आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर हे करा: लाजाळू स्वभाव जेव्हा प्रगतीत अडथळा ठरतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा काही चुकीचे केल्याने अपराधीपणाची भावना होते, तेथेच संकोची वा लाजाळू स्वभावाची जाणीव होते. व्यक्तीला वाटत राहते की, त्याच्यात काही स्वभावगत उणीव आहे. त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी न जाता तोंड लपवतो आणि तसे वागणे संकोची स्वभावाचे संकेत आहेत.

व्हिजन बोर्डच्या माध्यमातून स्वत:चा दृष्टिकोन बदला
१.हे साधारण बोर्ड असते. त्यावर आपण आपले लक्ष्य, भविष्यात आपण कोण आणि कसे व्यक्ती बनू इच्छितो, या संबंधित चित्र, चारोळी वा कोट लिहिलेले असतात. दिवसभरात जितक्या वेळा आपण त्याला पाहू, तितकेच ते मनावर छाप सोडते.
२.आपण स्वत:ला कोणत्या रूपात पाहू इच्छितो, याची मनात स्पष्ट आकृती तयार करा. ध्यानादरम्यान असे कराल तर फायदा होईल. यामुळे विचार व कर्मात एकरूपता येईल.
३.कारण की ही अपराधी भावनेशी मिळतीजुळती भावना आहे. शेवटी येथेही स्वत:साठी करुणामय दृष्टिकोन ठेवल्याने फायदा होईल. जगात कुणीही परिपूर्ण नाही.

मीही असा असतो, हे मनातून काढून टाका
१.आपण मनातल्या मनात म्हणत असतो की, मीही त्याच्यासारखा बोल्ड असतो, तर मीही त्याच्यासारखा बुद्धिमान असतो. त्याऐवजी म्हणा, आता मीही तसाच बनेन, तितकीच हुशारी दाखवेन.
२.उजव्या हाताच्या तर्जनीने डाव्या हाताचे मधले बोट हळूहळू थापटा आणि म्हणा, मी जसा आहे तसाच मी माझा स्वीकार करतो. माझ्या आतील गुण हळूहळू विकसित होत आहेत. काही दिवसांनंतर फक्त थापटणेच पुरेसे होईल आणि मस्तकामध्ये सकारात्मक तरंग उठतील.
३.आपण हा प्रयोग संपूर्ण शरीरावर करू शकतो. भुवयांच्या खाली असलेल्या हाडापासून ते पायांच्या नखांपर्यंत.

आपल्या बालपणाचे निरीक्षण करा आणि कारण समजून घ्या
१.जन्मानंतर आपल्याला सांभाळणाऱ्या आईवडिलांचे हास्य, प्रेमाचा स्पर्श, प्रेमाचा आवाज, मृदू स्पर्श यामुळे आपल्याविषयी चांगले होण्याची धारणा बनते. काही कारणामुळे बालपणात याचा अभाव असेल तर स्वत:मध्ये उणीव असल्याची जाणीव होते. आपल्या बालपणात जाऊन कारण समजून घ्या.
२.आपले जीवनमूल्य ठरवा, ज्यांच्यासारखे आपण जगू इच्छिता. इमानदारी, करुणा आदी. या मूल्यांनुसार जगण्यानेच स्वाभिमान निर्माण होईल आणि संकोच नष्ट होईल.
३.प्रत्येक व्यक्तीत विशेषता असते. त्याचे निरीक्षण करा. भूतकाळामध्ये त्यातून मिळालेल्या सुखद क्षणांना आठवा.