंडियासारखे मुद्देदेखील यंदाच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे असू शकतात.
- चंदन तापडिया, अर्थविषयक विश्लेषक, मुंबई
बातम्या आणखी आहेत...