आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याचा सूर्य अज्ञानाच्या अंधकारात लपलेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौराणिक आख्यानावरून मायथॉलॉजी या शब्दाचा वापर इंग्रजीत केला जातो. हे चुकीचे आहे. मायथॉलॉजी असे म्हटल्याने आपणास आपली परंपरा आणि संस्कृतीतील खऱ्या घटनासुद्धा कथा किंवा दंतकथांसारख्या वाटतात. मात्र, तसे नाही. भारतात सत्याचा सूर्य अज्ञानाच्या अंधकारामागे प्रकाशमान आहे.

एका देशात क्रांती होत असताना क्रांतिकारक एका किल्ल्यामध्ये गेले. तेथील सम्राटाने किल्ल्याचे रूपांतर जेलमध्ये केलेले होते. क्रांतिकारकांनी तेथील सर्व कैद्यांना मुक्त केले आणि सांगितले, आता तुम्ही स्वतंत्र झाला आहात. येथून तुमची सुटका करण्यात येत आहे. ते कैदी २०-३० वर्षांपासून तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत हातापायांना बेड्या घालून खितपत पडले होते. ते तेथून बाहेर आले. सूर्यप्रकाशात आल्यानंतर त्यांचे डोळे दिपले. क्रांतिकारकांनी तर जेलवर ताबा मिळवला होता. कैदी निघून गेले; पण संध्याकाळ होत असताना काही कैदी पुन्हा परत आले. क्रांतिकारकांना आश्चर्य वाटले. त्यांना तसे विचारले असता, त्यांनी कोठडीतच राहण्याची इच्छा प्रकट केली. आता आमचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला आहे. आम्ही बेचैन आहोत. आम्हाला आतमध्ये पाठवा. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. रात्री उशिरा जेव्हा क्रांतिकारक त्या कोठडीजवळून जात असताना, एकदम थबकले. कैद्यांनी त्या कापलेल्या बेड्या पुन्हा हातापायांना बांधून घेतल्या होत्या. ते गाढ झोपेत होते. त्यांना उठवण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, इतके वजन अंगावर असल्याशिवाय अाम्हाला झोपच लागत नाही. ३० वर्षे आम्ही या अवस्थेतच काढली आहेत.

ही सत्य घटना असून स्तंभलेखन करत असताना अचानक याची आठवण आली. भारताने गेली एक हजार वर्षे भयानक गुलामी अवस्थेत काढली आहेत. आपण केवळ सांगायला स्वतंत्र आहोत; पण गुलामीत असताना बघण्याची दृष्टी होती तीच कायम राहिली. हजारो वर्षे जुन्या असलेल्या महान परंपरा, संस्कृतीकडे पाहण्याची दृष्टी तशीच आहे, जशी त्या कैद्यांना पहिल्यांदा सूर्य पाहिल्यावर झाले होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आपण राजे- महाराजाच्या जुलमी राजवटीतून बाहेर पडलो नाहीत, ताेच इंग्रज आले. गुलामीचा काळ आणखी जाचक ठरू लागला. त्यांनी पद्धतशीरपणे आपली दृष्टीच बदलली. हा प्रयोग त्यांनी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून केला. आपणास आपली परंपरा- संस्कृती, खऱ्या घटना आणि पात्रे किस्से-कथानकाप्रमाणे वाटू लागल्या. मिथकाप्रमाणे. त्यांच्या दृष्टिकोनास आपण मायथॉलॉजी असे म्हटले. हा चुकीचा शब्द आहे.

जेव्हा आम्ही मायथॉलॉजी म्हणतो, तेव्हा आपण दुसऱ्यांनी दिलेल्या चष्म्यातून स्वत:ला पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. भारताच्या हजारो वर्षे जुन्या समृद्ध संस्कृतीतील प्रत्येक गोष्टीला खूप गहन अर्थ आहे. मला असे वाटते की, भारतातील काहीच नष्ट झालेले नाही. आपला दृष्टिकोन वास्तववादी असला पाहिजे. सगळे काही तसेच सुरक्षित असलेले दिसेल. आपली लोकपरंपरा देशातील कानाकोपऱ्यात जिवंत आहे, ते याचे उत्तम उदाहरण आहे. एक समृद्ध संस्कृती, जिचा आपणास अभिमान असायला हवा. ज्या अतिरेक्यांनी आपल्या भारतास शतकानुशतकांपासून चिरडण्याचा प्रयत्न केला, आपल्या मानबिंदूला नष्ट -भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते इतिहासात नष्ट झालेले नाहीत. ती पाशवी परंपरा आजही नवे टप्पे गाठत आहे.
माझ्या मते, भारताकडे आज जगाला देण्यासारखे खूप काही आहे. मायथॉलॉजीच्या चष्म्यातून आपल्याच परंपरेला मिथ मानलेल्यांना पाहण्याची योग्य सवय असावी लागते. एकदा आम्ही आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या परीने पाहण्याचे, आपल्या संस्कृतीचा सूर्य पाहण्याचे धाडस केले तर त्या अंधकाराच्या पलीकडे पाहू शकू. ज्याला अापण खरे समजून चालतो आणि त्यापलीकडे आहे ते मिथक. या स्तंभात आपण अंधकाराच्या पलीकडे जाऊन पाहणार आहोत. एकदा आपण पूर्वजांच्या दृष्टीने पाहू तेव्हा ती सनातनची समकालीन होते. जेव्हा
दुसऱ्यांच्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा अपरिचित होऊन पाहू लागतो.

वस्तुस्थिती: ऋग्वेद काळात एक हजाराहून अधिक प्रार्थना आहेत. त्यांना सूक्त असे म्हटले आहे. सूक्ताचा अर्थ चांगल्या प्रकारे बोलले गेलेले, असा आहे.
लेखक हे मध्य प्रदेश लोक कला अकादमीचे माजी संचालक आहेत.
बातम्या आणखी आहेत...