आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅशलेस अर्थव्यवस्था एक दिवास्वप्नच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुशीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तन यात्रेत हजारोंच्या संख्येने चाहते उभे होते. येथील भाषणात मोदींनी काळा पैसा आणि नोटबंदीवर भर दिला. हा निर्णय कसा योग्य आहे, हे दर्शवण्यासाठी अनेक दाखले दिले. मोदी म्हणाले, देशातील निम्म्याहून अधिक लोक मोबाइल वापरतात. म्हणजेच ते रिचार्ज करत असतील. ही प्रक्रिया शिकण्यासाठी कुणी शाळेत गेले होते का कुणा सरकारी कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाठवावे लागले? कॅशलेस अर्थव्यवस्थेची सुरुवातही अशाच प्रकारे केली जाईल. निम्म्याहून अधिक रेल्वेची तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात.
मोदी यापूर्वी दोन वेळा भावुक झाले होते. मात्र कुशीनगर येथे त्यांनी नोटबंदीचा निर्णय वापस घेतला जाणार नसल्याचे मोठ्या आवेशात सांगितले. मोदींनी दिलेले दाखले योग्य असले तरी या सर्वांची दुसरी बाजूदेखील आहे.

फोन रिचार्ज करणे आणि बँकेतील व्यवहार यात प्रचंड फरक आहे. सध्या तरी कॅशलेस अर्थव्यवस्था हे भारतासाठी स्वप्नवतच आहे. इंटरनेट तर दूर, देशात आधी सर्वत्र वीज पोहोचवणे आवश्यक आहे. उच्च आणि मध्यमवर्गाव्यतिरिक्त फार कुणी ऑनलाइन शॉपिंग करत नाहीत.

२००० ची नोट आल्यानंतर दलाल पुन्हा कामाला लागले आहेत. काळ्या पैशांचे पांढऱ्यात रूपांतर करणारा बाजार तेजीत आहे.

मोदींना या निर्णयासाठी अशा प्रकारे थेट जनतेकडून वाहवा मिळवण्याची वेळ आली आहे. चांगल्या योजनेसाठी जनतेकडून समर्थन मागण्याची गरज नसते. मोदींना केवळ भाजपच्या पाठीराख्यांकडून पाठिंबा मिळत आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळा पैसा आहे, त्यामुळे मिशन यूपीमध्येदेखील हाच मुद्दा उचलला जाणार. असो. पुढील निवडणुकीत ‘कॅशलेस यूपी’चे विनोदी चित्र पाहायची वेळ येते की काय, हाच प्रश्न पडलाय.
अमितकुमार सिंह, २७
रिसर्च स्कॉलर, एमसीयू, भोपाळ
बातम्या आणखी आहेत...