आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरणासन्न अवस्थेतील काँग्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने दिल्लीतील सत्ता गमावली याचे कारण ती अनेक राज्यांमधून बाहेर फेकली गेली होती. 
२००४ ते २०१४ या काळात ते सत्तेवर होते, पण अन्य राज्यांत हा पक्ष दुबळा होता. भारतातील अनेक राज्यांत जिथे भाजप सत्ताधारी किंवा विरोधात आहे तिथे काँग्रेस चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आहे. 
 
काँग्रेससारख्या पक्षाने हळूहळू पण दीर्घकाळचे मरण पाहणे हे तसे लक्षणीय आहे. १३२ वर्षांपूर्वी भारतातील या सर्वात जुन्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. केवळ तीन वर्षे हा पक्ष सत्तेबाहेर होता. पण एक राष्ट्रीय पक्ष म्हणून तो मृत्युपंंथाला लागला नसला तरी कोमामध्ये आहे एवढे निश्चित. ब्रँड म्हणून तो संपलेला आहे आणि फारच कमी भावनात्मक गोष्टी आता त्याच्याशी जोडलेल्या आहेत. मतदान करणाऱ्या छोट्या समूहाला सांगण्यासारखेही या पक्षाकडे काही नाही. ऑल इंडिया मुस्लिम लीगचाही असाच अंत झाला. याचे कारण त्याच्या अस्तित्वाचे काही कारणच उरले नव्हते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तिची स्थापना झाली. राजकीय दृष्टीने मुस्लिमांचा लाभ उठवण्याचा त्यामागे हेतू होता. त्यातून सत्ताधारी वसाहतवाद्यांकडून सवलती पदरात पाडून घ्यायच्या, असा त्यांचा इरादा होता. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होण्याच्या प्रयत्नात ते काही यशस्वी झाले नाहीत. अनेक मुस्लिमांच्या दृष्टीने काँग्रेसही हिंदू पक्ष होता, जसा आज भाजप आहे. भारताची फाळणी झाली ती असे कुठल्याच तडजोडी यशस्वी न झाल्यामुळे. त्यामुळेच मुस्लिम लीग संपली किंबहुना तिचे अस्तित्व अगदीच सूक्ष्म झाले. पक्षाचे नाव फाळणीशी जोडले गेल्यामुळे त्यांचे असे नुकसान झाले.  

इकडे इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या नावाखाली अनेक वर्षे केवळ एक खासदार जोडला गेलेला होता. अनेक वर्षे हा गृहस्थ केरळमधून निवडून येत असे. या गुजराती गृहस्थाचे नाव होते जी. एम. बनातवाला. पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग सत्तेवर आल्यानंतर या पक्षाने वेगवेगळ्या पंतप्रधानांमार्फत दशकभर तरी सत्ता गाजवली. या पक्षाची मूळ विचारसरणी ही द्विराष्ट्र सिद्धांत मांडणारी होती. मुस्लिम राष्ट्र तयार झाल्यावर मात्र या सैद्धांतिकतेचा अंत झाला. त्यांचे दोन्ही नेते पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मरण पावले. गव्हर्नर जनरल बॅ. जिना ११ सप्टेंबर १९४८ रोजी मरण पावले, तर पंतप्रधान लियाकत अली खान यांची १६ ऑक्टोबर १९५१ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर जनरल अयुब खान यांनी काही वर्षांनंतर सत्ता हातात घेतली. तेव्हा बॅ. जिना यांनी स्थापलेल्या पक्षाने मुस्लिम लीगचे एक मंडळ स्थापन केले. पाकिस्तानमधील पक्षाचे हे पहिले वेगळे स्वरूप होते. या प्रकारे पक्ष पुनःपुन्हा स्थापन करणे अन् पुनःपुन्हा मोडणे ही प्रक्रिया दशकभर तरी चालू राहिली. जनरल झिया उल हक राष्ट्राध्यक्ष असताना पंतप्रधान जुनेजो यांनी मुस्लिम लीग (जे) ची स्थापना केली आणि जनरल मुशर्रफ यांना मुस्लिम लीग (क्यू) ने पाठिंबा दिला. आता हाच पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या नावाने सत्तेत आहे. या पक्षाची स्थापना झिया यांच्या कारकीर्दीत झाली होती.  

भारतामध्ये काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर कायम एकसंघ राहिली. पण सर्वात मोठी फूट पडली ती लालबहादूर शास्त्री गेल्यावर - इंदिरा गांधी यांनी सत्ता हातात घेतल्यावर. नेहरूंच्या जुन्या सहकाऱ्यांनी स्वतःची काँग्रेस स्थापन केली. पण इंदिरा गांधी या खूपच ताकदवान होत्या. त्यांचा करिश्मा आणि लोकप्रियतेमुळे पक्ष कायम राहिला. इंदिरा गांधी यांचा पराभव करायला जे पक्ष एकत्र आले त्यांनी स्थानिक पक्षांचे कडबोळे तयार केले. हा जनता पक्ष (समाजवादी) होता आणि काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात होता. आणीबाणीच्या काळात त्याची स्थापना झाली आणि नंतर त्याच्याही अस्तित्वाचे कारण उरले नाही. त्यांच्या काही अनुयायांनी काँग्रेसविरोध जनता दलाच्या रूपाने कायम ठेवायचा प्रयत्न केला.  

काँग्रेसने दिल्लीतील सत्ता गमावली याचे कारण ती अनेक राज्यांमधून बाहेर फेकली गेली होती. २००४ ते २०१४ या काळात ते सत्तेवर होते, पण अन्य राज्यांत हा पक्ष दुबळा होता. गुजरातमध्ये तीन दशके या पक्षाला सत्ता मिळाली नाही. भारतातील अनेक राज्यांत जिथे भाजप सत्ताधारी किंवा विरोधात आहे तिथे काँग्रेस चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आहे. दक्षिणेत आता ती आपला प्रभाव गमावत असून हिंदुत्वाची घोडदौड तामिळनाडू आणि केरळमध्ये सुरू आहे. काँग्रेसमधल्या काही शक्तिमान नेत्यांना आपला पक्ष  मृत्युपंथाला लागताेय हे आधीच कळले होते. त्यामुळे त्यांनीच पक्षाची संघटनशक्ती विलक्षण चतुराईने हस्तगत केली. उदा : बंगालमधील ममता बॅनर्जी. इतर जण म्हणजे महाराष्ट्रातील शरद पवार यांच्यासारखे नेते याबाबत कमी यशस्वी राहिले. आज त्यांना काँग्रेसशी हस्तांदोलन करण्याची काहीच गरज नाही. याचे कारण काँग्रेसकडे काहीच ताकद उरली नाही. तिच्याकडे कुठलीही मते किंवा विचारसरणी नाही. आता तर लक्षात येतेय की, महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली याचे कारण उमेदवारांना पक्षाकडून कोणतीही आर्थिक रसद पुरवली गेली नाही. हे चित्र पक्षासाठी फारच धोक्याचे आहे. हा पक्ष असाच आता एका कुटुंबाच्या मालकीचा म्हणून चालू राहील. याचे कारण त्यांना आता कुठलेही उत्तरदायित्व नाही. तरीही शक्यता आहे की, कदाचित दुसऱ्या एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकेल.
 
 (अनुवाद शशिकांत सावंत)
बातम्या आणखी आहेत...