आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी जलविवाद अाकडेवारीने संपणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान साेबतच्या सिंधू नदी जलविवादाकडे जर भू-राजनीतिक दृष्टिकाेनापलीकडे जाऊन पाहिले तर देशांतर्गत अन्य जलस्रोतांच्या वादाप्रमाणेच एक म्हणता येईल. मागच्या वर्षी कर्नाटक अाणि तामिळनाडूत कावेरी तसेच पंजाब अाणि हरियाणात सतलज-यमुना लिंक कालवा, पंजाब अाणि राजस्थानमध्ये सतलज, रावी, बियासच्या पाणी वाटपावरून सुरू झालेल्या वादाच्या बातम्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या हाेत्या. याशिवाय अाेडिशा अाणि छत्तीसगडमध्ये महानदीवरून सुरू झालेला तणाव सर्वाेच्च न्यायालयात पाेहाेचला अाहे. केन-बेतवा नदी इंटरलिंकिंग अाणि गाेदावरी नदीशी संबंधित वाददेखील अधूनमधून डाेके वर काढत असतात. 
या सर्व मुद्द्यांच्या मुळाशी दाेन मुख्य घटक अाहेत, त्यापैकी पहिला म्हणजे नद्यांवर उभारण्यात अालेल्या माेठमाेठ्या बंधाऱ्यांतून समभावाने तसेच परिणामकारक पद्धतीने न हाेणारे सिंचन. यामुळे नदीच्या वरच्या अाणि खालच्या भागातील लाेकांमध्ये सातत्याने संघर्ष हाेत असताे.
 
दुसरी बाब म्हणजे भू-जलस्रोत जाे कधी हरितक्रांतीस कारक, सिद्ध ठरला हाेता त्याचा अाज अत्यंत वाईट पद्धतीने उपसा केला जात अाहे. त्यामुळे नदीसारख्या जलस्रोतांवर दबाव वाढत चालला अाहे. अशा परिस्थितीत अांतरराज्यीय जलविवाद मिटवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नियुक्त करण्यात अालेल्या मिहिर शाह समितीच्या शिफारशी उपयुक्त ठरू शकतात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे पाण्याच्या अाकडेवारीचा हाेय. जाेपर्यंत अाम्ही अत्यंत काटेकाेर अाणि तपशीलवार अाकडेवारी संकलित करून त्याचा अभ्यास करत नाहीत ताेपर्यंत एखाद्या क्षेत्रात किती पाणी उपलब्ध अाहे, त्याचा किती अाणि काेणाकडून वापर हाेताे ते कळणार नाही. इतकेच नव्हे, तर यशस्वी जलव्यवस्थापनची प्रक्रियादेखील त्याशिवाय सुरू हाेऊ शकणार नाही. मुळात पाणी प्रश्नाला भावनिक किंवा राजकीय वळण न देता ताे तार्किक अाणि वैज्ञानिक पद्धतीने साेडवणे हेच सर्वांच्या हिताचे ठरणार अाहे. 
 
एलम्बस अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, बंगळुरू
बातम्या आणखी आहेत...