आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी : दोन टक्के लोकांवरच होतो उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनी पूर्णत: खराब झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख इतकी आहे. दरवर्षी त्यात एक लाखाने वाढ होते आहे. देशातील दर २ हजार कुटुंबांमागे एक कुटुंब या आजाराने ग्रासलेले दिसून येते. केवळ दोन टक्के रुग्णांनाच योग्य उपचार मिळतो. किडनीशी संबंधित समस्या कोणत्या आणि त्यावरील उपचारांची माहिती...

टाकाऊ पदार्थ आणि तरल पदार्थ अत्याधिक प्रमाणात शरीराबाहेर टाकून रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य किडनी करत असते. रक्तात सॉल्ट आणि धातूंचे प्रमाण संतुलित करते. रक्तदाब नियंत्रित करण्यात किडनी साह्यभूत ठरते. शरीरात पाण्याचे प्रमाणही संतुलित ठेवते.
एक किडनी २ इंच रुंद, १.५ इंच लांबीची असते. किडनी लाखो चाळण्या तथा १४० मैल लांब नलिकेपासून बनलेली असते. किडनीच्या या भागांना नेफ्रॉन असे म्हणतात. एका किडनीत जवळपास १० लाख असे भाग असतात, जे मायक्रोस्कोपद्वारेच दिसतात. नलिका गाळलेल्या
द्रवातून शरीरासाठी उपयुक्त सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी दुसऱ्यांदा शोषून घेते. दररोज १.५ लिटर युरिनच्या रूपाने बाहेर टाकते.

किडनीसंबंधीच्या तक्रारी
क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी): सीकेडीला एस्टेनब्लिश रिनल फेलिअर (ईआरएफ) किंवा एंड स्टेज किडनी डिसीज असे म्हणतात. यात किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. किडनी सामान्य कार्य करू शकत नाही आणि क्षमता कमी होत जाते. सीकेडीमुळे पीडित अर्धे लोक जेव्हा त्यांची किडनी अर्धवट कार्य करत असते तेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातच रोगाची लक्षणे दिसून येताच रोगाचे निदान होते आणि औषधाने रोग वाढण्याचा धोका कमी करता येतो.

किडनीवर सूज : यात किडनीच्या फिल्टरिंग भागावर सूज येते. त्यांना हानी पोहोचते. ते निकामी होणे सामान्य आहे. याला ग्लोलमेरुलोनेफ्रिटायटिस असे म्हणतात.
पॉलिसिस्टिक किडनी डिसीज : हा आनुवंशिक असून किडनीमध्ये गळू होतात.

किडनीमध्ये इन्फेक्शन : या इन्फेक्शनला पायलोनेफ्रिट्स असेही म्हणतात. हे इनफेक्शन किडनी स्टोनमुळे होऊ शकते. यामुळे लघवी किडनीच्या बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि लघवी पुन्हा किडनीत जमा होते. यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो.
तसे तर किडनी आणि मूत्रमार्गाचे ८० टक्के इन्फेक्शन ई- कोलाई आणि अन्य बॅक्टेरियामुळे होते. ई कोलाई इन्फेक्शन दूषित पाणी आणि अन्नापासून होते.

किडनी निकामी : गंभीर रोगात किडनी निकामी होऊ शकते. यात किडनी सामान्यत: १५ टक्क्यांपेक्षाही कमी कार्य करते. याला एंड स्टेज रिनल डिसीज (ईएसआरडी) असे म्हणतात.
कारणे : किडनी खराब हाेण्याची अनेक कारणे आहेत; परंतु मुख्य कारण पुढील प्रकारे : डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीत खडा, किडनी रोगाचा कौटुंबिक इतिहास, स्थूलपणा, कोलेस्टेरॉल वाढणे, प्रोस्टेटचा आजार, पेनकिलर किंवा अन्य औषधांचा अतिरिक्त वापर होणे. रजत भस्म आणि स्वर्णभस्मयुक्त औषधांचा जास्त वापर हेही कारण असू शकते.
लक्षणे : यात शरीरावर सूज येणे, भूक न लागणे, उलटी होणे, रक्ताची कमतरता, हाडे कमजोर होणे, श्वास- रक्तदाब वाढणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्त निघणे आदी.
उपचार
डायलिसिस :
ही प्रक्रिया एका स्वस्थ किडनीसारखे काम करते. शरीरातून अतिरिक्त तरल व टाकाऊ पदार्थ काढून इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्याचे कार्य केले जाते.

हिमोडायलिसिस : यात कृत्रिम किडनी/फिल्टरद्वारा मशीनद्वारे रक्त साफ केले जाते. यात दोन सुयांचा वापर होतो. एका सुईद्वारे खराब रक्त मशीन आणि कृत्रिम किडनीत जाते. दुसऱ्या सुईने स्वच्छ रक्त शरीरात परतते. एका व्यक्तीला सरासरी दर आठवड्यास दोन ते तीन
वेळा हिमोडायलिसिस करावे लागते.
वस्तुस्थिती- किडनी ट्रान्सप्लांटनंतर रुग्णांचे सामान्य जीवन सुरळीत होण्यास दोन ते तीन महिने लागतात. यासाठी सरासरी ४ ते ५ लाख
रुपये खर्च येतो.
लेखक हे किडनी ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे एचओडी.