आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकसित जगात वीज वितरण मॉडेल ‘कालबाह्य’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोव्होल्टेक सेल व पवन चक्कीच्या शोधानंतर सुमारे १५० वर्षांनंतर जगात हवा व सूर्यप्रकाशावरच्या विजेची निर्मिती एकूण वीजनिर्मितीच्या तुलनेत ७ टक्के आहे. तरीही या क्षेत्रात उल्लेखनीय अशा घडामोडी घडत आहेत. १० वर्षांपूर्वी अत्यंत दुर्लक्षित राहिलेले हे क्षेत्र अन्य ऊर्जा स्रोतांपेक्षा आता शहरांमध्ये वेगाने वापरले जात आहे. कोळसा, तेल, वायू यांच्या किमती, या ऊर्जेपेक्षा अधिक असल्याने साहजिकच ग्राहकांचा कल या अक्षय ऊर्जेकडे आहे. ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीच्या अंदाजानुसार, येत्या २० वर्षांत जागतिक ऊर्जा वितरणात  अक्षय ऊर्जेचा वाटा ५० टक्के इतका वाढणार आहे. 

म्हणजे जग आता स्वच्छ, अखंडित व स्वस्त ऊर्जेच्या युगात प्रवेश करत आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयईए)नुसार येत्या २० वर्षांत वीज ग्रीडमधून उत्सर्जित केल्या जाणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइडपासून मुक्ती मिळवण्यासाठी वीज कंपन्यांना सुमारे १३३० खर्व रुपये इतका खर्च येऊ शकतो. पण सध्या अनेक गुंतवणूकदार वीज उद्योगात गुंतवणूक करण्यास उत्सुक नाहीत. कारण गेल्या १० वर्षांत जगात ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावरून श्रीमंत व विकसनशील देशांमध्ये संघर्ष उभा राहिल्याने हवा, सौर ऊर्जा क्षेत्रांमध्ये वृद्धी झाली आहे. २०१५ मध्ये अमेरिका, चीन व जर्मनी या देशांमधील सरकारांनी या क्षेत्रात १० हजार अब्ज रुपये इतकी गुंतवणूक केली आहे. 

त्यात आनंदाची बातमी अशी की, या अक्षय ऊर्जेला सबसिडी असल्याने विजेचे  मूल्य काही भागांमध्ये घसरले आहे. वीज बाजारपेठेत अक्षय ऊर्जेवर अधिक भर असल्याचे हे परिणाम आहेत. श्रीमंत देशांमधील सरकारांनी अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास मोकळीक दिली आहे. वीज वितरणात मोठी गुंतवणूक आल्याने वीजदर घटले आहेत. युरोपमध्ये २००८मध्ये प्रतितास ८० युरो दराने वीज विकली जात होती, हा दर आता ३०-५० युरो इतका आहे. त्यामुळे जुन्या वीज कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. जर्मनीमधील सर्वात मोठी वीज कंपनी ई-ऑन व आरडब्ल्यूई यांचे गेल्या वर्षी विभाजन झाले. या कंपन्यांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पारंपरिक ऊर्जा उत्पादनाचा हिस्सा अक्षय ऊर्जा व ग्रीड बिझनेसकडे वळवला आहे. २०१० ते २०१५ या काळात युरोपमधील वीज कंपन्यांना वीजदरात कपात झाल्याने आपली १२० अब्ज युरो किमतीची मालमत्ता विकावी लागली. 

जागतिक वीज बाजारपेठेचे विश्लेषण करणाऱ्या मेट रेनी यांच्या मते, ऊर्जा क्षेत्रात पूर्वीपेक्षा आता गुंतवणूक करणे कठीण झाले आहे. हवा व सूर्यप्रकाशातून निर्माण होणारी अक्षय ऊर्जा एकूण वीज बाजारपेठेतील १०० टक्के मागणी पूर्ण करेल तेव्हा जीवाश्म इंधनापासून तयार होणाऱ्या विजेचे मूल्य शून्य होईल. सौदी अरेबियामध्ये काम करणारा ऊर्जेवरचा विचार गट केपसार्कच्या मते, जग दुष्टचक्रात फसत निघाले आहे. सबसिडीमुळे अक्षय ऊर्जेचे उत्पादन वाढत जाऊन दर कमी होत जातील. या अक्षय ऊर्जेचा बाजारपेठेवरचा हिस्सा १०० टक्के झाल्यास वीजदर कोसळून शून्यापर्यंत येतील व त्यामुळे गुंतवणूक घटेल. मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील फ्रान्सिस ओ सलीवन म्हणतात, सौर ऊर्जेचा मोठा वापर असलेल्या अमेरिकेत ही चिन्हे दिसू लागली आहेत. अक्षय ऊर्जेमुळे विजेचे दर केवळ कमी होणार नाहीत, तर त्याचा परिणाम मागणीवरही होऊ शकतो. ऑस्ट्रेलियात सुमारे १५ लाख घरांच्या छतांवर सौर पॅनेल आहेत. तेथे सौरऊर्जा विपुल आहे आणि सौर पॅनेलला सबसिडी दिली जाते. 

पण तेथे ग्रीडमधून मिळणारी वीज महाग आहे. आयईएच्या नुसार, दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत २००८-०९ या काळात ग्रीडच्या विस्तारावरचा खर्च दुप्पट झाला आहे. ऑस्ट्रेलियात पुढील दशकात सौर पॅनेलच्या संख्येत तिपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. जर ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेचा वापर कमी होत असेल तर त्यामधील गुंतवणूकही कमी होत जाणार. मेलबोर्नमधील ग्रीनसिंक या संस्थेचे िफल ब्लाइथ असा इशारा देतात की, ऑस्ट्रेलियात वीज कंपन्या बंद होण्याच्या अवस्थेत आहेत.  
 
अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये अक्षय ऊर्जेचा अधिक वापर होत असल्याने त्याचा परिणाम ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेवर होऊ लागला आहे. जर्मनीतही असेच चित्र आहे. तेथे १४ लाख घरांवर सौर पॅनेल लावण्यात आले आहेत. तेथे घरांमध्ये निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये वीज कंपन्यांना सौर ऊर्जा देणाऱ्या लोकांना पैसे द्यावे लागतात. २०१६मध्ये १२ राज्यांमध्ये सौर पॅनेल लावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. व्यावसायिक व उद्योग क्षेत्रही आता अक्षय ऊर्जेचे बडे ग्राहक झाले आहेत. सबसिडीमुळे अक्षय ऊर्जेचे दर कमी झालेले आहेत. मेक्सिको व अबुधाबीमध्ये स्वच्छ ऊर्जेचे वितरण करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून कमी पैशात आम्ही वीज देतो, अशी या कंपन्यांची भूमिका आहे. ज्या देशांमध्ये पुरेशा स्वरूपात हवा आणि सूर्यप्रकाश आहे तेथे अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.  
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
 
बातम्या आणखी आहेत...