आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंगचा दर्जा उंचावण्यासाठी चीनची क्रूर रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंगच्या मध्यवर्ती भागात दोंगसी नॉर्थ स्ट्रीटपर्यंत सॅलरी एली नावाची एक अरुंद गल्ली आहे. कम्युनिस्ट काळापासूनच्या गल्ल्यांपैकी ही एक असून त्यांना हुतोंग असे म्हटले जाते. एकमजली घरे, धूसर रंगांच्या भिंती आणि वरील बाजूला वळलेल्या छतांमधून निघालेल्या बाल्कनी. चिनी शहरांमध्ये वाहणाऱ्या बदलांच्या वाऱ्याचे हे छोटे चित्र.

सॅलरी एली ही गरीब वस्ती आहे. मोठी घरे आणि लहान वसाहती दोन भागांत विभागल्या आहेत. काही घरांत किचन किंवा बाथरूम नाही. त्यामुळे गल्ल्यांमध्ये बाथरूम आणि रेस्टॉरंटच्या लाइन आहेत. रेस्टॉरंटमधील अन्न घरातील जेवणापेक्षा स्वस्त आहे.

हुतोंगमध्ये जेवणासाठी दहा जागा, चार बाथरूम, नऊ किराणा आणि हार्डवेअरची दुकाने, एक प्राण्यांचे रुग्णालय, सलून, चार स्टार हॉटेल, पूल हॉल आणि कम्युनिटी पोलिस मुख्यालय आहे. पाच वर्षांपूर्वी सॅलरी एली या भागाला मध्यमवर्गाच्या पसंतीनुसार (जेन्ट्रिफिकेशन) बदलण्यास सुरुवात झाली. परंतु तेथे घडलेल्या काही घटनांमुळे या बदलांना डिजेन्ट्रिफिकेशन म्हणावे लागेल. म्हणजे ही मध्यमवर्गीयांसाठी नव्हे तर गरिबांसाठीची वस्ती होऊ लागली आहे. जेन्ट्रिफिकेशनचा अर्थ असाही आहे की, जुन्या इमारती जतन करून नव्या व्यवसायांना आकर्षित केले जाते; पण यासाठी जुन्या रहिवाशांना हा भाग सोडावा लागतो.  सॅलरी एलीमध्ये नवे व्यवसाय बंद होत आहेत. इमारतीची मोडतोड होतेय आणि जुन्या रहिवाशांऐवजी नव्याच लोकांना बाहेर जावे लागत आहे. ही प्रक्रिया मागील उन्हाळ्यात सुरू झाली. सरकारी बिल्डरांनी दुकानांच्या पुढील भाग (खिडक्या, छतांचे भाग आणि साइन बोर्ड) पाडले. त्यावर प्लॅस्टर केले आणि निघून गेले. त्यानंतर कम्युनिस्ट काळापूर्वीचे रूप देण्याच्या नावाखाली घरांना जुन्या पद्धतीच्या ‘विटा’ लावण्यात आल्या. प्रत्यक्षात त्या टाइल्स आहेत. चीनमध्ये सौंदर्यीकरणासाठी नकली विटा वापरणे सामान्य बाब आहे.  
 
एली येथील तीन रेस्टॉरंट सध्या बंद करण्यात आले आहेत. यामुळे व्यवसायात नुकसान झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. कोपऱ्यावरील एका दुकानाचा गल्लीकडील दरवाजा विटा लावून बंद करण्यात आला आहे. आता ग्राहकांना तीन पायऱ्या चढून या दुकानातून सामान न्यावे लागते. सरकार म्हणते की, वास्तुशास्त्रात झालेल्या चुका सुधारण्याचा हा प्रयत्न आहे. इमारतींसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार जे दरवाजे योग्य नाहीत, ते बंद केले जात आहेत. वरवर पाहता हे चांगले प्रयत्न वाटतात. मात्र, वास्तव वेगळे आहे. अनिवासींवर दबाव टाकण्याचा सरकारचा हेतू आहे. बीजिंगचा आकार नियंत्रणात आणण्याची ही क्रूर पद्धत आहे. सॅलरी एलीमध्ये बहुतांश दुकाने शानदोंग या किनारी भागातून आलेल्या नागरिकांची आहेत. उदा. हुनानच्या एका व्यापाऱ्यावर या आततायीपणाची टाच येऊ शकते. सरकारने व्यवसाय नाही करू दिला तर आम्ही परत जाऊ, असा निराशावादी सूर या व्यापाऱ्यांमध्ये उमटत आहे.
 
सरकार म्हणते की, अशा गल्ल्यांमध्ये नूतनीकरणाची गरज आहे. यापैकी बहुतांश गल्ल्या खरच जीर्ण झाल्या आहेत. सॅलरी एलीमधील ‘संरक्षित’ इमारतींपैकी बहुतांश इमारती १९८० नंतर पुनर्निर्मित केलेल्या आहेत. मात्र, प्राचीन इमारतींपैकी काही इमारती खूपच मोडकळीस आल्या आहेत. इमारती नकली विटांनी झाकण्याला कुणीही सौंदर्यीकरण म्हणू शकणार नाही.
{ चीनची राजधानी बीजिंगला जागतिक शहराचा दर्जा हवा आहे. यासाठी न्यूयॉर्क किंवा लंडनप्रमाणे मुक्त जीवन, स्ट्रीट लाइफचे वातावरण हवे.  पण सरकारने याउलट या शहरावर अधिकच नियंत्रण लादण्याचा निर्णय घेतला असावा. याचे परिणाम सॅलरी एलीला भोगावे लागत आहेत.  

मालमत्ता महागल्याचा लाभ छोट्या शहरांना
चीनचा मध्यवर्ती गरीब भाग अनहुई.  विक्री न होणाऱ्या संकुलांचे ओझे कमी करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांत येथील वुुहू शहर अग्रस्थानी होते. या घरांचे स्थान चांगले असून ती दूरदूरवर पसरलेली होती; पण त्यासाठी खरेदीदारच मिळत नव्हते. २०१६ नंतर ही घरे ३० टक्के महाग झाली. प्रॉपर्टीतील सट्टेबाजी रोखण्याचे पाऊल उचलल्याने हा बदल घडला. नवे खरेदीदार आता दोन वर्षांपूर्वीचे घर विकू शकत नाहीत. विकासकांनाही नियोजित किमती ठेवाव्या लागतात. आता सर्व घरे विकली गेली असून आता घरांचा तुटवडा भासतोय. चीनमधील तिसऱ्या दर्जाच्या जवळपास ६० शहरांध्ये हीच स्थिती आहे. मोठ्या शहरांतील संपत्ती महाग झाल्याने याचा फायदा वुहूसारख्या शहरांना मिळत आहे. येथील बाजार तेजीत असून मोठी शहरे मंदावत आहेत. तटवर्ती शहरांत जमिनीच्या किमती आणि मजुरी महागल्याने उद्योजक आतील भागात प्रवेश करत आहेत. उदाहरणार्थ, वुहूमध्ये अनेक रोबोटिक फर्म्स आहेत. चीन सरकारच्या मते, मोठ्या शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे बदल चांगले आहेत.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
 
बातम्या आणखी आहेत...