आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची 3 वर्षे: परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींचा ठसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणशी संबंध सुधारून पाक लष्करावर दबाव वाढवला
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गेल्या ३ वर्षांत परराष्ट्र धाेरण अाणि संरक्षणविषयक अाव्हानांचा मुकाबला करताना उल्लेखनीय काैशल्य, कल्पनाशीलता अाणि शाेधक दृष्टिकाेन दाखवला अाहे. देशाच्या परराष्ट्र धाेरणावर त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. त्यामुळे अांतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना निर्णायक अाणि शक्तिशाली नेत्याची अाेळख प्राप्त झाली. त्यांच्याविरुद्धच्या अपप्रचारामुळे इस्लामिक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले हाेते, परंतु त्यांनी यूएई, सौदी अरब, कतार अाणि इराणच्या शासकांचा विश्वास संपादन केला. इतकेच नव्हे तर अमेरिका अाणि अाॅस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतवंशीयांना याची जाणीवही झाली की दिल्लीमध्ये असा एक नेता अाहे, ज्यास अापली काळजी असते.
 
चीन अाणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी समझाेता हे माेदींच्या समाेरील खरे अाव्हान अाहे. या दाेघांशी एकाच वेळी मात्र स्वतंत्रपणे भिडण्यासाठी माेदी नवी रणनीती अाखत अाहेत. कारण पाकिस्तानची खरी सत्तासूत्रे लष्कराकडे अाहेत. अफगाणसाेबत भारत दृढ संबंध प्रस्थापित करत असून जेणेकरून पूर्व अाणि पश्चिम सीमेवर पाकिस्तानसाठी अाव्हान उभे राहील.  राजनैतिक स्तरावर इराण, अमेरिका अाणि त्यांच्या युराेपीय मित्रराष्ट्रांना अफगाणला जादा मदत पुरवण्यास तसेच पाकिस्तानविरुद्ध जाहीर बाेलण्यासाठी प्रवृत्त केले जात अाहे. कुलभूषण जाधव प्रकरणी अांतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानवर ज्या पद्धतीने अवमान पचवण्याची वेळ अाली त्यावरून सरकार अाणि लष्करातील दुरावा अाणखी वाढला अाहे.
- जी. पार्थसारथी (भारताचे पाकमधील माजी उच्चायुक्त)
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, चीनला ठणकावले; गुंतवणूक ठीक, पण कर्जाचा बोजा नको...
बातम्या आणखी आहेत...