आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखाची सर्वोच्च अवस्था आनंद ही आत्म्याच्या पातळीवर प्राप्त होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोपर्यंत आपण पीडा किंवा दु:खाचा अनुभव घेणार नाही, तोपर्यंत गरज ही आपली इच्छा किंवा आकांक्षा केव्हा बनते ते आपणासही कळत नाही. आपल्या मनातील इच्छा-आकांक्षा बॅक्टेरियाप्रमाणे अनियंत्रित संख्येने वाढत असतात. अशा अंतहीन स्पर्धेत आपण सुख आणि खुशीच्याही पलीकडे जाऊन मनात जो आनंद साठलेला असतो, त्याची अवस्था समजून घेत नाही. "आनंद' सुखाची अशी सर्वोच्च अवस्था आहे की त्याचा अनुभव मनात खोलवर असलेल्या आत्म्याच्या पातळीवर होतो.
जगात आम्ही जेव्हा जन्माला येतो आणि जेव्हा कळू लागते, तीच आमची कर्मभूमी हाेऊन सुख आणि दु:खाचे फलस्वरूप बनते. माणसाच्या जन्मानंतर एक अविरत संघर्ष सुरू होतो. पहिला श्वास घेतल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाचा कारभार सुरूच असतो. याला जीवनाची लालसा म्हणणेच योग्य ठरेल. हीच लालसा सकाळी सुरू होऊन रात्रीपर्यंत कर्माची प्रेरणा देत असते. परंतु या लालसा पूर्ण करण्यासाठी धावाधाव करणे जीवनाच्या अंतापर्यंत शक्य नसते. मृत्यू येईपर्यंत अधुरेपण जाणवते. सगळे क्षणभंगुर असते, हे जीवनातील अटळ सत्य आहे. या अनिश्चिततेच्या चक्रात सापडलेला माणूस मन आणि सुखाची निश्चित अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असतो. मृत्यू सगळे हिरावून घेणार आहे, यापासून तो अनभिज्ञ असतो आणि सुखसाधनांचा संग्रह करत जीवन समृद्ध बनवत असतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपणास दु:ख नको असते, केवळ सुखाची आकांक्षा असते आणि हेच अज्ञान आहे. कारण जीवनाकडे आपण दोन दृष्टिकोनातून पाहतो. कारण आपणास तशी सवय जडलेली आहे. स्वत:लाच जीवन मानतो आणि संपूर्ण जीवनाच्या परिघाभोवती फिरत असतो. जे काही चालले आहे, ते आपणच करतो आहोत, असे वाटत असते. ज्ञानी व्यक्ती मात्र परमात्म्यास केंद्रस्थानी ठेवते. ती कर्माच्या मागे त्या शक्तीलाच कारणीभूत मानते आणि अनुग्रहित होऊन आनंदी जीवन जगत असते. यासाठी ती ज्ञानी व्यक्ती अनासक्तीचे मर्म जाणते.
सुखाची स्थायी अवस्था जाणून घेण्यासाठी मानव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग ते धन कमावणे असेल, पद-प्रतिष्ठा असेल, भविष्यातील एखादे स्वप्न असेल, प्रत्येक ठिकाणी तो गरजेपेक्षा जास्त जमा करून आपले सुख चिरकाल टिकावे, अशी व्यवस्था करतो. येथे मनोवैज्ञानिक तथ्य असे की, मनाला सतत आनंद कसा मिळेल याचा शोध तो घेत असतो. आम्ही सुखी आणि प्रसन्न असावे, जीवनातील सर्व कर्मे यासाठीच तर असतात. यामुळेच तो विचार करतो की, जास्त पैसे कमवावेत, तेव्हाच सर्व सुखे मिळतील. मोठे पद-प्रतिष्ठा मिळाली तरच समाजात खूप मानसन्मान, अधिकार, प्रतिष्ठा मिळते. परंतु आश्चर्याची बाब ही आहे की, या सर्व धावपळीत आपल्या गरजा आणि इच्छा यामधील फरक समजू शकत नाही. प्रत्यक्षात गरजा कधी आकांक्षेत बदलल्या जातील ते कळतही नाही. कारण इच्छा ही सावलीसारखी असते. तिची चमक आपल्याला मंत्रमुग्ध करत असते. माणसाला इच्छा होणे किंवा बाळगणे लहानपणापासूनच असते. इच्छेच्या स्वप्नवत जाळ्यात त्याला "इच्छा ठेवणे' शिकवले जाते. त्यामुळे काेणती आवश्यक आणि कोणती अनावश्यक हे ओळखणे शक्य नसते. हळूहळू या इच्छा अनियंत्रित होऊन कधी कधी अधुऱ्या राहतात. त्या मनुष्यास वाईटपणा, तणाव आणि गुन्ह्याकडे ढकलतात.
गरजा इच्छा किंवा आकांक्षा केव्हा बनतात हे तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण पीडा किंवा दु:खाचा अनुभव घेत नाही. अर्थात, आपणास भूक लागली तर साधे अन्न सेवन केले तरी भूक शमते. पण मन तेथे हस्तक्षेप करते आणि अमुक अमुक पक्वान्नच पाहिजे, अशी इच्छा निर्माण करते. त्यानुसार आपल्या शरीरास भुकेचे शमन करणे अनिवार्य वाटू लागते.
कारण गरज थोडी असते, पण मनाची खूप काही घेण्याची तयारी असते. तेव्हा एक संघर्ष सुरू होतो आणि साठवण्याची प्रवृत्ती जन्म घेते. या प्रवृत्तीमुळे सदैव आमच्या मनात काही तरी "अभाव' असल्याचा भास होतो. हा "भाव' आम्हाला कर्म करण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी प्रेरित करतो. या "अभाव'कटू रसामुळे प्रत्येक क्षणाला पीडा किंवा दु:खाचा अनुभव येतो. कारण जे अातापर्यंत मिळालेले नाही, त्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल.
आपल्या मनातील इच्छा-आकांक्षा बॅक्टेरियाप्रमाणे अनियंत्रित गतीने वाढत जात असतात. मन सुखपूर्ण अवस्था मिळवण्याच्या काल्पनिक भविष्यासाठी आपल्या वर्तमानास असंतोषजनक आणि कटू बनवते. कारण इच्छेला ना आदी असतो ना अंत. यामुळेच याला "माया' म्हटले जाते, जे सत्य नसतानाही सत्यासमान वाटते. जेव्हा मनाचा हा भ्रम काल्पनिक भविष्याच्या स्वप्नातून उडून वर्तमानात येऊन त्याच्या ठिकऱ्या उडतात तेव्हा आपण आपल्या स्वभावानुसार आपल्या अपयशाचे खापर समाज, परिवार, व्यवस्था इत्यादींवर फोडतो. यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. आज आपण स्वत:ला दु:खीकष्टी पाहतो. येथूनच जीवनात समस्या आणि तणावाची परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होते. सुखमय भविष्याची इच्छा इतकी लोभस वाटू लागते की, जीवनात हाच एक संघर्ष तयार होतो, तो कधी न संपणारा आहे. या अंतहीन स्पर्धेत मनाच्या आनंदाची ती अवस्था ओळखूच शकत नाही.
"आनंद' सुखाचा तो परमोच्च बिंदू आहे, ज्यात जीवनाच्या परिवर्तनात, सुख-दु:खाप्रति अनासक्त रूपाशी संलग्न होऊनही कर्मफलाचा लाभ घेत असताना शांतीचा अनुभव घेत असतो. हे मनाच्या खूप खोलवर जाऊन अनुभवता येते. येथे सर्वकाही स्थिर असते. या आनंदाच्या अवस्थेत आम्ही स्पष्टपणे मन, विचार, इच्छा आणि कर्माला पाहू शकतो तेव्हा या प्रश्नाचे उत्तर मिळते की, जेथे जीवनातील सर्व घालमेल, संघर्ष प्रत्यक्षात असतो कसा? दु:ख आणि सुख म्हणजे काय? एक अंतर्दृष्टी विकसित होते. याच आनंदास "परमात्मा'असे म्हटले आहे.
जीवनात प्रत्येकाला या आनंदाचा रसास्वाद घेता येतो. तेव्हा अनायास आपल्या संघर्षादरम्यान थोडासा विराम घेऊन आपले मन आपल्याला विचारते की, जेथे सर्व संतुलित होईल, शांत होईल, काेलाहलरहित होईल अशी कोणती अवस्था आहे का? येथूनच मुक्ती किंवा मोक्षाकडे जाणारा पहिला अध्याय सुरू होतो. ज्ञानी व्यक्ती जो अनासक्तीचा प्रथम अध्याय आहे, तपस्या आहे, ती मुक्त करते. जेव्हा आपणास अनासक्तीच्या अभ्यासाचे स्मरण करण्याची गरज पडेल तेव्हा ती साधना आहे. जेव्हा स्मरणाची गरज उरणार नाही ती सिद्धी आहे.
वस्तुस्थिती - महर्षी पतंजली यांनी योगदर्शनच्या पहिल्या अध्यायात समाधिपादच्या दुसऱ्या सूत्रात म्हटले आहे की, योगश्चितवृत्तिनिरोध: याचा अर्थ असा की, योगाने मनातील वृत्तीचा नाश होतो. चित्त ४ गोष्टींपासून बनलेले आहे - मन, बुद्धी, अहंकार आणि संस्कार.
पीबीजीएम महाविद्यालय करौंद, भोपाळ