आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Article About By Babachanne86@gmail.com, The Dhondalgaon Gold Paris : Gomala

धोंदलगावचे सोने करणारा परीस : गोमला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधेश्याम यादव सरपंच झाले ते या दोन्ही सरपंचांपेक्षा वेगळे सरपंच होते. त्यांचा गोमला गावातील सरपंचकीचा कार्यकाल हा २००५ ते २०१० पर्यंत होता. या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सरकारी कुठलीही मदत न घेता गोमला हे गाव देशातील प्रथम श्रेणीचे गाव बनविले.
गोमला गावाला जलकुंभाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि पिण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचा स्राेत वाढविला. आज गावातील सर्व जमिनी बागायती आहेत. त्याबरोबर गावातील सर्व रस्ते हे सिमेंटचे आहेत. गावात प्रत्येक गल्लीमध्ये कचराकुंडी बसविलेली अाहे.

त्या कचऱ्याची रोज विल्हेवाट लावून त्यांचे खत बनवून शेतात वापरले जाते. गावातील रिकाम्या जागी त्यांनी बगिचे तयार केले. गावकऱ्यांनी अतिक्रमण केलेली एकही जागा दिसणार नाही. उल्लेखनीय म्हणजे या गावात एकही व्यक्ती बी. पी.एल. धारक नाही.
गावातील कुठल्याही स्त्रीची गर्भचाचणी (लैंगिक चाचणी) होत नाही. बेरोजगारीचे प्रमाणही खूपच कमी आहे. स्थानिक शेतकरी हे आधुनिक अाणि सेंद्रिय शेती करतात. त्यामुळे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेतले जाते. सरपंच राधेश्याम यादवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ग्रामविकासाचा ध्यास असलेले राधेश्यामजी कधीही मागे हटले नाही.
सर्व कामं त्यांनी लोकसहभाग आणि सरकारी योजनेतून करवून गोमला हे गाव देशात प्रथम श्रेणीचे गाव बनविले. त्यांनी कधीही सरकारी निधीची अपेक्षा केली नाही. ही सर्व कामं ५० लाखांच्या आत खर्च करून केली. गाव स्वयंपूर्ण केले. लोकसहभागातून स्वयंपूर्ण होणारं गोमला हे भारताच्या इतिहासामधील महत्त्वाचं गाव आहे.

गोमलाजींचे कार्य आणि गावची स्वयंपूर्णतेतील झेप बघून गोमला गावाला २००८ चा राष्ट्रपती पुरस्कार प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोमला गावाला देशातील अनेक नामांकित लोकांनी भेटी दिल्या. जगातील सुप्रसिद्ध विद्यापीठ म्हणून हॉर्वर्ड विद्यापीठाला ओळखले जाते. त्या विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी गोमला गावात राहून चांगल्या प्रकारचा ग्रामीण विकास कसा करता येईल, यासंदर्भात प्रशिक्षण घेतले.
तसेच युनोच्या भारत-भूतानच्या विभागप्रमुख श्रीमती किरण नेहरा यांनीही गोमला या स्वयंप्रगत गावाला भेट दिली. त्याचप्रमाणे सहा आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी गोमला या गावात राहून ग्रामीण विकासाबाबत धडे घेतले. गोमलाजी हे हरियाणा आणि राजस्थानमधील ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांना प्रशिक्षित करतात.

गोमला या गावासारखाच देशातील पाच राज्यांतील पाच गावांचा विकास राधेश्याम यादव करणार अाहेत. त्यात प्रामुख्याने १) हरियाणातील जाखनी २) राजस्थानमधील चोरीटीपहाड, ३) छत्तीसगडमधील ढोरमगाव ४) उत्तराखंडमधील वीरपूर ५) महाराष्ट्रातील धोंदलगाव. धोंदलगाव हे वैजापूर तालुक्यातील विकासापासून कोसो दूर असलेले गाव आहे. हे गाव दत्तक घेण्याकरिता धोंदलगावामध्ये २ ऑक्टोबर २०१५ रोजी अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, आनंद असोलकर ही नामवंत मंडळी आणि त्यांच्यासोबत राधेश्यामजी गोमला आले.
२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत विकासापासून कोसो दूर असलेले धोंदलगाव देशात प्रथम क्रमांकाचे गाव करण्याचा निश्चय गोमलाजींनी केलेला आहे. एक गाव बारा भानगडी असलेले धोंदलगाव आता विकाससाठी पूर्णपणे एक झालेले अाहे.
दरम्यान, २००५ ते २०१० या काळात गोमलाजींना जो संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्षातून गोमला हे गाव प्रेरक गाव म्हणून देशात ओळखले जाते. त्यांच्या संघर्षावर आधारित हिंदी चित्रपट मिलिंद किशोर उके हे बनवत आहेत. गोमलाजींची प्रमुख भूमिका अभिनेते नाना पाटेकर साकारत आहेत. त्या चित्रपटाचे नाव गोमला टाइम्स असे आहे.
- बाबासाहेब चन्ने
Email - babachanne86@gmail.com
बातम्या आणखी आहेत...