आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांच्या क्लोनिंगचा कोट्यवधींचा व्यवसाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी १९९६ मध्ये एडिनबर्ग येथील रोझलिन इन्स्टिट्यूटने क्लोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉली या मेंढीला जन्म दिल्यानंतर जगभर खळबळ माजली होती. अनेक शास्त्रज्ञांचा दावा होता की पशू-प्राण्यांचे क्लोनिंग अशक्य आहे. त्यात सस्तन प्राण्यांचे क्लोन करण्याच्या प्रयत्नात अपयश आल्याने जीवशास्त्रज्ञांना असे लक्षात आले की, शरीरातील प्रत्येक पेशीतील गुणसूत्र रचना एकसारखी असली तरी त्या एकसारख्या पुनर्जनन करू शकत नाहीत.
 
 भ्रूणामध्ये आढळणाऱ्या स्टेम पेशी, त्वचा, पेशी व रक्तवाहिन्यांमध्ये आढळणाऱ्या पेशींमध्ये बदलू शकतात; पण त्या पुन्हा स्टेम पेशी बनू शकत नाहीत. रोझलिन इन्स्टिट्यूटच्या दृष्टीने मात्र हे चित्र वेगळे आहे. डॉलीने दोन शक्यता निर्माण केल्या होत्या. एक, ज्याला पुनर्निमाण क्लोनिंग समजले जात होते ती प्रत्यक्ष प्राण्याची प्रतिलिपी असते व दुसरी शक्यता, म्हणजे भ्रूण स्टेम पेशी अन्य पेशींमध्ये बदलू शकतात.
 
 पेशींच्या संख्येतील अनियमितेमुळे आजार होत असतात. उदाहरणार्थ मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा पेशी व स्क्लिरोसिस असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात माइलिन द्रव्य तयार करणाऱ्या पेशी कमी असतात.
 
न्यूक्लिअर ट्रान्सफर तंत्रज्ञानाद्वारे भ्रूण स्टेम पेशींचा अशा आजारांवर इलाज केला जाऊ शकतो. डॉलीच्या प्रयोगाची घोषणा नेचर या विज्ञानपत्रिकेत संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर केली जाणार होती; पण ब्रिटिनमधील ऑब्झर्व्हर या वर्तमानपत्राने ही बातमी अगोदरच प्रसिद्ध केली. 
या बातमीच्या दुसऱ्या परिच्छेदात असे म्हटले होते की, या प्रयोगामुळे माणसाचे क्लोनिंग होऊ शकते किंवा हुकूमशहांचे सैन्य तयार केले जाऊ शकते.
 
प्रसारमाध्यमे व जनतेमध्ये असा समज निर्माण झाला की मानवाची प्रतिकृती तयार होणार आहे. काही टीकाकारांनी म्हटले, मानवाची प्रतिकृती निसर्गाच्या विरोधात आहे; पण एवढी चर्चा होऊनही माणसाच्या क्लोनिंगवर अजून प्रतिबंध आलेला नाही.  
 
२००१ मध्ये अमेरिकेच्या सरकारने न्यूक्लिअर ट्रान्सफरच्या माध्यमातून नव्या भ्रूणपेशी तयार करण्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घातली होती; पण ब्रिटनसहित काही देशांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानावर उदार भूमिका घेतली आहे.
 
२००४ मध्ये दक्षिण कोरियामधील एक शास्त्रज्ञ वांग वू सूक यांनी मानवी भ्रूणाच्या क्लोनद्वारे नव्या ईएस पेशी तयार करण्याची घोषणा केली होती; पण २००६ मध्ये त्यांची ही घोषणा बनावटगिरी म्हणून सिद्ध झाली. त्यांनी कुत्र्यांवर क्लोनिंगचे प्रयोग केले होते. २००६ मध्ये शिन्या यामानाका या जपानी शास्त्रज्ञाने ऊतींना स्टेम पेशींमध्ये परावर्तीत केले आणि त्यांना आयपीएस पेशी असे नाव दिले. 
 
या पेशी एखाद्या आजारी व्यक्तीच्या शरीरातून घेतलेल्या अनेक पेशींतून तयार केल्या जातात. या पेशींचा उपयोग आजारनियंत्रणासाठी करण्यात आला. त्यामुळे आजारी व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. २०१२ मध्ये यामानाका यांना या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.    
 
या कालावधीत २० जातींच्या प्राण्यांवर क्लोनिंगचे प्रयोग झाले असून ते सफल झाले आहेत. याचा फायदा पशुपालन व दुग्धोत्पादनात दिसत आहे. अमेरिका, अर्जेंटिंना, ब्राझीलमध्ये मांस व दुधाच्या बदल्यात क्लोन केलेले प्राणी विकले जातात.
 
युरोपमध्ये मात्र प्राण्यांवरच्या अशा प्रयोगांवर बंदी आहे.  टेक्सासमधील सेडार पार्कमध्ये व्हायजेन या एका छोट्या फार्मवर हजारो पशूंबरोबर घोडे व काही पाळीव प्राण्यांवर क्लोनिंगचे प्रयोग सुरू आहेत.
 
या फर्मच्या वेबसाइटनुसार क्लोन झालेला एक घोडा ५५ लाख रुपयांना मिळतो. बनावटगिरीचा कलंक लागलेले डॉ. वांग यांच्या फर्ममध्ये ४०० कुत्र्यांवर क्लोनिंगचे प्रयोग झाले आहेत. अशा एका कुत्र्याची किंमत ६५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 
 
चीनमध्ये सुमारे दहा लाख गायी-म्हशींच्या बछड्यांवर व कुत्र्यांवर असे प्रयोग करण्याची तयारी सुरू आहे. जगातील सर्वश्रेष्ठ पोलो खेळाडू अॅडॉल्फ केम्बिआसो यांच्या ब्युनॉस आयर्स येथील कंपनीने क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे ४५ घोड्यांना जन्म दिला आहे.
 
यातील २५ घोडे अन्य घोड्यांशी अगदी मिळतेजुळते आहेत. या घोड्यांचा लिलाव करण्यात आला तेव्हा त्यातून सुमारे ५ कोटी रुपये मिळाले. हे तंत्रज्ञान संतती सुख नसलेल्यांसाठी वरदान ठरू शकते. आयपीएस पेशी वांझ महिलांना उपयुक्त ठरू शकतील. 

पुनर्जनन तंत्रज्ञानाचा भर विशेष व्यक्तीच्या निर्मितीवर नव्हे, तर ज्या पालकांना वंध्यत्वाला सामाेरे जावे लागते त्यांना संतानसुख देण्यासाठीच अाहे. ‘अायपीएस’ पेशी वंध्यत्व पीडितांसाठी एक चांगला, उपयुक्त पर्याय ठरू शकतात.
 
अायव्हीजी माेठी उपलब्धी ठरेल...
प्रत्येकाकडे प्रत्येक जीन्सच्या दाेन प्रती असतात, मात्र अंडे किंवा शुक्राणू केवळ एकच असतात. म्हणूनच जे मूल जन्माला येते अापल्या पालकांसारखेच असू शकत नाही. अशा सृजनावर जेनेटिक विकाराच्या दृष्टिकाेनातून पाहायला हवे.
 
रिप्राॅडक्टिव्ह टेक्नाॅलाॅजीशी संबंधित विशेषज्ञ, स्टॅनफाेर्ड युनिव्हर्सिटीमधील कायदेतज्ज्ञ प्राे. हँक ग्रीली म्हणाले, अायव्हीजी एक माेठी उपलब्धी ठरेल. अंडाशयातून अंडे काढण्याच्या कठीण प्रक्रियेच्या तुलनेत त्वचेच्या पेशींपासून काढलेले अंडे गर्भधारणेसाठी अधिक उपयुक्त ठरू शकतील. कदाचित मानवांवर याचा प्रयाेग करणे कठीण ठरू शकेल. मात्र, अशा पद्धतीने मुलांना जन्म देण्याची शक्यता २० वर्षांपूर्वी मानवी क्लाेनच्या निर्मितीच्या शक्यतेपेक्षा निश्चितच अधिक अाहे.
बातम्या आणखी आहेत...