आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा क्रूर आघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल आइस डेटा सेंटरने केलेल्या भाकितानुसार ‘आगामी आॅक्टोबर महिन्यात बर्फवृष्टीचे मागील सर्व विक्रम मोडीत निघतील.’ यामुळे रेनडियर कायमचा नष्ट तर होणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. तो राहिला नाही तर त्याचे खरे पालक कसे जगतील, हा प्रश्न अस्वस्थ करतो आहे. 
 
माणसाची कोणी हत्या केली तर आपण संबंधिताला दंडित करतो. पण निसर्गच जेव्हा विकट रूप धारण करतो आणि आपणच निर्माण केलेल्या प्राण्यांच्या जिवावर उठतो तेव्हा काय करायचे? याचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे? धार्मिक पुस्तके म्हणतात, ईश्वर जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी. असे असले तरी मरणे किंवा मारणे याबाबतचे तत्त्वज्ञान सहज समजण्यास कठीण आहे. ईश्वराची लीला अगाध आहे म्हणून आपण मनाची समजूत घालू शकतो, पण त्याने खरे समाधान हाेत नाही. असेही म्हणतात की मारणे म्हणजेच जिवंत करणे आणि जिवंत करणे म्हणजेच मारणे. तत्त्वज्ञानी काहीही सांगू द्या, पण मागील दशकात ८० हजारांहून अधिक रेनडियर मृत्यू पावणे, ही काही साधी गोष्ट नाही. 

उत्तर ध्रुवावरील सृष्टीबद्दल आपल्याला ऐकून किंवा टीव्ही पाहिल्याने माहिती असते. तेथे केवळ बर्फाचा विशाल सागर आहे. मनुष्यजीवन असलेली जमीन पाहायलाही मिळत नाही. तेथील थंडी आणि वातावरणाचे वर्णन करणे शब्दांत शक्य नाही. अलीकडच्या काळात तेथे सर्व काही आलबेल नाही. बर्फ वितळल्याने एकीकडे पाणीपातळी वाढतेय आणि दुसरीकडे तेथील प्रमुख पशू रेनडियर संकटात सापडला आहे. रेनडियरला जगण्यासाठी अन्न मिळवणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी ८० हजार रेनडियर मृत्यू पावल्याची घटना पुढे आली. 

संपूर्ण जगात जल आणि वायू परिवर्तन माेठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे ध्रुवीय प्रदेशातील प्रमुख पशूंवर गंडांतर आल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाने पृथ्वीतलावरून किती पशू पक्षी नष्ट होणार हा चिंतेचा विषय होऊन बसला आहे. ध्रुवीय प्रदेशातील सर्वांना माहीत असलेला एक प्राणी आहे अस्वल. वेगाने बर्फ वितळत असल्याने हा प्राणी संकटात असला तरी सध्या कसाबसा तग धरून आहे. बर्फ वितळल्याने ध्रुवीय प्रदेशात जे बदल होत आहेत त्यामुळे अभ्यासक चिंतित आहेत. तेथे हजारो पोपट मरून पडल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. शेपूटविरहित ससा तेथे आढळतो. ब्लेरीन हा एक वेगळा प्राणीही त्या भागात आढळतो. तो बर्फावर जिवापाड प्रेम करतो. तोही आता संकटात आहे. रेनडियर आणि या सर्व प्राण्यांचे जीवन संकटात सापडले आहे. यावर उपाय काय, हे कोणीही सांगू शकत नाही, अशी स्थिती आहे. सगळीकडे  केवळ बर्फ आहे, शुभ्र चादर; याशिवाय काहीच नाही. 

रशियाच्या वरचा भाग यामाल. उत्तर सैबेरियातील या भागात जगातील सर्वाधिक रेनडियर पाळले जातात. हा प्राणी भयंकर थंडीतही तगून राहतो. बर्फाच्या थरांतही तो जिवंत राहतो. हजारो वर्षांपासून हा प्राणी या भागात कळपाने आढळतो. स्थानिक लोक रेनडियर पाळतात. रेनडियरचे दूध पितात. काही जाती मांसही खातात. कपडे आणि इतर वस्तू बनवण्यासाठीही रेनडियरचा वापर करतात. गाडीला जंुपतात. हा मौल्यवान प्राणी आता संकटात सापडल्यामुळे त्या भागात भीती पसरली आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये १६ हजार रेनडियर अन्न न मिळाल्याने मृत्युमुखी पडले होते. २००६ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या रेनडियरची संख्या २० हजार होती. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या थरांची जाडी वाढल्यानेच अशा घटना घडत आहेत. येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की रेनडियर पाळणारे लोक या प्राण्याची खूप काळजी घेतात. रेनडियरचे रक्षण करण्यातच त्यांचा दिवस जातो. टोळ्यांनी राहणाऱ्या या लोकांकडे मोठ्या संख्येने रेनडियर असतात. त्यांचे सारे जीवन रेनडियरवरच असते. रेनडियर आपल्या लांब खुरांनी बर्फाचे पापुद्रे फोडतो. अभ्यासक म्हणतात की २००६, २०१३ आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये हे पापुद्रे अधिक टणक आणि जाड होते. त्यामुळे हे थर खुरांनी फोडणे अशक्य झाले आणि त्यामुळे शेवाळजन्य अन्न न मिळाल्याने मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले. 

शास्त्रज्ञांच्या मतानुसार ध्रुवीय प्रदेशातील तापमानात नेहमीपेक्षा वाढ झाली. इतकेच नाही, तर तेथे मुसळधार पाऊसही झाला. यामुळे पृष्ठभाग ओलसर बनला आणि जेव्हा तापमान कमी झाले तेव्हा बर्फ वेगाने जमा झाला. तापमानात आणखी घट झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात बर्फ साचून तापमान उणे ४० अंशांपर्यंत घसरले. पावसामुळे मऊ बर्फाचा सफाया झाला. बर्फ उकरून शेवाळ काढणे कठीण होते. इतर वनस्पतीही दुर्मिळ झाले. यामुळे अनेक रेनडियर प्राणास मुकले. 

बर्फ वितळायला सुरुवात होण्याआधीच स्थानीय लोकांकडील पशुसंपत्ती मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. राष्ट्रसंघाने पाठवलेले मोठे पशूही या टुंड्रा प्रदेशात संकटात सापडले. या पशुंना ओढून गोठ्यांपर्यंत हलवण्यासाठी पशुपालकांकडे काहीच व्यवस्था नव्हती. प्राण्यांची कशीबशी काळजी घेण्यातच पशुपालकांची दमछाक होत होती. या संकटावर मात करण्यासाठी तेथील पशुपालकांनी निसर्गाशी जी झुंज दिली ती प्रशंसनीय आणि आश्चर्यजनक आहे. वास्तविक पाहता येथील लोकांना आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल मनात आत्मीयता आहे. कसेही करून रेनडियरना कसे वाचवावे, हाच विचार त्यांच्या मनात होता. आपण जरी वाचलो आणि हे प्राणी वाचले नाहीत तर आपण जगून तरी काय उपयोग, रेनडियरशिवाय जगायचे कसे, असा प्रश्न ते स्वत:ला करतात. ‘आम्ही मरून गेलो तरी चालेल, पण आमच्या रेनडियरना धोका नको’, अशी प्रार्थना करत ते ईश्वराला आळवतात. ही त्यांची संस्कृती आहे. आकाश आणि बर्फाळ जमीन या स्थितीत राहणाऱ्या लोकांची आशा आणि शेवटचा आधार रेनडियरच आहे. रेनडियरसाठी ते मरायलाही तयार आहेत. त्यांच्या रोजी रोटी आणि जीवनाचा तो आधार आहे. 
बातम्या आणखी आहेत...