आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अात्मक्लेश झाला, पुढे काय? (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमीच राजकारणातील जिव्हाळ्याचे विषय ठरतात. सरकार मग ते केंद्रातले असाे की राज्यातले; भाजपचे असाे की अन्य पक्षाचे; कैक वर्षांपासून शेतकरी अाणि त्यांचे प्रश्न ‘जैसे थे’ अाहेत. मुळात मतांची बेगमी करण्यासाठी शेतकऱ्यांशी निगडित मुद्द्यांना जितकी राजकीय फाेडणी दिली गेली त्याच्या निम्मेदेखील राजकारण शेतकऱ्यांचा अार्थिक कणा मजबूत हाेण्यासाठी झाले नाही, हे वास्तव अाहे. म. फुलेंच्या काळापासून अाजतागायत शेतकऱ्यांनी अापल्या हक्कांसाठी कधी अासूड, तर कधी रुमणे उगारले; कधी अाक्रमक अांदाेलन केले तर कधी संघर्ष यात्रा काढली अन् अाता अात्मक्लेश यात्रा. एक मात्र खरे की, कित्येक अडचणी उभ्या ठाकल्या तरी शेतकरी कधी उतला नाही, मातला नाही की त्याने कधी अन्नदात्याचा वसा टाकला नाही. खासदार राजू शेट्टी यांनी दाखवलेली संवेदनशीलता लक्षवेधी निश्चितच असली तरी अात्मक्लेशाने मूळ प्रश्नांची साेडवणूक हाेण्यास खराेखरीच काही मदत हाेणार का? शेतकऱ्यांचे विषय हाताबाहेर जाऊ नयेत म्हणून एकीकडे राज्य सरकारची धडपड सुरू अाहे, तर दुसऱ्या बाजूला पक्षाच्याच नेत्यांकडून बेजबाबदारपणा दाखवला जात असल्याने प्रश्नांचे गांभीर्य अाणखी वाढले. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांचे नेते सत्तेत असूनही त्यांना गांभीर्य कमी करता अाले नाही म्हणूनच साऱ्या ग्रामीण महाराष्ट्रावर अस्वस्थतेची अवकळा पसरली अाहे. 

या अात्मक्लेश यात्रेच्या निमित्ताने उल्लेखनीय म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अांदाेलनात अापण अाणि सरकारमध्ये सदाभाऊ हे समीकरण समर्थकांच्या गळी उतरवणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर इतक्या लवकर प्रायश्चित्त घेण्याची वेळ येईल असे कुणी गृहीत धरले नसेलही. वस्तुत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्म हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झाला असला तरी सतत अांदाेलने करण्यासाठी झाला नव्हता हे त्यांनी दाखवून दिले. मात्र, राजसत्ता ही काेणत्याही पक्ष किंवा विचारांची असली तरी ती तिच्याच नियमाने चालते याचा विसर कदाचित राजू शेट्टींना पडला असावा. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे कल्याण करण्याची त्यांची भूमिका निश्चितच चांगली हाेती, मात्र ते फसले. याची अाता कबुली देत अाहेत. अात्मक्लेशाचे अाणखी एक कारण म्हणजे शेतकरी कुटुंबातले, शेतकऱ्यांनी निवडून दिलेले खासदार, अामदार काय करीत अाहेत? असा सवाल विचारला जात अाहे. शेतकरी संघटनांवरचा दबाव वाढताे अाहे. सदाभाऊ खाेत-शेट्टी अाणि फडणवीस, दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यात सुसंवाद वाढण्याएेवजी दरीच रुंदावत चालली अाहे. येत्या काही दिवसांत सदाभाऊ खाेत भाजपमध्ये दाखल झाले तर संघटना किंवा शेतकऱ्यांच्या अांदाेलनावर फार फरक पडणार नाही. मात्र संघटनेत फूट पडल्याचे वरकरणी दिसेल इतकेच. मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न हे संपणारे नाहीतच त्याकडे संघटनांना दुर्लक्षही करता येणार नाही. तसे झालेच तर नवे नेतृत्व उदयास येईल. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींचा अात्मक्लेश महत्त्वाचा ठरताे. फुटलेल्या पाटाचे पाणी वळवण्याचा प्रयत्न करत असतानाच निवडणुकांपूर्वी रानाच्या मशागतीला राजू शेट्टी लागले अाहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अात्मक्लेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी शिवार संवाद यात्रा सुरू केली असली तरी अनुल्लेखाने शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ अांदाेलनास डावलले जात अाहे, अशी भावना बळावते अाहे. खरा प्रश्न येथूनच सुरू हाेताे, अात्मक्लेशाने प्रश्नांची साेडवणूक हाेईलच असेही नाही. सत्तेच्या बेड्या पायात अडकवून राजू शेट्टी िकती काळ पदयात्रा काढत राहणार? शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारसी लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी निघालेली अात्मक्लेश यात्रा चर्चेचा विषय ठरली. अाज ५ हजार शेतकरी राजभवनावर धडकले, पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहताे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कचाट्यातून शेतमालाची सुटका करण्यासाठी शेती बाजार सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, दलालांची साखळी माेडण्याचे अाव्हान सरकारने स्वीकारलेले दिसत नाही. याशिवाय शेतमालास हमी भाव द्यावाच लागणार अाहे, त्याशिवाय राष्ट्रीय अर्थकारणाला स्थैर्य प्राप्त हाेऊ शकणार नाही हे वास्तव सरकारने स्वीकारले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाइतकेच शेतीतील माेडकळीस अालेले अर्थकारणही शेतकऱ्यांच्या दुर्दशेला कारणीभूत अाहे, म्हणूनच शेती प्रश्नावर सरकारने धाेरण अाणि याेजना स्पष्ट तितक्याच पारदर्शक पद्धतीने मांडायला हव्यात. एकीकडे निवडणूक जाहीरनाम्यात अाडमाप अाश्वासने द्यायची अाणि शेतकऱ्यांनी जाब विचारला की त्याची थट्टा मांडायची, हे असले अाेंगळवाणे राजकारण हवेच कशाला? सर्वच पक्षांतील बहुतेक नेते शेतकरी कुटुंबातूनच अालेले असताना असे का घडावे? मुळात यावरच नेत्यांनी अात्मचिकित्सा केली तर शेतकऱ्यांवर अात्मक्लेशाची किंवा संपावर जाण्याची  वेळच येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...