आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशक्त विराेधी पक्षाचे रूप दिसायला हवे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान माेदींनी निश्चलनीकरणाचा निर्णय घेतल्यामुळे विराेधी पक्षांकडून संसदेत जाेरदार विराेध केला जाईल, अशी अपेक्षा हाेती. परंतु विराेधी पक्षांच्या सदस्यांनी काेणत्याही सभागृहाचे कामकाज पूर्ण दिवस चालू दिले नाही.

मागच्या सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधानांच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरून इतका गाेंधळ क्वचितच कधी झाला असेल. अापण वेस्टमिनिस्टर माॅडेल स्वीकारले अाहे, जिथे पंतप्रधान हे मंत्री समूहाच्या नेत्याच्या रूपात कार्य करतात; अाणि प्रत्येक मंत्री अापले संबंधित कार्य किंवा मंत्रालयाचा ताे प्रतिनिधी असताे. त्यामुळे प्रत्येक काम किंवा विषयाच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या उपस्थितीची विराेधकांची मागणी हास्यास्पद ठरते. पीअारएस लेजिस्लेटिव्ह रिचर्स संस्थेच्या शाेध अाणि सर्व्हेच्या अहवालानुसार जेव्हा यूपीएचे सरकार हाेते, त्या वेळी राहुल गांधी अशा काही माेजक्या खासदारांच्या यादीत हाेते ज्यांना न संसदेत हजर राहण्यात स्वारस्य हाेते अाणि न चर्चेत सहभागी हाेण्याची इच्छा हाेती. इंडिया टुडेच्या पाहणीतूनदेखील हाच निष्कर्ष समाेर अाला अाहे. पीअारएसनुसार राहुल गांधींची संसदेतील हजेरी केवळ ५५ टक्के असून पंतप्रधानपदाच्या दावेदारास हे शाेभत नाही. पंतप्रधानांच्या उपस्थितीवरून काँग्रेस प्रश्न उपस्थित करत अाहे, मात्र जेव्हा ते राज्यसभेत हजर हाेते त्या वेळी डाॅ. मनमाेहनसिंग यांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयास संघटित लूट ठरवून टाकले. मात्र, त्यांच्याच कार्यकाळातील टूजी, काॅमनवेल्थ, काेळसा घाेटाळा हे कदाचित ते विसरले असावेत. दुसऱ्यांदा लाेकसभेत पंतप्रधान माेदी हजर राहिले त्या वेळी विराेधकांनी नगराेटामधील दहशतवादी हल्ल्यावर चर्चेची मागणी केली. या साऱ्या घटनांवरून हे स्पष्ट हाेते की, विराेधी पक्षनेत्यांना निश्चलनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायलाच नकाे अाहे. विराेधकांनी देशातील जनतेलादेखील एक सशक्त अाणि वैचारिक विराेधी पक्ष कसा असताे, ते दाखवून द्यायला हवे.
-अजय धवलेे, २८. काॅर्पाेरेट लाॅयर,
एलुमनाई नॅशनल लाॅ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी.
बातम्या आणखी आहेत...