आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्षे-डाळिंब निर्यातीस ‘अच्छे दिन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपियन महासंघाने मार्च महिन्यात भारतीय द्राक्षे आणि डाळिंब यांच्यावरील बंदी मागे घेतली, त्यामुळे निर्यातदारांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. या दोन्हीच्या निर्यातीतून 1316 कोटी रुपयांचे उत्पन्न यंदा अपेक्षित आहे.
भारत देश कृषिप्रधान आहे, असे आपण नुसते म्हणतो. पण या क्षेत्रात किती आयात निर्यात होते, याची आकडेवारी जाणून घेण्यापेक्षा गारपीट आणि अवकाळी पाऊस यांचीच माहिती जास्त चवीने वाचतो. भारतीय शेती लहरी हवामानावर अवलंबून असली तरी काही फळांच्या निर्यातीबाबत मात्र आपण समाधानी आहोत. द्राक्षे आणि डाळिंब यांच्या निर्यातीबाबत आता समाधानाची परिस्थिती आहे. युरोपियन महासंघाने मार्च महिन्यात भारतीय द्राक्षे आणि डाळिंब यांच्यावरील बंदी मागे घेतली, त्यामुळे निर्यातदारांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. या दोन्हीच्या निर्यातीतून 1316 कोटी रुपयांचे उत्पन्न यंदा अपेक्षित आहे.
आपल्याकडे फळे आणि भाज्यांवर जी जंतुनाशके मारली जातात, त्यामुळे निर्यातीत आपला कृषीमाल नापास होतो. द्राक्षे आणि डाळिंबे यांच्याबाबतीत हीच समस्या होती, पण ती आता दूर झाली आहे. भारतातून युरोप, रशिया बांगला देश, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये द्राक्षे निर्यात होतात. यंदा आपण 3 मार्चअखेर युरोप आणि ब्रिटनमध्ये 14 हजार टन द्राक्षे निर्यात केली. रशिया आणि चीनमध्येही भारतीय द्राक्षांचे मार्केट वाढत आहे. सोनाका जातीच्या द्राक्षांना बांगलादेश आणि मध्यपूर्वेत जादा मागणी आहे.
डाळिंबाच्या निर्यातीतूनही यंदा 92 दशलक्ष रुपयांचे निर्यात उत्पन्न मिळाले आहे. गणेश, मृदुला, भगवा या जातीच्या डाळिंबांना चांगली मागणी आहे. एकू ण 93500 हेक्टर जमीन डाळिंबाच्या लागवडीखाली आहे. त्यात एकट्या महाराष्ट्राचा डाळिंब उत्पादनाचा वाटा 601500 मेट्रिक टन इतका आहे. जुलै ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान आपल्याकडे डाळिंब उपलब्ध असतात. मध्य पूर्व, ब्रिटन, हॉलंड, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, नेदरलँड, इजिप्त,टर्की,बहारीन,कुवेत,श्रीलंका हे भारतीय डाळिंबांचे ग्राहक आहेत.
अनेक नैसर्गिक संकटे असताना तसेच कृषी क्षेत्राबाबत ठळक धोरण नसताना, असलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्हे असताना आपले शेतकरी इतकी प्रगती करू शकतात, ही बाब निश्चितच अधोरेखित करण्याजोगी आहे.