आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या समीकरणांसाठी तयार अाहाेत?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत अाणि रशियाच्या दरम्यान बरेच जुने द्विपक्षीय संबंध अाहेत. साेव्हिएत संघाच्या विघटनानंतरदेखील दाेन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध अाहेत. लष्करी तसेच अार्थिक करारांच्या माध्यमातून संबंध मजबूत करण्यावर दाेन्ही देशांनी भर दिला. भारत-रशिया संबंध हे राजनैतिक सहकार्य, संरक्षण, अणुऊर्जा, दहशतवादविराेध अाणि अंतराळ विज्ञान या पाच मूलभूत तत्त्वांवर अाधारित अाहेत. रशियाकडून संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात माेठा ग्राहक अाहे. याचप्रमाणे भारत अाणि अफगाणमध्ये मैत्री अाहे. दाेन्ही देशांच्या सांस्कृतिक संबंधांचा अापला वेगळा इतिहास अाहे. १५ फेब्रुवारी २०१७ राेजी अायाेजित अफगाणविषयक बैठकीसाठी भारताला निमंत्रण देण्यात अाले हाेते. या गाेपनीय बैठकीत रशियाच्या वतीने जामिर कबुलाेव्ह हजर हाेते. यापूर्वीच्या बैठकीत रशियाने केवळ चीन अाणि पाकिस्तानलाच बाेलावले हाेते. रशियाच्या या भूमिकेवर अफगाणने नाराजी दर्शवली हाेती. 

भारत अाणि पाकिस्तान संबंध वैश्विक चर्चेचा विषय राहिला अाहे. याशिवाय रशियाने पाकिस्तानला लष्करी सामग्री देण्याबराेबरच संयुक्त लष्करी प्रात्यक्षिके केली, ही धक्कादायक बाब ठरावी. पाकिस्तानला लष्करी सामग्री पुरवू नये तसेच संयुक्त कवायती करू नयेत, असे भारताने रशियाला बजावले अाहे. भविष्यात रशिया यासंदर्भात अनुकूल भूमिका घेईल किंवा नाही, हे ठाेसपणे सांगता येणार नाही. मात्र, भारताला सावध भूमिका घ्यावी लागेल. पाकिस्तानला जी लष्करी सामग्री पुरवण्यात अाली तिचा वापर भारतविराेधी कारवायांसाठी हाेणारच नाही याची हमी पाकिस्तान सरकारदेखील देऊ शकणार नाही. खरे तर राजनैतिक मैत्रीमध्ये जाेखीम असते अाणि शत्रुत्व तर जाेखीमच ठरते. कदाचित, अमेरिका-भारत मैत्रीमुळे रशिया अस्वस्थ असावा. 
 
एनडीएमव्हीपी इंजिनिअरिंग काॅलेज, नाशिक. 
बातम्या आणखी आहेत...