आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची 3 वर्षे: जाणकारांच्या नजरेतून चार प्रमुख क्षेत्रांतील सुधारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योग: डिजिटल इंडिया, स्वच्छ ऊर्जा उपक्रमांचे परिणाम चांगले
केंद्र सरकार सरकारची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अार्थिक संकेतकांमध्ये स्थैर्य आणि बळकट आर्थिक वृद्धीचे चित्र आहे. २०१३-१४ मधील ४.५ टक्क्यांची आर्थिक तूट या आर्थिक वर्षात ३.२ टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अन्नधान्याच्या किमतीचे व्यवस्थापन आणि जगातील अन्य वस्तूंच्या किमती कमी होत असल्याने महागाई नियंत्रणात आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचे व्याजदर कमी झाले आहेत. लहान कंपन्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने तसेच कराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्याने उद्योगांना प्रोत्साहन मिळाले आहे.
 
मेक इन इंडियाअंतर्गत उद्योग करणे सोपे जावे यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. यामुळे जनतेला प्रोत्साहन मिळाले आहे. वस्त्रोद्योग, भांडवली साहित्य आणि पोलाद उद्योगात उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने धोरणात्मक योजनांची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रात खर्च वाढल्याने भांडवल निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे.
डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, क्लीन एनर्जी इत्यादी धोरणात्मक निर्णय स्तुत्य आहेत. याचे परिणामही चांगले झाले आहेत. मागील तीन वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अपारंपरिक ऊर्जानिर्मिती झाली आहे. नव्या इलेक्ट्रॉनिक्स सेवांमुळे घरगुती उत्पादनास प्रोत्साहन मिळत आहे. सीआयआयच्या अंदाजानुसार, पुढील २-३ वर्षांत दरडोई उत्पन्नाचा दर ९ टक्क्यांपुढे जाईल. बँकांना बुडीत कर्जाचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा लागेल. जगभरातील मागणी वाढत असली तरीही व्याजदर कमी करून देशांतर्गत मागणी वाढवण्याचीही गरज आहे.
- चंद्रजित बॅनर्जी (महासंचालक, सीआयआय)

पुढील स्‍लाइडवर वाचा, बड्या देशांवर मोदींचा प्रभाव ट्रम्पना नरमाईने घ्यावेच लागेल
 
बातम्या आणखी आहेत...