आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिओ ऑलिम्पिक्सची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या घटकेला संपूर्ण विश्वात सगळ्या देशांतल्या संस्कृतींचा परस्पर परिचय करून देऊ शकणारा ऑलिम्पिक स्पर्धेसारखा दुसरा कोणताही महोत्सव अस्तित्वात नाही. जगभरचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पदके जिंकण्याच्या ईर्षेने या स्पर्धेत उतरतात.

बंगळुरूला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे खूप मोठे क्रीडा संकुल आहे. मागे मी १९८७ मध्ये इथे आलो होतो तेव्हा हे बांधायला सुरुवात झालेली होती. बंगळुरू-म्हैसूर रस्त्यावर हे संकुल आहे. तेव्हा अक्षरशः दाट जंगलामधून इकडे पोहोचावे ​लागे. सारखे साप निघत. इथे येऊन राहायला मुले अतिशय घाबरत असत. आता बऱ्याच इमारती उभ्या राहिल्या आहेत. सुरेख क्रीडांगणे तयार झाली आहेत. निवासाच्या सोयी सुद्धा उत्तम उभ्या राहिल्या आहेत. म्हैसूरच्या रस्त्यावर अगदी पाच, सात मिनिटांच्या अंतरावर एक मोठा मॉल आहे. त्यामुळे सगळ्या वस्तू लगेच मिळण्याची सोय झाली आहे. आवारातच एक गोल्फ ग्राउंड आहे. सुंदर पोहण्याचा तलाव आहे. दाट झाडी आणि नीट निगा राखलेले बगिचे या साऱ्यामुळे परदेशात असतात. त्याच्या तोडीचे हे क्रीडा संकुल आहे. बंगळुरूची हवा सुंदरच आहे. रिओमध्ये सबंध वर्षभर अशीच हवा असते. म्हणून ते जगभरच्या पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. सध्या पावसाळी हवा आहे. त्यामुळे दिवसा वनश्रीची शोभा आणि संध्याकाळी फिरताना चमकणारे असंख्य काजवे वातावरण मोहवून टाकणारे बनवतात. भारतीय पुरुष आणि महिला हॉकीचे संघ, मॅरेथॉन आणि इतर लांब पल्ल्याच्या शर्यतींचे खेळाडू, तसेच तिरंदाजीचा संघ, हे सारे रिओ अॉलिम्पिक्ससाठी तयारी करीत आहेत. त्यांच्यासोबतच भारताचा ज्युनियर हॉकी संघसुद्धा येत्या डिसेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या जागतिक चषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव करीत आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून सगळी क्रीडांगणे खेळाडूंनी गजबजलेली असतात. अतिशय सुंदर वातावरण आहे. अशा सोयी देशभरच्या साऱ्या जिल्ह्यांमधून व्हायला हव्यात. म्हणजे आपल्या देशातल्या क्रीडा संस्कृतीची निर्मिती होऊ शकेल.

आजच्या घटकेला संपूर्ण विश्वात सगळ्या देशांतल्या संस्कृतींचा परस्पर परिचय करून देऊ शकणारा ऑलिम्पिक्ससारखा दुसरा कोणताही महोत्सव अस्तित्वात नाही. जगभरचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पदके जिंकण्याच्या ईर्षेने या स्पर्धेत उतरतात आणि सर्वच खेळांच्या क्रीडाप्रेमींचेच नव्हे तर सर्वसाधारण जनतेचेही लक्ष या खेळाडूंच्या कामगिरीकडे आणि पदक तालिकेकडे लागलेले असते. पूर्वी भारतीय संस्कृतीचा आणि समृद्धीचा सर्व विश्वात गवगवा पसरलेला होता, पण इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत या दोन्ही गोष्टींची पार वाट लागली. गुलामीचीच सवय अंगवळणी पडल्यामुळे आपण सगळे पोटार्थी झालो आहोत. पुस्तकी अभ्यासावर भर देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणजे आपल्या लेकरांचे आयुष्याचे कल्याण होईल याच्या पलीकडे दुसरा विचारसुद्धा पालकांच्या मनात येत नाही. अगदी सुस्थितीतले पालकसुद्धा आठवी, नववीपर्यंत पोरं पोहोचली की त्यांचे खेळ आणि इतर सर्व उद्योग बंद करून टाकतात. थोडे मार्क कमी मिळाले की त्यांचे प्राण कंठाशी येतात. खेळाच्या मैदानावरच बालकांचा विकास योग्य रीतीने होऊ शकतो. चार धक्के देत आणि चार धक्के घेत बालपण घडलेलं असलं की पुढल्या जीवनात कठीण आणि प्रतिकूल परिस्थिती आली तर ते उत्तम प्रकारे तोंड देऊ शकतात असा अनुभव आहे. नुसत्या पुस्तकी विद्येच्या मागे लागलेल्या पालकांना आणि त्याच्या मुलांना संस्कृती, तिरंगा, राष्ट्रगीत या साऱ्या बाबींचे महत्त्व कसे कळणार?

आता मी भारतीय तिरंदाजी संघाला मानसिक सरावाचे प्रशिक्षण देत आहे. त्यातला मोठा पराक्रम गाजवून ऑलिम्पिक स्पर्धांची पात्रता गाठणाऱ्या तिन्ही मुलींची कथा अतिशय करुण आहे. झारखंड, नागालँँड आणि मणिपूर या मागास राज्यांमधल्या या तीन मुली. घरचा विरोध असताना सुद्धा त्यांनी या खेळात करिअर करायचे ठरवले. प्रशिक्षण आणि साधनांचा अभाव असल्याने दोन-दोन, तीन-तीन वर्षे त्यांची वाया गेली. जिद्दीने त्यांनी साधने मिळवली, तसे प्रशिक्षण घेतले आणि सुस्थितीतल्या कित्येक वर्षे या खेळात अधिराज्य गाजवणाऱ्या खेळाडूंना मागे टाकून थेट ऑलिम्पिकमध्ये धडक मारली आहे. खेळाच्या यशामुळे त्यांना नोकऱ्या मिळाल्या, पण साधने आणि सराव यांची काहीच व्यवस्था होऊ शकली नाही. आता आहेत त्या सुविधा त्यांना यापूर्वीच उपलब्ध झाल्या असत्या तर त्यांनी ऑलिम्पिक पदके केव्हाच मिळवली असती. चुकीच्या देशात जन्माला आल्याने त्यांची अशी परवड झाली असेच म्हणावे लागेल.
bpbam.nasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...