आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर डिटर्जंट पावडर विकण्यास हरकत नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांनी केवळ चांगल्या गुणांनी परीक्षा पास करणे पुरेसे नाही तर नवनव्या क्षितिजांची आस धरावी, समस्यांवर सकारात्मक पर्याय शोधण्याचा आत्मविश्वास बाळगावा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच केले. याविषयी बोलताना प्रश्न केला की, ‘आपल्या आयआयटी पदवीधरांना डिटर्जंट पावडर विकताना पाहणे, कुणाला आवडेल का?’ 
राष्ट्रपतींचे हे वक्तव्य वास्तव परिस्थितीशी समर्पक आहे. आयआयटी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एक मोठा वर्ग विज्ञान, अभियांत्रिकी सोडून इतरत्र करिअरच्या संधी शोधतात. हे विद्यार्थी आपल्या करिअरची दिशा का बदलतात? मला एक अनुभव आठवतो. प्रथम वर्षाच्या वर्गाला एकदा प्रोफेसर विचारतात, ‘तुमच्यापैकी किती जणांना अभियंता व्हायचंय?’ निम्म्याहून कमीच विद्यार्थ्यांनी सकारात्मक उत्तर दिले. ही खूप विदारक स्थिती आहे. जेईईसारखी परिश्रमाअंती प्रवेश मिळवलेले विद्यार्थी स्वत:ला अभियांत्रिकीसाठी पात्र समजत नाहीत किंवा कुणाला अभियंता होण्याची इच्छाच नसते.  

अनेकांवर पालकांचा दबाव असतो. त्यामुळेच आयआयटीतून बाहेर पडल्यावर हे विद्यार्थी आपले मार्ग बदलतात.  ते योग्यही आहे. रघुराम राजन, टीव्हीएफचे अरुणब कुमार, अरविंद केजरीवाल हे सर्व याचे यशस्वी दाखले आहेत.  केवळ विज्ञान आणि औद्योगिकीकरणासंबंधी समस्यांचे निराकरण करणे एवढीच आयआयटी पदवीधरांकडून अपेक्षा नाही. शालेय स्तरावरील समुपदेशन सुधारण्याची गरज आहे. पालकांनीही पाल्यांवर यासाठी दबाव टाकू नये. आयआयटी पदवीधरांना अभियांत्रिकीपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांनी विविध समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला पाहिजे. एेषोआरामातील नोकरीच्या वातावरणातून बाहेर येऊन नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. आपल्या आवडत्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करावे. यासाठी डिटर्जंट पावडर विकावी लागली तरी काय हरकत आहे?
 
हर्ष गुप्ता, २२
सहसंस्थापक, क्रेटिफ, 
आयआयटीयन, गांधीनगर.
बातम्या आणखी आहेत...